"इंग्लिश स्पीकिंग कोर्स साठी बेस्ट पुस्तक . त्या पुस्तकांचा वापर केलात तर तुम्ही धडाधड इंग्लिश बोलू शकता"
![]() |
इंग्लिश शिकण्यासाठी बेस्ट पुस्तकांची माहिती व कशा क्रमवारीत अभ्यास करायचा संपूर्ण मार्गदर्शन |
- आज मी तुम्हाला काही इंग्लिश शिकण्यासाठी काही दर्जेदार
पुस्तकांची माहिती देणार आहे
- जर तुम्हाला इंग्लिश शिकायचं असेल तर हा लेख खूपच
महत्वाचा आहे. आणि तुमच्याकडे हि पुस्तके पाहिजेतच. नेमकी
होत काय कि विद्यार्थी शिक्षकांकडे जातात आणि सांगतात कि आम्हाला व्याकरण
शिकायचं हे तर तुम्हाला सांगितला जात कि wren & martin पुस्तकातून शिका. आणि हे पुस्तकाच नाव तर खूप जणांना
माहितच हे. पण तुम्ही स्वत:विचार करा कि जर एखादा पुस्तक खूप लोकप्रिय असेल
आणि खूप जन सांगतात पुस्तक पण छान आहे. मग सगळे जन इंग्लिश का नाही
बोलू शकले.
- काही जन कोचिंग लावतात. आणि कोचिंग वाले हे सांगतात. कि
तुम्ही ७० तासात,
१० दिवसात, ३ महिन्यात इंग्लिश बोलू शकाल अस हि सांगतात. पण तुम्ही
ह्या गोष्टीचा हि जरा विचार करा कि कुठली भाषा जी इतकी सोपी हे का जिला
तुम्ही ७० तासात,
१० दिवसात किवा ३ महिन्यात हि खरच
शिकू शकता का ?
जर अस असत तर जगातल्या सगळ्या भाषा
संपल्या असत्या आणि सगळ्यांनी इतकी सोपी भाषाच शिकली असती. कारण हिला कमी
वेळात शिकल जाऊ शकत.
- जो मुलगा इंग्लिश माध्यमातून (English Medium) शाळेत १२ वर्ष शिकतो. १ ते १२ वि इंग्लिश माध्यमातून
शिकतो. मग तो इंग्लिश मधून का नाही बोलू शकत. त्याच फक्त एक कारण हे आणि
त्याच कारण हे आहे कि इंग्लिश एक भाषा आहे आणि कुठलीशी भाषा शिकायची असेल तर
पहले त्या भाषेचे वाक्य शिका.आणि नंतर त्याच व्याकरण शिकायचा प्रयत्न करा.
मराठी आपल्याला त्यामुळे येते कारण कि आपण मराठीचे चे पहिले वाक्य शिकलो मग
व्याकरण(Grammar)
शिकायचा प्रयत्न केला. इंग्लिश
आपल्याला का येत नाही कारण शिक्षकांनी पहिले आपल्याला व्याकरण(Grammar) शिकवलं. आणि मग त्यानंतर ते बोले इंग्लिश मध्ये बोला
नाहीतर मग शिक्षा करणार. म्हणून कितीही प्रयत्न केला तरी मी तेवढी भारी
इंग्लिश नाही बोलु शकत. जेवढा चांगला भारी मराठी बोलू शकतो.
- आपल्याला इंग्लिश त्या पुस्तकातून शिकावल गेल. ज्या
पुस्तकाचे प्रकाशक कमिशन द्यायचे, आणि कमिशन तो देतो जी रद्दी असते ज्याच्या पुस्तकात काही
दम नसतो. जे पुस्तक मार्केट मध्ये विकल जात नाही अस पुस्तक तो शाळेत जाऊन
चिटकून देतो. अशा पुस्तकातून विदयेची ज्योत प्रज्वलित करण म्हणजे खूप कठीण
असत.
- जर तुम्हाला खूप चांगल इंग्लिश शिकायचं असेल तर खूप
महत्वाच हे कि खूप चांगल्या पुस्तकातून शिका. आणि चांगली पुस्तक जी असतात हे
फक्त चांगले शिक्षकच लिहू शकतात.
- आता ज्या पुस्तकांची नाव सांगणार हे ते खूप चांगल्या
शिक्षकांकडून लिहिली गेली आहेत तर तुम्ही जरूर वाचा.
- पुस्तक (Book) :English Conversation
Practice लेखक:
ग्रांट टेलर(Grant
Taylor)
- जर तुमची इंग्लिश शिकायची इच्छा आहे तर हे पहिले पुस्तक
हे जे तुम्हाला वाचायला पाहिजे. हे पुस्तक वाचल्या नंतर तुम्हाला व्याकरण(Grammar) अपोआप समजायला लागेल. तुम्ही व्याकरणाचा(Grammar) एक शब्द पण नाही शिकणार पण तुम्हाला कामासाठी लागणारे
व्याकरण हे
पूर्ण येईल. आणि एक गोष्ट समजून
घ्या जेव्हा तुम्ही कुठल्या इंग्लिश क्लास मध्ये जाता आणि ते तुम्हाला
सांगतात कि ७० ते ८० तासात शिकवणार ते तुम्हाला Structural Grammar शिकवतात. आणि ते Structure
जवळ पास ६० असतात. आणि हे पुस्तक
वाचून तुम्ही ७८३ structure
शिकणार आणि जे दररोज बोलतो. ते
सर्व आरामात बोलू शकणार. आणि हि गोष्ट पण लक्षात ठेवा कि इंग्लिश बोलायचं
म्हणजे हे नाही कि ५० लोकांच्या समोर उभे राहिले आणि आणि कुठल्या तरी विशेष
गोष्टीवर भाषण देणे बोलणे. रोज च्या वापरात जे बोलतो ते जमलं म्हणजे इंग्लिश आली.(ए सरकणं तिकडा ,वेडा झालाय का,जाम भारी रे) हि वाली इंग्लिश बोलायला शिकाल. ह्या पुस्तकाला ८ वेळा वाचल पाहिजे आणि मग तुम्ही दुसरा
कुठला तरी पुस्तक उघडा.
- पुस्तक (book): Essential English
Grammar लेखक: रेमंड मर्फी(Raymond Murphy)
- ह्या पुस्तकच तुम्हाला सेकंड एडिशन घ्यायचं आहे. इंग्लिश
चे बेसिक शिकण्यासाठी ह्याच्या पेक्षा उत्तम पुस्तक आज पर्यंत लिहिल गेल
नाही. ह्या पुस्तकात व्याकरण टिपिकल पद्धतीने नाही शिकवलं. काय करायला पाहिजे, काय
नको करायला पाहिजे अस बाकीच्या पुस्तकांसारखा नाही शिकवलं, ह्या
पुस्तकाला वाचल्यानंतर तुम्हाला आपोआप कळेल काय करायला पाहिजे आणि काय नको.
टेन्स आणि मोडल्स हे तुम्हाला सोप्या पद्धतीने समजतील. तुम्ही इंग्लिश किवा
मराठी माध्यमाचे असुद्या तरीसुद्धा कुणी हि सोप्या पद्धतीने समजू शकाल.
- पुस्तक (book):English Grammar For
Dummies लेखक : Geraldine Woods
- खूपच चांगले उदाहरण दिलेत आणि खूपच चांगल्या पद्धतीने
इंग्लिश मध्ये प्रत्येक गोष्ट समजून सांगितली आहे. आणि तुम्हाला ह्या
पुस्तकातून एक गोष्ट कळेल कि किती व्याकरण शिकणे जरुरी आहे. आणि किती व्याकरण
जास्त शिकाल तर ती Overacting होईल.
लेखकाच लिखाण खूप मजेदार आहे. जेव्हा तुम्ही हे पुस्तक वाचाल तेव्हा खूप वेळा
हसाल. लेखक हा ४० वर्षापासून इंग्लिश शिकवत आहे. जर तुम्ही इंजिनीरिंग करत
असाल तर हे पुस्तक तुमच्याकडे पाहिजेच. हे पुस्तक तर तुम्हाला ४ हि वर्षे
पाहिजे होते.पण तस नसल्यामुळे हे पुस्तक तुम्ही स्वत: वाचा.
- पुस्तक(book):Practical English Usage लेखक :Michael Swan
- ह्या पुस्तकात लेखकाने तेवढच व्याकरण शिकवलंय जेवढा शिकन
जरुरी आहे. खूप जास्त हि नाही
आणि खूप कमीही नाही. हे पुस्तक जे
पहिल्यांदा इंग्लिश शिकतात त्यांच्यासाठी नाही हे. जर तुम्हाला इंग्लिश शिकत
असताना ४-५ वर्ष नसतील झाले तर आपण ह्या पुस्तकाचा फायदा नाही उचलू शकत. ह्या
पुस्तकचा फायदा हा आहे कि हे पुस्तक वाचताना तुम्हाला ब्रिटीश आणि अमेरिकन भाषेचा
अंदाज अनुभवायला भेटेल. आपल्याला नेहमी अमेरिकन इंग्लिश शिकली पाहिजे कारण
आपल्याला अमेरिका नोकरीच्या
संधी उपलब्ध करून देतात. हे पुस्तक
संभाषण सारख लिहिला गेल आहे हे पुस्तक वाचताना अस वाटेल कि तुम्ही लेखकाशी
बोलताय. जर तुम्ही शिक्षक असाल किवा भविष्यात तुम्हाला शिक्षक बनायचं असेल तर
हे पुस्तक तुम्ही जरूर वाचल पाहिजे. जेवढ्या आंतरराष्ट्रीय परीक्षा होतात व
तेथे इंग्लिश भाषेचा वापर होतो त्यासाठी हे पुस्तक अगदी उत्तम आहे.
- पुस्तक(book):Word Power Made Easy लेखक:Norman Lewis
- इंग्लिश व्होकॅबलरी शब्दभांडार दर्जेदार करण्यासाठी ह्या
पेक्षा उत्तम पुस्तक कुठलच नाही. ४७ सेशन आहेत ह्या पुस्तकात ते ४७ दिवसातच केले पाहिजेत.
- पुस्तक(book):On Writing Well लेखक: William Zinsser
- ह्या पुस्तकाचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला लिखाण नेमकी
कसा करावं, लिखाणाची योग्य पद्धत कोणती, खूप
छोटस पुस्तक आहे. पण ज्ञानाच सागर आहे. शाळेत आणि महाविद्यालयात नेमकी होत
काय जो जास्त लिखाण करतो त्याला जास्त गुण भेटतात. आपण प्रयत्न करतो जास्त
लिहिण्याच पण योग्य मुद्देशीर लिहिण्यात चुकीच ठरतो याचे जास्त नुक्सात तेवा
होते जेव्हा आपण स्पर्धा-परीक्षेत ह्या सर्व चुका करतो. ह्या पुस्तकाच अभ्यास
केल्यानंतर तुम्हाला अजून एक फायदा हा होतो कि जेवढे ओफ़िशिअल(Official) कागदपत्र
लिहिले जातात ते क्षे करतात. ह्याच ज्ञान भेटत.
- पुस्तक(book):The Element Of Style लेखक:William Strunk Jr.
- Engineers, BBA, MBA च्या विद्यार्ध्यानी हे पुस्तक वाचलच पाहिजे, हे पुस्तक तुमच्या लेखन कलेत नैपुण्य मिळून देणार आहे.
- पुस्तक(book):Brewer’s Dictionary Of Phrase
& Fable लेखक: Brewer’s
- जर तुम्ही इंग्लिश बारकाईने शिकू इच्छिता, जबरदस्त
इंग्लिश शिकू इच्छिता तर नक्की ह्या पुस्तकाचा वापर करा.
- पुस्तक(book): Rapidex Self Letter Drafting
Course लेखक: पुस्तक महाल
- ह्या पुस्तकात सगळ्या प्रकरचे पत्र दिलेले आहेत (letter-writting)जर
ह्या पुस्तकाचा चांगला अभ्यास केला तर अस कोणत पत्र नाही हे कि जे तुम्ही
लिहू शकणार नाही ह्या पुस्तकाचा अभ्यास केला तर तुम्हाला लिहायचा टोन समजता
येईल तुमच्या लिखाणातून तुमच्या भावना कळतील तुम्ही रागात आहात कि आनंदात.
- पुस्तक(book):Compact Oxford English
Dictionary लेखक:Henry Watson
Fowler
- ह्या पुस्तकांची खासियत हि आहे कि ह्या पुस्तकात कठीण
मधला कठीण शब्द सोप्या भाषेत समजून सांगितला गेला आहे. जर तुम्हाला कोणत्या
शब्दाचा योग्य अर्थ हवा असेल तर |Oxford
शिवाय दुसर कुठलच पुस्तक(Dictionary) नाही
आहे.
- पुस्तक(book):Cambridge International Dictionary
Of English लेखक:Cambridge
- ह्या पुस्तकांची खासियत हि आहे कि शब्दाचा अर्थ समजण्यासाठी खूप योग्य प्रकारे वाक्यांचा उदाहरण म्हणून वापर केला. आणि वाक्य पण अशे वापरलेत कि आपण वाक्य वाचताच शब्दाचा अर्थ बघायची गरज पडणार नाही व तुम्हाला योग्य तो अर्थ लगेच समजेल. जर तुम्हाला शिकायची हौस असेल पण तुमच्याकडे शिकण्यासारख काही नसेल. तर तुम्ही ह्या पुस्तकाचा अभ्यास करा. तुमची इंग्लिश खूपच उच्च दर्जाची होत जाईल.
- इंग्लिश स्पीकिंग कोर्स साठी बेस्ट पुस्तक ह्या पुस्तकांचा वापर केलात तर तुम्ही धडाधड इंग्लिश बोलू शकता. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करतो. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
टिप्पणी पोस्ट करा