Articles by "करीअर"

नोकरी करताना स्पर्धा परिक्षांची तयारी कशी कराल
  • जर कुठला व्यक्ती नोकरी करतो तेव्हा तो नोकरी सोबतच अभ्यासासाठी खूप जास्त वेळ नाही देऊ शकत.
  • तुमच्याकडे जर उत्तम स्ट्रॅटेजी असेल तर सगळ्या गोष्टी शक्य होऊ शकतात.
  • कुठलाही क्लास जॉईन करू नका. कारण तुम्ही रेग्युलरली नाही जाऊ शकत.
  •  तुमच्याकडे वेळ खूपच कमी आहे. त्यामुळे तुमचा वेळ हा थेअरी वाचण्यात वाया नका घालवू.
जर तीन महिन्या नंतर युद्ध असेल, तर तुम्ही आज काय जिम करणार का डायरेक्ट तलवार चालवायला शिकणार
  • तुम्ही ज्या स्पर्धापरीक्षेची तयारी करताय. तुम्ही फक्त आणि फक्त त्या परीक्षेचे पेपर सोडून बघायला सुरवात करा.
आता तुम्हाला एक प्रश्न उदभवला असेल, कि जर थेरीच येत नसेल तर परीक्षेत उत्तरे कशी येतील
  • तुम्ही जेव्हा प्रश्नपत्रिका सोडवायचा प्रयत्न कराल तेव्हा तुम्हाला थेरी हि समजत जाईल.
  • रिझनिंग ला पुस्तके वाचून नाही शिकू शकत. रिझनिंगसाठी नेहमी ट्रिक असतात आणि ट्रिक ह्या प्रत्येक उत्तरात असतात.
  • गणितात जास्त स्टुडंट हे फॉर्म्युला शिकण्याच्या चक्कर मध्ये पडतात आणि जेव्हा कुठला प्रॉब्लेम सोडवायला जातात तेव्हा प्रॉब्लेम नाही सोडवत फक्त बोलतात हा ह्याच्यात हा फॉर्म्युला लागेल आणि ह्या सवयीमुळे गणिताचा स्पीड खूप कमी होतॊ व त्याच नुकसान परीक्षेत भोगायला लागत.
  • कुठल्याही विषयाचं तुम्ही समजून एक्सप्लेनेशन शिकलात तर खूप चांगला अभ्यास होईल. थेरी वाचून नाही शिकू शकत.
  •  तुम्ही प्रश्नपत्रिकांचा सेट्स लावा आणि उत्तर समजून घेऊ शिका.
  •  तुम्ही फक्त त्याचा अभ्यास नका करू जे तुम्ही चुकीचं उत्तरे लिहिलेत तुम्ही तेही वाचा जे तुम्ही बरोबर लिहिलंय.
  •  तुम्ही नोकरी बरोबर स्पर्धापरिक्षांचा अभ्यास करत असाल तर तुम्ही तुमचा सगळं अभ्यास कामावर जाण्याआधीच करत जा.

अस का,
  • कारण तुम्ही ऑफिस मध्ये 4 ते 5 तास काम केल्यावर मेंटली थकणार. मग तुम्हाला काही शिकायचं असेल काही अभ्यास करायचं असेल तुम्ही पूर्ण ताकदीने नाही करू शकत. त्यामुळे अभ्यास पहिले केला पाहिजे.
  • तुमचा ऑफिस जर 10 ला चालू होत असेल तर तुम्ही ऑफिस मध्ये किंवा ऑफिस जवळ 7 वाजताच जा व अभ्यास करत बसा जेव्हा 9.55 होतील तेव्हा पटकन ऑफिस मध्ये जा.
  • ऑफिस वरून घरी आल्यावर चहा न पिता 1 तास झोपा आराम करा. नंतर उठल्यावर फ्रेश व्हा म्हणजे तुमचा पुन्हा अभ्यासात मन लागेल.
  • तुम्ही नोकरी करता तेव्हा तुम्हाला अलार्म ची गरज नको भासायला पाहिजे. तुम्हाला आपोआप जाग यायला हवी. जाग तेव्हाच येते. जेव्हा तुमची झोप पूर्ण होते.
  •  तुमची जर झोपच पूर्ण नसेल होत तर त्याचा परिणाम तुमच्या कामावर व तुमच्या अभ्यासावर सुद्धा होतो. त्यामुळे तुम्हाला तुमची झोप जरूर पूर्ण करायला पाहिजे.
  •   फक्त आणि फक्त स्टुडंट साठी आहे कि त्यांनी सकाळी चार वाजता अभ्यास करायला पाहिजे कारण ते दिवसही झोपू शकतात.

शेअर करा मित्रांसोबत ;
  • ·   आशा करतो तुम्हाला दिलेली "नोकरी करताना स्पर्धापरिक्षांची तयारी कशी कराल" माहिती आवडली असेल. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद,



"स्पर्धा परीक्षासाठी गणिताचा अभ्यास उत्तम गुणवत्तेसाठी कसा कराल" जाणून घ्या 
कोचिंग क्लास ?
Comptitve maths exam study in marathi
  • तयारीसाठी लोक कुठल्यातरी कोचिंग क्लास ला जॉईन करतात.
  •  कोचिंग जॉईन करण्यासाठी दोन पद्धती अवलंबतात. एक तर मित्राला विचारल जात, नाहीतर पेपरमध्ये जाहिरात बघितली जाते.
  • जाहिराती हि अशा असतात कि भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर लगेच ह्यांनी शिकवायला सुरवात केलेली असते आणि इतके इतके लाख विद्यार्थी त्यांनी शिकवले असतात अस त्याचं म्हणना आहे.
  • सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा असतो कि ते फक्त सांगतात कि किती लोकांच सिलेक्शन झालय किती लोकांच सिलेक्शन झाले नाही ते सांगतच नाहीत.

कोचिंग क्लासच सत्य
  • तुम्ही कितीही चांगली कोचिंग जॉईन करा पण 4% पेक्षा जास्त निकाल कुठल्याही क्लास चा नसतो.
  • कोचिंग वाले सांगतात कि त्यांच्या कडे 4हजार लोकांच सिलेक्शन झालय. पण त्याच बरोबर त्यांच्या कडे अशे हि मुले असतात. त्यातले 96 हजार लोकांच सिलेक्शन नाही होत.
  •  96 हजार लोकांच सिलेक्शन का नाय होत त्यांनी इतकी मेहनत केलेली नसते जेवढी करायला पाहिजे होती.

सिलेक्शन कुणामुळे होत ? 
  • सिलेक्शन कोचिंग मुळे नाही होत सिलेक्शन मेहनत केल्या मुळे होते. त्यामुळे कोचिंग क्लासेस ला खूप जास्त महत्व देण्याची काही गरज नाही आहे.


कोचिंग क्लासची अवस्था
  • कोचिंग क्लास असतात त्यांच्या 1 बॅच मध्ये 300 ते 350 मुले बसतात. आणि 1-1 टीचर त्यांचे त्यांचे विषय शिकवतात.

कोचिंग मध्ये शंकेच निरसन होत का ?
  • कुठल्या स्टुडंट ला शंका असली तरी तो शंकेचे निरसन करून घेऊ शकत नाही का नाही करून घेऊ शकत आता 1 तासाचा क्लास असतो त्यात 30 च्या वरती जरी मूल असली तरी त्यात तुमचे डाऊटशंका त्यांचं निरसन दूर नाही केलं जाऊ शकत.
  •  तुम्ही कोचिंग क्लास जॉईन करता तुमच्या शंका दूर व्हायला आणि त्याच जर दूर होत नसतील. म्हणजे 20 ते 25 हजार खर्च खरून सुद्धा तुम्ही तुमचे डाऊट क्लिअर नाही करून घेऊ शकत ते पण का तर, समोरच्याला फक्त पैसा कमवायचा आहे. आणि खूप जास्त पैसा कमवायचा आहे.

गणिताचा क्लास लावायचा उत्तम पर्याय :
  •  गणिताचा क्लास लावायचा सगळ्यात उत्तम पर्याय म्हणजे तुम्ही कुठल्या तरी अशा शिक्षकाला निवडा जो शाळेत शिकवत असेल.

काय शिकून घ्याल ;
  • शिक्षकाकडून 6 वि, 7 वि, 8 वि, 9 वि, 10 वि च गणित शिकून घ्या. कारण ह्या सगळ्या गोष्टी आपण पहिलेच शिकलेलो असतो त्यामुळे 5 वर्षाचा जो अभ्यास असतो तो आपण 5 महिन्यात करू शकतो.
  •  त्या शिक्षकांकडून तुम्ही 1 तास शिकल्यानंतर तुम्ही 2 तासाची प्रॅक्टिस केली तर तुम्ही  प्रत्येक प्रॉब्लेम च सोल्युशन फाईन्ड आऊट करू शकता. त्यामुळे तुम्हाला हे सुद्धा समजेल कुठल्या प्रकारच्या प्रॉब्लेमला कशा प्रकारे सोडवल जात.

फायदा काय होतो ?
  • शिक्षक तुम्हाला घरी येऊन शिकवत असतील तर तुम्ही तुमचा एक एक डाऊट क्लिअर करून घेऊ शकता.
  • ह्या गोष्टीचा फायदा हा होतो कि तुम्ही सोप्या गोष्टी शिकून घेत असता त्यामुळे तुमच्या कडे शिकण्यासाठी व समजण्यासाठी खूप वेळ असतो. तुम्ही इतके प्रॉब्लेम सोडवले असतात. कि तुम्हाला त्याच पूर्ण प्रोसेस समजायला लागते.
  • हया सगळ्यामुळे तुम्हाला गणिताचे फॉर्म्युला, आणि ट्रिक नव्याने शिकायची गरज भासत नाही तुमचं कॅलकुलेशन खूप फास्ट व्ह्यायला लागलेलं असत.
  • फॉर्म्युला शिकण्यापेक्षा व लक्षात ठेवण्या ऐवजी तुम्ही बेसिक शिकलात तर तुमचा कॅलकुलेशन फास्ट होत. अस नाही सांगत कि फॉर्म्युला नका शिकू फॉर्म्युला पण शिका ज्यांची प्रोसेस खूप लांब लचक आहे त्यांचे फॉर्म्युला शिकून घ्या.
  • जेव्हा आपण फॉर्म्युला आणि शॉर्ट ट्रिक्स शिकतो तर गणिताची प्रॅक्टिस करण बंद करतो. अस कधीच केलं नाही पाहिजे. गणिताच aptitude नॉलेज वाढवण्यासाठी सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे तुम्ही तुमच्या प्रोसेस ला समजून घ्या. आणि ट्रिकस फक्त त्या गोष्टींची शिका ज्यांची प्रोसेस खूपच लांब आहे.
  • तुम्ही जर रोज 2 तास तरी नीट अभ्यास केला तरी 6 वि,7वि,8वि,9वि,10वि, चा गणित हे 3 ते साडेतीन महिन्यातही होऊ शकत. तीन महिन्यात NCERT चा मॅथ्स ची पुस्तके सोडून होतात.
  • जर तुम्ही 10 वि ची तयारी करत असाल तर सकाळी संध्याकाळी गणिताचे 5 -5 गणिते सोडून बघत जा.
  •  तुम्ही कुठल्याही स्पर्धापरीक्षेची तयारी करत असाल तर गणित हे 6वि,7वि,8वि,9वि,10वि च येत असत.
  • गणिताचा स्पर्धेपरीक्षेसाठी अभ्यास करण्यासाठी ह्या पेक्षा उत्तम पर्याय कोणताही नाही आहे.

शेअर करा मित्रांसोबत ;
  • आशा करतो तुम्हाला दिलेली माहिती "स्पर्धा परीक्षा साठी गणिताचा अभ्यास उत्तम गुणवत्तेसाठी कसा कराल" जाणून घ्या " आवडली असेल. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद...!




"मुलाखतीची तयारी कशी कराल बेस्ट टिप्स" for Interview In Marathi


interview preparation Tips in marathi



Communication Skill

आपण जे काही दुसऱ्याला सांगतो ते योग्य प्रकारे सांगणे. म्हणजे तुम्ही जे काही बोलाल ते 6 वर्षाच्या मुलाला किंवा 98 वर्षाच्या आजोबांना हि समजेल अस.
  • Ability To Influence

तुमच बोलन हे प्रभावी हवय आवाज कडक व समोरच्याला तुम्ही जे बोलाल ते कानांपासून ते मनापर्यंत पोहोचवण्याची क्षमता तुमच्या बोलण्यात  व शब्दांत हवी.
  • Ability To Analyze Situation

अस विश्लेषण, तुम्ही जे काही करता ते इतक मनापासून केलं पाहिजे कि त्यापासून होणारे फायदे व तोटे हे तुम्ही बरोबर ओळखून जे तोटे होतात. ते होऊ नये यासाठी तुम्ही काय करू शकता.
  • Problem Solving Attitude

कुठलीही समस्या असेल तो सोडवायचा स्वभाव, जास्त लोक अशे असतात ते सगळीकडे कसाही प्रॉब्लेम शोधून काढतात, पण त्यावर उपाय नाही शोधत. ते अशे असतात कि समाधान नाही बघत प्रत्येक समाधानात एक समस्या कशीही शोधून काढताच.
  • Team Player Attitude

सगळ्यांनी मिळून एकत्र एकजुटीने काम करण्याचा स्वभाव कारण एकटा खूप मोठे ओझे उचलू नाही शकत. त्यामुळे तुम्हाला मिळून काम करणे यायलाच पाहिजे नसेल येत तर शिकलेच पाहिजे.
  • Good Learning Ability

कुठलीही नवीन गोष्ट शिकण्याची क्षमता असणे. जर तुमची शिकायची क्षमता नसेल तर तुम्ही थोडी अजून जास्त मेहनत करा.
  • Flexibility

कुठल्याही गोष्टी ला आपल्या मान बाण आणि शान वर घेऊन नाही चालणार. दोन वर्षापासून कुठल्या मोठ्या परीक्षेची तयारी करत असाल नसेल होत तर प्रयत्न करत राहा पण त्या सोबत जी छोटी नोकरी भेटेल ते सुद्धा करत राहा.
  • Adaptability

अनुकूल क्षमता, जर तुम्ही जगाला तुमच्या हिशेबाने नाही बदलू शकत तर, जगबरोबर तुम्ही हि बदलायला शिका.
  • Organizing Capability

कुठल्याही गोष्टीला व्यवस्थित करण्याची क्षमता. त्यासाठी तुम्हाला समजायला पाहिजे कि कुठली वस्तू महत्वाची आहे व कुठली फाल्तु जर तुम्हाला हे कळले तर तुम्हाला हे हि माहिती पाहिजे कि यांच्यातली कोणती वस्तू हि जास्त महत्वाची आहे. सोशलमीडियाचा वापर करणे हि गरजेचे आहे. पण त्याच्या अगोदर तुमचा 5 तासाचा अभ्यास पूर्ण केला पाहिजे.
  • Awareness Of The Bigger Picture

मोठ्या पडद्यावर नक्की चालू काय आहे. कुठल्याही कॉलेज ला ऍडमिशन घेण्या अगोदर कुठल्याही कोर्स ला निवडण्या अगोदर पहिले हे जाणून घेणं महत्वाच आहे कि त्या कोर्स ची बाजारात व्हॅल्यू डिमांड किती आहे.
  • Determination

असा संकल्प कि तुम्ही जे काही कराल ते, गरजेचे असेल तर करा जरी तुमचं मन असेल नसेल तरी करा.
  • Reliability

विश्वसनीयता- “जे मी बोलतो ते मी करून दाखवतो” थोडी मेहनत करावी लागते या वाक्यासाठी पण विश्वास ठेवा ह्या लाईन ला बोलायला खूपच मजा येते.

  • Time Management Skills

वेळेचं नियोजन करायचं कोशल्य. पण वेळेचं नियोजन करण्याची खासियत हि आहे कि वेळेला नियोजनबद्ध नाही केलं जाऊ शकत. वेळ हा खूप फास्ट जात असतो. त्यामुळे स्वतःला वेळेत योग्य प्रकारे नियोजनबद्ध करता आलंच पाहिजे.
  • Subject Knowledge

विषयाबद्दल योग्य समज-अभ्यास फक्त ह्यासाठी नका करू कि जास्त मार्क मिळतील. अभ्यास ह्यासाठी करा तुम्ही त्या विषयासंबंधी योग्य वेळी, योग्य बोलू शकता.
  • Diligence

एखादे काम करून करून त्या कामातील बारिक बारीक गोष्टी समजून घेणे. फक्त नुसत एखाद्या विषयाचा अभ्यास करून काही नाही होत तुम्हाला त्या कामाचे व्यवहार करण्यायोग्य ज्ञान, प्रॅक्टिकल नॉलेज पण माहित हवय.
व्याकरण माहित असणे ते विषयाच नॉलेज,
कोणत्या वाक्याला कुठला व्याकरण वापरायचं त्याला deligence म्हणतात.
  • Good Attitude

चांगला स्वभाव, आणि Good Attitude काय असतो ह्यावर खूप सार तुम्ही वाचले असेलच. पण त्या सगळ्याचा सारांश हा आहे कि नेहमी अस समजायचं कि समोरच्याला ती गोष्ट माहित आहे जी मला माहित नाही त्यामुळे समोरच्याशी अस वागा कि त्याची इच्छा होईल तुम्हाला जी गोष्ट माहित नाही त्याबद्दल सांगायची.
आपल्या जवळ जे काही आहे त्याचा दुसर्यांना किती फायदा हिल त्यासाठी वापर केला पाहिजे.
  • Sense Of Responsibility

कुठल्याही गोष्टीची जिम्मेदारी घेण्याचा स्वभाव, म्हणजे तुमची आता जी काही स्थिती आहे त्याची सगळी जिम्मेदारी responsibility घेणें. 
याचा अर्थ असा कि आपण स्वतःला समजतो व त्याप्रमाणे वागतो. 
* जर स्थिती चांगली असेल तर आपन आपली जिम्मेदारी समजली व त्याप्रमाणे वागलो,
*स्थिती खराब असेल तर कधी स्वतःची जिम्मेदारी घेतली नाही व त्याप्रमाणे नीट वागलोच नाही.
  • Decisiveness

निर्णय घेण्याची क्षमता जास्त लोकांना माहीतच नसत कि नक्की करायच काय कोणी सांगितले हे कर तर ते करतात कुणी सांगितलं हे कर तर ते करतात. जर तुम्हाला काय करायचं हेच माहित नसेल तर पहिले हे माहित करा कि तुमची योग्यता काय आहे. तुमच्या योग्यतेच्या हिशेबाने टार्गेट सेट करा. आणि एक टाईम सेट करा कि एवढ्या एवढ्या महिन्यात किंवा वर्षात एवढं मी करेल. जर तेवढ्या वेळात जर मी माझं टार्गेट नाही करू शकलो तर त्या गोष्टीला मी माझ्या डोक्यातून काढून टाकीन.
  • Loyalty

तुम्ही जेव्हा कुणासाठी काम करत असाल तर ते काम असा करा कि त्याला फक्त आणि फक्त त्याचा फायदा होईल. ज्या दिवशी त्याच काम करण तुम्ही सोडून द्याल तर तुम्ही अस काहीही नका करू कि त्याला तुमच्यापासून काही नुकसान होईल. जर तुम्ही नोकरी क्षेत्रात आहात तर ह्या गोष्टी शिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही तुम्हाला पुढे जाण्यासाठी.
  • Transferability Of Skills

तुम्ही जर कुठलं काम करण्यासाठी जे काही स्किल शिकलात त्याचा उपयोग दुसऱ्या प्रोफेशन मध्ये करू शकणे. हे करता करता तुमची ट्रान्सफिबिलिटी  वाढत जाते व एम्पलोयबिलिटी पण वाढत जाते.
  • अशा करतो तुम्हाला दिलेली मुलाखतीची तयारी कशी कराल बेस्ट टिप्स माहिती आवडली असेल.
  • तुमचा अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद,


"Introduction म्हणजे काय व कस द्यायचे "आत्ताच जाणून घ्या 

introductioon meaning in marathi
  • कुठल्याही कॉलेज ला जेव्हा कॅम्पस Interview  होतात. तेव्हा विद्यार्थ्यांना समजत नसत कि नक्की Introduction कस द्यायचं मग टीचर एकदम कॉमन अस Introduction सांगतात. Candidate जे काही सांगतात Interview ला कि पहिले तर नाव फॅमिली बॅकग्राऊंड सांगतात. Educational Qualification  सांगतात. आणि हॉबी सुद्धा सांगतात.

Ad-VERTARE

 (कडे-वळवने)
Advertisement=Introduction
तुमचं जे Introduction असत ते तुमचं एक प्रकाच advertisementआहे. ते अस पाहिजे कि interviewer च लक्ष तुमच्याकडे पूर्णपणे खेचला जाईल.
  • Advertisement हे चार प्रकारात दिले जाते.

1. Informative Introduction - अस Introduction Interviewer ला सांगतो मी पण आता बाजारात उतरलोय. अशे 0%
2. Featured Introduction- अस Introduction माझे इतके शिक्षण झाले व हे कोर्स Complete केलेत.अशे 10% सिलेक्ट होतात.
3. Persuasive Introduction - अस Introduction  माझी इतकी कॅपबिलिटी आहे कि तुमच्या कम्पनी ला खूप फायदा होऊ शकतो.अशे 50% सिलेक्ट होतात.
4. Negative persuasive introduction - अस Introduction जर मला तुम्ही घेतल नाही तर तुमचं खूप नुकसान होईल. आणि घेतल तर खूप फायदा होईल. अशे 90% सिलेक्ट होतात.
Introduction  हे एक Advertisement  आहे आणि ते जास्तीत जास्त 60 सेकंदचा व्हायला पाहिजे. तेही एकदम कडक व धारदार 60 सेकंदच Introduction व्हायला पाहिजे.
जर तुम्ही समजा ठराविक कामासाठी Interview ला जाणार असणार
त्या ठराविक कामाला गुगल वर टॉप 10 कुठल्या quality असाव्या लागतात. ते जाणून घ्या व त्यातल्या तुमच्यात कुठल्या आहेत त्याची लिस्ट बनवा. आणि अशा 10 जिम्मेदारी ज्या तुम्ही पार पाडू शकता त्या लिहा.
* आता सुरु होईल negative persuasive introduction
1. नाव सांगा
2. Education Qualification जस आहे तसेच सांगा.
2. तुम्ही त्यांना सांगा तुम्ही त्यांच्यासाठी काय काम करू शकता किती गरजेचे आहेत. जी लिस्ट बनवली quality ची त्या बद्दल सांगा.
3. तुम्हाला नोकरी वर का ठेवायचं तर तुम्ही त्यामध्ये 10 अशा जिम्मेदारी ज्या तुम्ही योग्य निभाऊ शकता.
4. नोकरीवर का घ्यावं याबद्दल सांगा.
आता हे सगळं तुम्ही बोलला नाहीत फक्त लिहून ठेवलय
  • English
  • खूप लोकांचा इंग्लिश चा प्रॉब्लेम असतो हा इंग्लिश खूप महत्वाची असते. जर तुम्ही कॉम्प्युटर सायन्स चे विद्यार्थी असाल तर तुम्ही हे विसरू नका कधी कि तुमच्याकडून त्यांना प्रोग्रॅम बनून घ्याच आहेत. इंग्लिश नाही बोलून घ्यायचं. ते तुमच्या कडून इतकी अपेक्षा करतात जर तुमच्यासमोर कुठली गोष्ट इंग्लिश मध्ये बोलली तर ती तुम्हाला समजेल.
  • तुम्ही कुठल्या इंटरनॅशनल BPO अशा ठिकाणी तर तुम्हाला इंग्लिश येणे गरजेचे आहे. जर तुम्ही टेक्निकल बॅकग्राऊंड ने असाल तर इंग्लिश मुळे कधीही नोकरी लागेल किंवा सुटणार नाही. महत्वाची गोष्ट तुम्हाला तुमच्या विषयाचं नॉलेज महत्वाच आहे इंग्लिश च नॉलेज नाही. पण याचा अर्थ असा नाही होत कि तुम्ही छोट्या छोट्या चूक करू शकता.
  • फ्रेशर आणि एक्सपिरिन्सड
  • फ्रेशर :

फ्रेशर आपल Qualification सांगतो.
  • एक्सपिरिन्सड :

आपल्या Qualification पेक्षा त्याचा असा अनुभव कशा प्रकारे त्याचा कंपनी साठी वापर केला जाऊ शकतो. ते सांगाव.
  • स्वतःची तारीफ करणे :

स्वतःच तारीफ कारणे हि योग्य गोष्ट नाही आहे पण जेव्हा मुलाखतीत जाता, तेव्हा तुम्हाला स्वतःची तारीफ करावीच लागेल तारीफ म्हणजे ती हि खूप विनम्र पणे करायची अशी तारीफ कि त्याने कम्पनी ला फायदा होईल.
  • सोशल-मीडिया :

जेव्हा तुम्ही अंतिम फेरी पर्यंत पोहोचता तेव्हा तुमच व्यक्तिमत्व चेक करण्यासाठी तुमचं फेसबुक प्रोफाइल हि काहीवेळेस बघतात.
तुमचं फेसबुक प्रोफाइल असा ठेवा कि तुम्ही खूप वेल-एज्युकेटेड व्यक्ती आहेत. तुमच्या अकॉउंट हिंदू वाईट असतात, किंवा मुस्लिम वाईट असतात अशा प्रकारच्या पोस्ट नसाव्यात ह्याची काळजी घ्या.
  • अशा करतो तुम्हा दिलेली Introduction म्हणजे काय व कस द्यायचे ? माहिती आवडली असेल.
  • तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

"स्पर्धापरीक्षा पास होण्यासाठी टिप्स" ज्या तुम्हाला आयुष्यात यशस्वी बनवतील

compitetive-exam-tips-in-marathi
  • सकाळी 4 वाजता उठत जा आणि जेवढ्या लवकर अभ्यास करायला बसता येईल तेवढ्या लवकर बसत जा.काही लोक असे असतात. ते म्हणतात कि मी रात्रीचा नमुना आहे. माझा रात्रीच चांगला अभ्यास होतो. पण जेव्हा तुम्ही दिवस भर खुप काही गोष्टी करता त्यामुळे तुमचा जो मेंदू असतो तो खूप थकतो व मेंदूची जी क्षमता असते ती 15 ते 16% वाचलेली असते. स्पर्धा-परीक्षा पास होण्यासाठी तेवढया ताकदीवर अभ्यास करून काहीच नाही होणार.
  • सकाळी 4 वाजता उठणे एक मस्त उपाय आहे. रात्रीचे कितीही वाजुदे झोपायला पण सकाळी अलार्म वाजल्या वाजल्या तुम्ही उठून बसणार, सुरवातीला थोडा त्रास होणार पण हळू हळू तुम्हाला सवय होणार.
  • डॉ.कलाम जे होते ते त्यांच्या पूर्ण जीवनात 4 वाजताच उठतात. लहानपणी जेव्हा ते 8 वर्षाचे होते तेव्हा ते 4 वाजता ह्यासाठी उठायचे कारण त्यांना पेपर वाटायला जायचे असायच. आणि जेव्हा ते राष्ट्रपती झाले तेव्हा सुद्धा ते त्याच्या कामाची सुरवात सकाळी 4 वाजेपासून करायचे.आपल्यावर तर तस कुठल्याही प्रकारची जिम्मेदारी नाही आहे. त्यामुळे सकाळी लवकर 4 वाजता उठून अभ्यास केलाच पाहिजे.
  • किती वेळ अभ्यास केला पाहिजे ?
  • अभ्यास हा तासात नाही होत त्यामुळे कधीही 50 मिनटे अभ्यास करा व 10मिनिटाचा ब्रेक घ्या, अस का तर माणसाचं मेंदू एका वेळेत सलग 50-52 मिनिटाच्या वरती concentrate नाही करू शकत. त्यामुळे एका वेळेत तुम्ही 50 मिनिटे अभ्यास करा व 10 मिनिटाचा ब्रेक घ्या, पण ह्या 50 मिनिटात मोबाईल नाही चालू करायचा लगेच.
  • १० मिनिटात काय करणार ?
  • 10 मिनिटाचा टाईमर लावा आणि कुठलेही Physical Work करा. झाडू मारा, लादी पुसा, नाचा, जोर काढा, सूर्यनमस्कार घाला, त्या 10 मिन्टामध्ये पण मोबाईल ला बिलकुल हात नका लाऊ, जे हि करायचं हे ह्या 10 मिनटात फक्त Physical Work करा,
  • नासा मध्ये सुद्धा जे काही ट्रैनिंग क्लास घेतले जातात. त्यामध्ये ह्याच शेड्युल चा वापर केला जातो. 50 मिनिटे अभ्यास व 50 मिनिटे Physical Work आणि हि गोष्ट तुम्हाला मला सगळ्यांना माहित आहे कि नासा वाले आहेत ते आपल्यापेक्षा खूपच समजदार आहेत.
  • तुम्ही प्रेरणात्मक लेख, गोष्टी, पुस्तके, Motivational video, Inspirational Video  बघायला पाहिजेत कारण कधी कधी परीक्षा पास व्हायला 4 ते 5 वर्ष लागतात. लोक नाव ठेवायला लागतात. तेव्हा आत्मविश्वास ढासळतो. त्यामुळे आत्मविश्वास ढासळू नये जिद्द टिकून राहावी त्यासाठी प्रेरणात्मक व्हिडिओ व पुस्तके वाचनेही तितकंच गरजेचं आहे.
  • आवळा,मुरंबा खात जा
  • जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात. ते 7-7 किंवा 8-8 तास एकाच जागेवर बसून अभ्यास करत असतात. त्यामुळे त्यांचं सगळ्यात पहिले नुकसान होत ते म्हणजे त्यांचं पोट खराब होत. जर तुम्ही आवळ्याचा मुरंबा खाता तर कधीपन जीवनात तुमचा पोट खराब नाही होणार. आवळ्या मध्ये व्हिटॅमिन C हे जास्तीत जास्त प्रमाणात असतात. जे प्रत्येक प्रकारच शारीरिक व मानसिक थकावटिला दूर करत,
  • मुरंबा:
  • जो असली मुरंबा असतो तो मधापासून बनतो आणि मध असत ते उत्तम source आहे fructose साठी. आपला जो मेंदू असतो तो fructose वरच चालतो. मध जे असत ते एक प्रकारे तुमच्या मेंदूला एक उत्तम प्रकारची शक्ती देत असतो. आवळ्याच्या मुरम्बामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतात. आणि त्यामुळे आपला Concentration पॉवर हि वाढते त्यामुळे जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुमचं जे लक्ष आहे ती बिलकुल विचलित नाही होणार.
  • अशा करतो तुम्हाला दिलेली "स्पर्धापरीक्षा पास होण्यासाठी टिप्स" माहिती नक्कीच आवडली असेल.
  • तुमचा अमूल्य वेळ दिल्याबदल धन्यवाद,


"करिअर निवडताना क्षमता,कमजोरी ,कौशल्य,योग्यता  जाणून घेणे खूप महत्वाचे असते" 
how to choose career in marathi
  • Strength(क्षमता),Weakness(कमजोरी),Talent(कौशल्य),Aptitude(योग्यता)
  • Strength: (सामर्थ्य)

अशी गोष्ट तुम्ही शारीरिक आणि मानसिक रित्या कितीही वेळा करायला लावली तरी तुम्ही त्यासाठी क्षसम आहात.
सचिन तेंडूलकर ला त्याची क्षमता माहित होती तो मानसिक आणि शारीरिक रित्या खूप वेळ क्रिकेट खेळण्यास क्षसम होता. व त्याने त्याचे जे स्किल व त्याच्यातला क्षमताचा योग्य जागे वापर केला. त्याला स्ट्रेन्थ म्हणतात
Weakness: (कमजोरी)
अशी एखादी गोष्ट ती तुम्ही करता पण ती इतकी चांगली नाही करू शकत. इफ्फेक्टीव्ह पणा नसतो त्यात अशा गोष्टी.
  • Talent: (विशेष कोशल्य)

 नैसर्गिक देवाकडून पहिलेच किवा असा काहीतरी जगावेगळा स्पेशल करून दाखवण्याची कला अवगत असणे.
  • Aptitude: (योग्यता)

अशी परीक्षा ज्या मध्ये तुमच्या मध्ये एखाद्या विषयामध्ये किती नॉलेज हे टे चेक केल जाते.
का हव्यात चार गोष्टी ?
  • वरील चारही   गोष्टी माहिती असणं खूप महत्वाच्या आहेत Strength आणि विकनेस का तर, तुम्हाला  योग्य वेळेतच  माहित असेल कि तुम्ही काय करू शकता आणि काय करू शकत नाही. तुम्ही फक्त तेच करा जे तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता आणि जे तुम्ही नाही करू शकत त्याला सोडून द्या, जर तुम्हाला तुमच्या मधला टॅलेंट कळलं तर तुम्ही एवढा तर नक्कीच विचार करू शकता कि ह्या वेळेस हे मी आता इतक्या उत्तम प्रकारे नाही करू शकत पण जर मी अजून थोडी मेहनत केली तर मी पुढच्या वेळेस पक्का उत्तम करू शकेल. आणि त्या मुळे ह्या चारही गोष्टीची माहिती असणे खूप महत्वाच आहे. आणि त्यामुळे त्या साठी तुम्हाला प्रोफेशनल पद्धतीने मदत घेतली पाहिजे. आणि हि प्रोफेशनल मदत तुम्हाला तीन लोकांकडून घ्यावी लागेल psychologist, psychiatrist, करिअर कॉन्सेलर.
  • psychologist आणि psychiatrist का ?

तुमच्या मध्ये कुठल्या प्रकारच talent आहे. तुम्ही कशा प्रकारचे व्यक्ती आहत आणि तुम्ही काय केल पाहिजे.
  • करिअर कॉन्सेलर कशासाठी ?

तुम्हाला जे काम करायचंय ते तुम्ही कशा प्रकारे करु शकता आणि ते तुम्ही कुठून कुठून केले पाहिजे. psychologist, psychiatrist , 
  • करिअर कॉन्सेलर ह्यांना शोधायच कस ?

तुम्ही गूगल वर शोधू शकता तुम्हाला तुमच्या जवळचा psychologist ,psychiatrist, करिअर कॉन्सेलर सहज भेटेल. व त्यातून उत्तम psychologist , psychiatrist,,करिअर कॉन्सलॉर कोण आहे ते तुमच्या एरियातला असा व्यक्ती ज्याला योग्य नॉलेज आहे त्याकडून विचारून घ्या,
खर्च :
  • एकूण खर्च : 5 ते 10 हजार व 7 ते 8 तास खर्च होतील
  • फायदा :

तुम्हाला एकदम योग्य कळेल कि तुम्हाला कोणती लाईन निवडायची ती  आणि मग तुम्ही तुमच्या करिअर मध्ये कमाल करून दाखवणार,
  • तुम्ही 9 वि आणि 10 वि मध्ये आहात

एकदम योग्य टाईम आहे ह्या तिनी लोकांना भेटायचा,
  • तुम्ही ह्या पुढील वर्गात कॉलेज ला आहात.


तुमचं अभ्यासात लक्ष नसेल लागत, कमी मार्क मिळत असतील, नोकरीत मन नाही लागत, तरीही तुम्ही ह्या तिनी लोकांना जरूर भेटल, पाहिजे
आशा करतो तुम्हाला दिलेली "करिअर निवडताना क्षमता,कमजोरी ,कौशल्य,योग्यता  जाणून घेणे खूप महत्वाचे असते" माहिती तुम्हाला आवडली असेल, धन्यवाद तुमचा वेळ दिल्याबद्दल.  

"करिअर निवडताना बेस्ट प्लानिंग कस कराल त्यासाठी कुठल्या प्रकारची माहिती हवी आहे जाणून  घ्या  आत्ताच " 
how to choose career plan in marathi
करिअर निवडायचा बेस्ट प्लान कसा कराल आताच जाणून घ्या 



  • करिअर प्लानिंग कशी करतात आणि उत्तम करिअर प्लानिंग करण्यासाठी कोणत्या गोष्टीवर लक्ष द्यावा लागेल.
  • खूप लोकांचा विचार असा असतो कि एक चांगला करिअर प्लान म्हणजे एक चांगल्या परीचया पासून सुरु होतो. आणि ऑफर लेटर वर संपतो.
  • पण खर तर चांगला करिअर म्हणजे परिचया पासून सुरवात होते. आणि चांगला करिअर देत.आणि तो करिअर मेल्यानंतरही चालू असतो.
  • उदाहरणार्थ:

काम हे आपल्या आयुष्यातला अर्धा हिस्साच आहे ८ तास आपण कामं करतो, ८ तास आपण आराम करतो आणि उरलेले ८ तास आपण बाकीचे काम करतो. तुमच काम तुमची ओळख निर्माण करून देत असतो. हा कोण हे, हा शिकवतो म्हणजे शिक्षक आहे, हा गाडी चालवतो म्हणजे चालक आहे, हा जेवण बनवतो म्हणजे कुक आहे, हा चोरी करतो म्हणजे चोर आहेजी काम तुम्हाला ओळख निर्माण करून देते. ते काम तुम्ही मन मारून रविवारच्या सुट्टीचा विचार करता करता केल तर. आणि तुम्ही काम केलही तरी तुम्ही काही मिळवू नाही शकत. अचिव्ह(Achive ) नाही काही करू शकत. तुम्ही जे काही काम करत आहात ते काम करण्यात तुम्हाला मजा येत नसेल तर याचा अर्थ भलेही तुम्ही १०० मैल चालाल पण त्याच जागेवर उभे आहात. पुढे नाही जाणार. म्हणजे काम तर करत आहात पण पोहोचत कुठेच नाही अचिव्ह(Achive) काहीच होत नाही.
  • जगात चार प्रकारची लोक असतात.
  • १) ज्यांना नोकरी करायची असते पण त्याच्यात क्षमता नसते.
  • २) ज्याना नोकरी करायची आहे. क्षमता पण असते पण नोकरीच नाही लागत. "नोकरी का नाही लागत अशा लोकांची त्यांच्या ज्या स्किल साईड(Skill Side) आहेत. त्या नोकरी साठी योग्यता नाहीत. ते मास्टर, डिग्री करूनही त्यांच्या स्किल उच्च दर्जाच्या नाहीत म्हणून ते क्लर्क साठी आवेदन करतात. "जरा विचार करा कि तुम्ही मास्टर , डिग्री, पी.एच.डी क्लार्क च्या नोकरीसाठी केली होती का.
  •   ३)  नोकरी करायची असते. क्षमता असते नोकरी पण लागते. पण नोकरी पसंद नसते. " ९०% टक्के लोक ह्याच प्रकारचे असतात. ते पूर्ण आठवडा सुट्टीचा विचार करत असतात. आणि सोमवारी पूर्ण मूड ऑफ असतो ह्या लोकांचा. आणि शनिवारी चला पीछा सुटला पिडा टळली. अशा प्रकारची अवस्था असते. ९०% लोकांच असच होत आणि त्याचं आयुष्य असच चालत. म्हणजे हा जो व्यक्ती असतो ५,१०,२०,४०, वर्ष पर्यंत तेच काम करतो जे त्याला आवडत नसत. तो त्या कामाला त्यामुळे करतोय कारण त्याला पैसा हवा असतो. त्याला ते काम करून काही मजा नाही येत. "पहिली गोष्ट हि आहे कि करिअर कौन्सिलिंग च्या नावाखाली आजही काहीच नाही होत".
  • खूप विद्यार्थ्यांचा कल असा असतो कि गणित घेतल तर इंजिनिअर बनू, बायोलॉजी घेतल तर डॉक्टर बनू, कॉमर्स घेतल तर Charted Accountant बनू, आणि एल.एल.बि. केल तर वकील बनू, ५००० प्रकारच्या नोकऱ्या आहेत. ज्याच्या बद्दल लोकांना माहीतच नसत. अशी खूप सारी लोक हेत त्यांना हेच माहित नाही जर तुम्हाला एक दोन गोष्टीमध्ये जरी नैपुण्य असले तरी तुम्ही आरामात १५ टे २०,००० हजारा पर्यंतची नोकरी करू शकता. प्रत्येक नोकरी साठी एक प्रकारच स्किल लागत. जर तुम्हाला त्या स्किल बद्दल योग्य ते ज्ञान मिळवल तर नोकरी भेटेल. जर तुमच करिअर कौन्सिलिंग झालच नाही आहे. तुम्हाला माहितच नाही हे ५००० प्रकारच्या नोकऱ्या व त्यासाठी काय स्किल लागत ते. त्यामुळे अशा तीन प्रकारची लोक भेटतात.
  • ज्यांना नोकरी करायची असते पण त्याच्यात क्षमता नसते, ज्यांना नोकरी करायची आहे क्षमता पण असते पण नोकरीच नाही लागत,  नोकरी करायची असते. क्षमता असते नोकरी पण लागते. पण नोकरी पसंद नसते. आणि हे सगळ अस का झाल कारण कधी करिअर कौन्सिलिंग झालीच नाही.
  • १० वि, ११ वि, १२ वि, पहिला वर्ष, दुसरा वर्ष, तिसर वर्ष , चौथे वर्ष, हे विद्यार्थ्याचे महत्वपूर्ण वर्ष असतात.
  • पण  १० वि, ११ वि ,१२ वि, पहिला वर्ष, दुसरा वर्ष, ह्या वेळेत कुठ्ल्याही विद्यार्थ्याला कान नसतातच.
  • जेव्हा तो तिसऱ्या-चौथ्या वर्षात जातो. फाईनल वर्षात जातो तेव्हा तो इंटरनेट पुस्तक वैगेरे वाचतो. तेव्हा त्याला कळत कि यार मला तर खूप अशा गोष्टी माहितच नाही आणि मला अजून काहीच ज्ञान नाही. मला तर माझ्या विषयाचं सुद्धा इतक माहित नाही. आणि मला अजून नीट इंग्लिश सुद्धा येत नाही. आता हा पूर्ण शुद्धीत येतो. अशा वेळेस त्याला जे काही सांगितला जात तो ते करेल, पण वेळ नाही हे, काही विद्यार्थांना अजूनही कसलाच थांग पत्ता नसतो ते ग्रेजुएशन(Graduation) करतात. मग एम.बि.ए ला जातात. मग स्पर्धापरीक्षा देतात. आणि दोन तीन वर्ष तयारी करतात. मग जी नोकरी भेटेल ती करतात. सरकारी नाही जी भेटेल ती करतात. आणि बाकीच आयुष्य रविवार-शनिवारच्या सुट्टीची वाट बघत निघून जाते. ९०% असच काही तरी होत.
  • बाकीचे १० टक्के मूल असतात. ते एक तर १० वि लाच जागे होतात नाहीतर, पहिल्या वर्षीतर कशेही जागेच होतात आणि 
  • अशी मुल ४) था प्रकार बनवतात नोकरी पण लागते. आवडते सुद्धा. आणि क्षसम सुद्धा असतात.
  •  अशा लोकांसाठी सात हि दिवस एकसारखेच असतात. आणि ते खूप सारा आनद घेऊन येतात त्यांच्या आयुष्या मध्ये.
  • पण ह्याचा अर्थ असा नाही आहे कि आता काहीच नाही होऊ शकत. जेव्हा तुम्ही जागे होणार तेव्हा सकाळ मी आता जे काही रूल सांगेल ते वापरले तर तुमच्या आयष्यात निराशा नाही येणार. आणि ६ महिनेच करा. ६ महिन्यात काही जादू नाही होणार. जुने पाप हळू हळू धुतले जातील.
  • जर तुम्ही १ वर्षापर्यंत हे रुल वापरलेत तर तुम्ही शानदार करिअर बनवाल.
  • चांगला करिअर बनवण्यासाठी तुम्हाला हे रूल वापरावे लागतील ह्याच क्रमात करावे लागतील आणि ह्यात थोडा सुद्धा बदल करून चालणार नाही जसा आहे तसाच करा.
  • १) सर्वात पहिले कागदावर लिहा तुम्हाला कोणत्या ५ गोष्टी हव्यात ज्या तुम्हाला तुमच्या नोकरी मधून हव्यात आणि जे जास्त महत्वपूर्ण हे तुमच्यासाठी ते सगळ्यात वरती लिहा. आणि जे इतका महत्वपूर्ण नाही हे तुमच्यासाठी ते खाली लिहा. ह्याचा एक फायदा आहे कि तुम्ही शनिवार रविवारची वाट नाही बघणार जेव्हा तुम्ही नोकरी कराल. ह्यात सगळ एकदम इमानदारी मध्ये लिहा कारण हा कागद तुम्हाला कुणाला दाखवायचा नाही आहे.
  • २)तुम्ही स्वताला ओळखा. काही लोक असे असतात कि ते स्वत:ला ओळखूच शकत नाही कारण त्यांना कोणी विचारतच नाही कि सांग तुझी मनापासून तुझी इच्छा काय आहे. आणि ह्याचा तोटा तेव्हा होतो जेव्हा मुलाखतीत विचारतात कि तुमचा छन्द (hobby) काय आहे. तुझ्या मध्ये काय अस ज्ञान हे त्यात तु बहाद्दूर आहेस.(strenght). तुजी कमजोरी काय (weakness) काय आहे. आणि मग त्यामुळे सगळ्यांच्या छन्द (hobby) असतात गाणे एकने. आणि 
  • (Strenght)  विचारला तर सांगतात कि प्रामाणिक आहे, हार्ड-वर्किंग आहे. आणि कमजोरी मध्ये हि सामान्य असे काही तरी सांगतात. तुम्ही केव्हाही आयुष्यात इंटरव्ह्यू देणार तर ह्या ४ गोष्टी केव्हाही विचारल्या जातील.

  • १.परिचय(Introduction)


  • २.छन्द(Hobby)


  • ३.शक्ती ( Strenght)


  • ४.कमजोरी (Weakness)


  • ह्या चार गोष्टी नेहमी विचारतात म्हणून ह्या बद्दल आपल्याला माहिती पाहिजे. आणि ह्या गोष्टी, ह्या साठी पण माहिती पाहिजेत कि आपण काय करण्यासाठी क्षसम आहोत आणि काय करण्यासाठी क्षसम नाही. तुम्ही  व्हाटस एप(Whats App) वर वाचलेच असेल कि (Nothing Is Impossible) पण अशा गोष्टी जिथे पाहिजेत तिथेच वापरा सगळीकडेच नका वापरू कारण काही गोष्टी अशा असतात कि योग्य माणूस ते काम करू शकतो. प्रत्येक गोष्ट आपण नाही करू शकत. तर तुम्ही तुमच्या शक्ती (strenght) आणि कमजोरी (weakness) पहिले शोधा मगच त्या हिशोबाने पुढे वाटचाल करा.
  • तुमच्या शक्ती (strenght) आणि कमजोरी (weakness) माहित करून घेण्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे.
  • SWOT Analysis [शक्ती ( strenght),कमजोरी (weakness),संधी(Oportunity),(Threats)] याचं विशेल्षण
  •  दोन भाग करा एका भागात तुमचे शक्ती लिहा, दुसऱ्या याच्यात तुमच्या कमजोरी लिहा. हे दोन्ही लिहिण्यात तुम्ही कितीही लोकांची मदत घेतली तरी चालेल, तुमचे आई बाबा, मित्र, शिक्षक, आणि हे दोन्ही भाग लिहिल्यावर तिसरा भाग बनवा. आणि त्यात लिहा तुम्ही शक्ती आणि कमजोरी या दोन्ही बाजूंचा विचार करून तुम्ही काय काय कामं करू शकता. ४ भाग बनवा त्यात लिहा शक्ती आणि कमजोरी याचा विचार करून तुम्ही करू शकलेले काम काय चुकीच केल तर बिघडेल.
  • ३) Never Work On Weakness(तुमच्या कमजोरीवर काम करू नका)

  • कधीही तुमच्या कमजोरीला दूर करण्याचा प्रयत्न करू नका त्यांना तसच राहू द्या. पण जर तुमची कमजोरी तुमची मजबुरी बनत असेल. तर मग त्याच्यावर मेहनत करा आणि मन लाऊन मेहनत करा.
  • तुम्हाला याच एक उदाहरण देतो.

सचिन हा गणितामध्ये ८० गुण मिळवतो व इंग्लिश मध्ये ५० तर त्याने गणिताचा अजून अभ्यास केला पाहिजे जर त्याने गणिताचा अजून अभ्यास केला तर तो ९०-१०० पर्यंत पोचू शकतो. राहुल हा गणितामध्ये ३५ गुण मिळवतो व इंग्लिश मध्ये ८० तर त्याने इंग्लिश चा अभ्यास केला पाहिजे कारण जर त्याने इंग्लिश चा अभ्यास नाही केला तर तो नापास हि होऊ शकतो. राहुल ची इंग्लिश त्याची कमजोरी नाही तर टी आता त्याची मजबुरी आहे.म्हणून आता राहुल ला इंग्लिश साठी मेहनत करावी लागेल.आणि ती मन लाऊन मेहनत केली पाहिजे.
  • अस का तर जितक्या वेळेत तुम्ही तुमच्या कमाजोरीला दूर करू शकता. आणि तितक्या वेळेत तुम्ही तुमच्या शक्तीला १० पटीने वाढू शकता.
  • ४) तुमच्या शाळेतील, महाविद्यालयातील शिक्षकांना नेहमी गुड मोर्निंग, वैगरे बोलत जा आणि तुमच्या वडीलधारयाशी खूपच अज्ञापुर्वक वागा त्यांना मान सन्मान द्या, आणि आपल्या शिक्षकाना नेहमी विचार त्यांना सांगा सर माझ्या लायक काही काम असेल तर जरूर सांगा, आणि ते काम करण्यास थोडा फार त्रास झाला तरी तो त्रास सहन करा.

  • अस का तर कारण जेवढ्या नोकरया आहेत त्यातल्या ५ टे १० टक्के नोकर्याच वर्तमान पत्र व इंटरनेट वर असतात.  त्यांच्या जाहिराती केल्या जातात. बाकी सगळ्या ७५  टक्के नोकऱ्या ज्या असतात. त्यांची जाहिरात कधीच होत नाही. त्या सर्व नोकऱ्या अंतर्गत संदर्भ(Internal Reference) वापरून दिल्या जातात. म्हणजे कंपनीचा व्यवस्थापक(Manager) असतो तो सगळ्यांना सांगतो कि आपल्या कंपनी मध्ये नोकरी आहे तर बघा कुणी आहे का तुमच्या ओळखीचा तुमच्यासारखा चांगला काम करणारा.म्हणजे ७५ टक्के नोक्ररयाबद्दल तुम्हाला माहितच नाही होत कि कुठे नोकऱ्या आहेत का नाहीत. आणि सगळ्यात मोठा प्रश्न हा पडतो कि अंतर्गत संदर्भ (Internal Reference) असतो तो आणायचा कुठून तो येतो तुमच्या Respect ने बघा तुमचे जे वरिष्ठ(senior)आहेत. त्यांना तुमच्या आधी नोकरी लागणार. महाविद्यालयात जेवढ्या नोकऱ्या भेटतात (Campus) तेव्हा तुम्ही वरिष्ठ(senior) ला जाऊन विचारू शकता कि सर काय काय प्रश्न(Question) विचारतात. आणि भलेही तुम्हाला त्या प्रश्नांची(Questions) उत्तर(Answer) माहित नसतील तरी तुमच्या कडे पूर्ण सेमिस्टर असतो. त्या प्रश्नांची उत्तरे शोधायला. भलेही त्याच सिलेक्शन नाही झाल तरी तुम्हाला प्रश्न तर माहित पडतात. भलेही त्याला नोकरी लागली या नाही लागली तुम्ही नक्की नोकरी लागणार. दुसरा फायदा ज्या वरिष्ठची(Senior)ची नोकरी लागते. तुम्ही त्याला पूर्ण वर्ष मान दिला होता गुड मोर्निंग वैगेरे बोलला होता. जेव्हा कधी त्यांच्या कंपनी मध्ये जागा शिल्लक राहतील तेव्हा अंतर्गत संदर्भ (Internal Referance)तुम्हाला भेटणार. अस का होणार कारण तुम्ही त्या वरिष्ठाची(Senior)ची तेव्हा इज्जत केली होती. जेव्हा त्यांचे आई-वडील त्याला सक्षम समजत नव्हते.
  • ५)Invest Your Self(तुमच्यावर खर्च करा)
  • तुमच्यावर खर्च करा म्हणजे गाडी घेणे. मोबाईल घेणे अस नाही. तुमच्यावर खर्च करणे याचा अर्थ असा होतो कि तुमचा वेळ आणि पैसा अशा ठिकाणी खर्च करा कि तुमच ज्ञान आणि पेसा, क्षमता वाढतील अशा ठिकाणी खर्च करणे. 
  • जेव्हा वेळ असेल तेव्हा पुस्तक वाचा, प्रेरणात्मक (Motivational) पुस्तक वाचा, किवा तुमचे सर्व विषय असतात त्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या विकीपेडिया च्या माध्यमातून, इंग्लिश शिका, शरीर कमवा (build Body), लायबरीमध्ये जा, ह्याचा फायदा हा होतो कि तुमचा सारांश(Resume) जो असतो तो खूप वजनदा होतो, यशस्वी होण्यासठी तुम्ही जे काही कराल ते सर्व तुम्ही फेसबुकवर जरूर अपलोड करा जेवढे H.R असतात. तेवढे कुणालाही कंपनी मध्ये जॉईन करण्या आधी त्याची फेसबुक प्रोफाईल जरूर बघतात. त्याच्या मुळे नेमकी अंदाज येतो कि समोरचा व्यक्ती आहे तो  कशा प्रकारचा, तुमच फेसबुक अकाऊंट एकदम नीटनीटक ठेवा कारण ते बघितल्यावर समोरच्याला वाटला पाहिजे समोरचा व्यक्ती खुपच  शिकलेला(Well-Educated)आहे.
  • जेव्हा तुम्ही प्रेरणात्मक पुस्तक वाचता तेव्हा तुम्हाला एक पोजिटीव्ह(Positive) एनर्जी भेटते. जेव्हा तुम्ही तुमचे विषय विकिपेडिया(Wikipedia) वर अजून जाणून घ्यायचा प्रयत्न करता तर तुम्हाला कळततुम्ही ज्या विषयच अभ्यास करता ते नक्की सध्या चालू काय आहे. आणि जेव्हा तुम्ही इंग्लिश शिकता तेव्हा तुम्ही स्वतःविचार करा ४ वर्ष नंन्तर तुमच्या इंग्लिश ची लेव्हल किती उत्तम होईल. जेव्हा तुम्ही शरीर कमावता(body build)करता तेव्हा तुमच शरीर अभिमानाने सांगते माझ व्यक्तिमत्व (Personality) तर बघा. जेव्हा तुम्ही नोकरी करता तेव्हा तुम्ही खरतर पूर्ण जग बघत असता नक्की काय होत ह्या जगात ते अनुभवत असता. एवढा सगळा करून जेव्हा तुम्ही मुलाखतीला जाणार तर तुम्हाला बघून अस वाटणार कि जसा काय एखादा वाघ चालत येतोय. एवढा सगळा केल्यानंतर तुमच्या चारित्र्याने(Profile) आणि फेसबुक प्रोफाईलने तुमचा ८०% काम तर केलेलच आहे.
  • आणि २०% टक्के काम हे आहे कि तुम्हाला त्यांना सांगायचं आहे. समजवायचं आहे कि बोलायचे आहे कि तुमच्या समोर जो व्यक्ती उभा आहे तो मीच आहे.
  • करिअर निवडताना बेस्ट प्लानिंग कस कराल त्यासाठी कुठल्या प्रकारची माहिती हवी आहे ह्या पूर्ण मार्ग दर्शन व दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल अशी मी अपेक्षा करतो व तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद ...!




MKRdezign

{facebook#https://www.facebook.com/j2bhava/100410737340707/} {twitter#https://twitter.com/j2bhava} {google-plus#https://plus.google.com/114529621498499588003} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {youtube#https://www.youtube.com/channel/UCsLUUQt3dOSuG_gLMn3UZvw} {instagram#https://www.instagram.com/j2bhava/}

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget