रॅम म्हणजे काय


"रॅम म्हणजे काय  २ GB का  3,4GB नक्की किती असावी" 

ram meaning in marathi




  • रॅम म्हणजे काय व सगळ्यांना प्रश्न पडतो कि रॅम चा नक्की वापर काय होतो
  • रॅम(Ram) चा लॉन्ग फॉर्म Random Acess Memory तर ह्या लॉन्ग मुळे पण काही समजत नाही कि रॅम नक्की भानगड काय हे,
  • Ram म्हणजे कॉम्पुटर चा एक रामच समजा  संगणक डेटा स्टोरेज वारंवार प्रणाली सामान्य गती वाढवण्यासाठी कार्यक्रम सूचना वापरले जे स्टोअर्स
  • तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो आता, जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसता तेव्हा तुम्हाला खूप सारे विषय असतात, पण जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा एकाच विषयाचा करता आणि तुम्ही आता जर अभ्यासाला बसलात आणि तुम्हाला तर तुम्हाला जे काही लागत त्या विषया विषयी तुम्ही सर्व काही तुमच्या टेबलावर घेऊन बसता, तुमच्या खोलीतून आणून टेबलावर ठेवता आणि त्या विषयाचा अभ्यास करता, आता रॅम जी असते तीही टेबल प्रमाणेच करते, तुम्ही अस समजा तुमचा जो कप्पा आहे तो तुमचा मेमरी कार्ड आहे आणि तुमचा स्टडी टेबल तुमचं रॅम आहे, क्प्याम्ध्ये असतो वर्षभराचा अभ्यास आणि टेबलावर तुम्ही ठेवता जेवढा तुम्हाला लागेल तेवढा, तसच ram सोबत हि होत,
  • रॅम म्हणजे असत काय ?
  • एक खूप फास्ट मेमरी असते, जस कि तुमच्या 16 आणि 32 GB मेमरी कार्ड ला खर्च येतो त्याहून जास्त खर्च 1 GB च्या रॅम साठी येतो.
  • रॅमचा स्पीड जो असतो हा खूपच जास्त असतो खूप म्हणजे खूपच.
  • रॅम च काम असत जे काही CPU ला हवय ते लवकरात लवकर पोहोचवणं
  • जेव्हा तुम्ही एखादा Game इन्स्टॉल करता, किंवा कुठला सॉफ्टवेअर ते तुमच्या खरतर फोन मेमरी मध्ये इन्स्टॉल होत असत, रॅम मध्ये नाही होत. रॅम जेव्हा आपला फोन चालू होतो तेव्हा कामाला लागतो.
  • जर तुम्ही कुठला अप्लिकेशन उघडता तर तुमचं ते अप्लिकेशन उठून रॅम मध्ये येते, कारण जेव्हा तुम्ही अप्लिकेशन वापरता तर लवकरात लवकर जे पाहिजे ते तुम्हाला CPU तुम्हाला रॅम च्या मार्फत पाठवतो, आणि तुमच्या कडून घेतो सुद्धा.
  • तुमच्या मोबाईल मध्ये रॅम खूप कमी असेल आणि तुम्ही 4 अप्लिकेशन पटापट उघडले त्यानंतर 5 वा अप्लिकेशन उघडला तर पहिल्या 4 मधून CPU कुठल्याही दोन किंवा एकाला घालवतो रॅम मधून आणि जो तुम्ही ओपन करताय त्या अप्लिकेशन ला लोड करून घेतो रॅम मध्ये, मग तुम्ही परत पहिल्या अप्लिकेशन वर जाता तर त्या अप्लिकेशन ला लोड व्हायला टाईम लागतो. कारण CPU ला पुन्हा त्या अप्लिकेशन ला रॅम मध्ये लोड करावं लागत. म्हणून म्हणतात कि जास्त रॅम हि मल्टिटास्किंग करण्यासाठी खूप उपयोगी असते, मल्टिटास्किंग म्हणजे एकाच वेळास खूप साऱ्या अँप वर तुम्ही काम करू शकता,
  • एका वेळे तुम्ही 10,15,20,25 अप्लिकेशन लोड करू शकता तुमच्या रॅम ला कशाही प्रकारच लोड नाही येणार जर जागा जास्त असेल तर CPU कोणत्याही अप्लिकेशन ला रॅम बाहेर नाही काढणार आणि जसेही तुम्ही अँप्स मागे पुढे खोलनार ते पटापट उघडत जाणार
  • किती Gb रॅम ची गरज आहे ?
  • आता सध्याच्या स्थितीत तरी 2 GB रॅम हि पाहिजेच, जर 2 Gb पेक्षा कमी असेल तर थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो मोबाईलल साठी
  • अप्लिकेशन ची साईझ असते ती खूप जास्त वाढत चालली हे जस कि फेसबुक ची जी साईझ हे फेसबुक च अप्लिकेशन उघडता तर कमीत कमी तुमची 200-300MB रॅम वापरात येते,  अशेच खूप सारे अप्लिकेशन आहेत त्यांच जे साईझ हे ते वाढत चाललंय त्याच्या quality बरोबर त्यामुळे रॅम पण जास्त प्रमाणात वापरात येते,  जर तुम्हाला वाटत कि तुमचे जास्तीत जास्त अप्लिकेशन मल्टिटास्किंग वर ठीकठाक चालवेत तर कमीत कमी 2 GB तरी मोबाइल मध्ये असावी.
  • 4 ते 6 GB रॅम आजच्या वेळेला गरजेची हे का ?
  • गरजेची तर नाही हे काम तर तुमचं 2 किंवा 3 Gb नेही फर्स्ट क्लास चालेल पण रॅम अशी वस्तू आहे कि तुम्ही तिला नंतर बदलू नाही शकत अपग्रेड नाही करू शकत. स्टोरेज सारख नसत कि तुम्ही मेमरी कार्ड सारख टाकू शकता कमी जास्त, रॅम हि फक्त कॉम्पुटर आणि लॅपटॉप ला वाढवता येते मोबाइलची रॅम नाही वाढवता येत नंतर,
  • रूट केल तर  Ram वाढते का ?
  • खूप जणांना अस वाटत कि जर मोबाइलला रूट केलं व अप्लिकेशन टाकला तर रॅम वाढते पण तस काही नसत. ते अप्लिकेशन तुमच्या मेमरी ला फोन मेमरी किवा मेमरी कार्ड ला रॅम मध्ये कन्व्हर्ट करतात. पण रॅमला  खूप खूप जास्त स्पीड असतो तिला जर तुम्ही त्या खूप जास्त स्पीड ला नॉर्मल स्पीड बरोबर कॉम्पेअर करू शकता तर बिलकुल नाही करू शकत. मुकाबला बिलकू नाही होऊ शकत.अस केले तर तुमचा मोबाईल हा अजून स्लो होऊ शकतो त्यामुळे अशा कोणत्याही पद्धतीने मोबाइलला रॅम वाढवायचे प्रयत्न नका करू
  • कॉम्पुटर मध्ये हि तुम्ही ऐकले असेल कि पेनड्राइव्ह ने रॅम अपग्रेड करायचं तर ते एक टेम्पररी सोल्युशन आहे.त्याचा कवचितच इफेक्ट होतो अस नाही तुम्ही वापरू शकता कि तुम्ही 4Gb इंटर्नल रॅम आणि 4 Gb पेनड्राइव्ह झालं 8 Gb अस काहीच जास्त इफेक्ट होत नाही, थोडा 0.10 टक्के पडला तर
  • रॅम ची खास बात असते ती रॅम ची स्पीड सारखी नसते, सगळ्या 3Gb रॅम एकसारख्या नसतात, सगळया 2Gb रॅम एक सारख्या नसतात
  • प्रोसेसर चा जो स्पीड असतो तो गिगाहर्टझ मध्ये असतो तसाच रॅम चा हि स्पीड असतो रॅम मध्ये पण क्लॉक सिस्टम असते त्यामुळे ती जलद काम करते
  • तुम्ही रॅम वर वाचल असेल ?
  • त्यावर लिहिलं असत DDR1,DDR2,DDR3,DDR4 जर रॅम 800 मेगाहर्टझ असेल, 900मेगाहर्टझ असेल जितकी रॅम जास्त असेल तितकं चांगलं असेल, उलट पुढे जाऊन 2-3 वर्षांनी फायदाच आहे. जेव्हा अप्लिकेशन ची साईझ वाढेल तेव्हा ती रॅम कामात येईल
  • जास्त Ram चा फायदा ?
  •  आजच्या तारखेला जास्त रॅम चा मोबाईल घ्यायचा फायदा हा आहे कि तुम्ही जास्त कालावधी पर्यंत तुम्ही तुमचा मोबाईल वापरू शकाल
"तुम्हाला दिलेली रॅम म्हणजे काय २ GB का  3GB नक्की किती असावी माहिती आवडली असेल अशी अपेक्षा करतो."


धन्यवाद तुमचा वेळ दिल्याबद्दल...? 

टिप्पणी पोस्ट करा

Blogger
Facebook

MKRdezign

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget