Articles by "प्रेरणात्मक"

Mark Zukerberg यांचे विचार मराठीत

mark zukerber yanche marathi vichar
  •  तुम्ही यशस्वी बिझनेस-मेन बनू इच्छिता तर बिझनेसमन नका बनू Entrepreneur बना.
  • बिझनेसमन तो असतो जो जुन्या कल्पना वापरून स्वत:चा नवा बिझनेस सुरु करतो.
  • Entrepreneur तो असतो जो नव्या कल्पना वापरून नवा बिझनेस सुरु करतो.
  • सर्वात महत्वाच तुम्ही दुनियातला कुठल हि पुस्तक बघा नाहीतर, कुठलीही बायो-ग्राफी तुम्हाला त्या मध्ये एक ओळ नक्की भेटेल कि "काम तेच करा जे तुम्हा खुप जास्त आवडेल".
  • यशस्वी होण्यासाठी सगळ्यात आधी जाणून घेण महत्वाच आहे कि आपण काय केल पाहिजे. आणि तितकच महत्वाच हे पण जाणून घेण महत्वाच आहे कि आपण काय नाही करू शकत.
  • कोणत्याही बिझनेस ला यशस्वी बनवण्यासाठी तुम्हाला तो प्रोडक्ट किवा अशी सर्विस द्यायला पहिजे जी ग्राहकांना पहिजे असते. आणि ग्राहकांना काय पाहिजे, हे फक्त आणि फक्त ग्राहकच सांगू शकतो कुणी हि बिझनेस एक्स्पर्ट नाही सांगू शकत.
  • उतार-चढाव प्रत्येक बिझनेस मध्ये येत असतात पण जर तुम्ही ग्राहकांच मनपूर्वक ऐकला तर तुमच्या बिझनेस मध्ये उतार येतात ते खूप कमी येईल.
  • बिझनेस,करिअर,प्रोफेशन तुम्ही कशाचही उदाहरण घेऊन बघा तुम्हाला असा महारथी नाही भेटणार जो अयशस्वी झाला असेल. तुम्ही कुणाला बघत असाल जो जास्त यशस्वी आहे. तर तुम्ही निट जाणून घ्या त्याने खूप वेळ व भरपूर जास्त मेहनत केली असेल.
  • समजून घेणारा माणूस तो असतो. जो दुसर्यांच्या चुका बघून शिकतो पण जर तुम्ही काही अस करत असाल. जे तुमच्या अगोदर कुणीच नसेल केल आणि त्यात चूक झाली. म्हणून तुम्ही अस काम करा जे तुमच्या अगोदर कुणीच नसेल केल. तस केल्याने हि स्ट्रेटर्जी होते कि तुम्ही त्या चुका करता आणि त्या चुकापासून काही शिकता आणि पुढे जातात.
  • कुठ्ल्याही कामात यशस्वी होण्यासाठी दोन गोष्टीची गरज असते.
  • तुम्हाला माहित हवय तुम्ही नक्की काम काय करताय.
  • तुमच्या कडे अशी माणस हवीत जे तुमच काम चांगल्या पद्धतीने कुशलतीने करू शकतात.
  • तुम्ही कुठल्या शाळेत परीक्षा देत असाल किवा खूप मोठा बिझनेस चालवत असाल सगळ्यात पहिले नेहमी सोपी सोपी कामे करून घ्या.
  • वेळ,पैसा,आणि बुद्धिमत्ता योग्य कामासाठी वापराला तरच त्यापासून फायदा होतो. तुम्ही फाल्तू गोष्टीसाठी वापरत असाल तर तुम्हाला शेवटला फक्त झिरो भेटतो.
(आपल्या मनाची इच्छा असते आपल्याला हिरो व्हायचंय झिरो नाही)
  •  नेहमी खूप लांबचा विचार करावा(भविष्याचा तात्पुरता असा नाही) आणि पूर्ण लक्ष त्या भविष्यातल्या लांब वेळेवरच केंद्रित झाल पाहिजे. त्याचा सगळ्यात मोठा फयदा हा असतो कि तुम्हाला थोडफार अपयश आल तरी तुमच लक्ष भविष्यातल्या खूप वेळेचा विचार केला असल्यामुळे विचार खूप पुढचे व मोठे असतात. व त्यामुळे थोड्याश्या अपयशासमोर तुम्ही खचून जात नाही.
  • तुम्ही कोणतही काम करत असाल तर जरूर तेव्हा स्वत:लाच विचारात रहा नेहमी कि (हे तेच काम आहे का जे मला ह्या वेळेस केल पाहिजे?)
  • प्रत्येक व्यक्ती मध्ये एक खासियत असतेच. आणि ती खासियत हि असते कि प्रत्येक व्यक्ती कुठलाही एक काम एवढ चांगल्या प्रकारे करतो. कि दुसरा कोणीही व्यक्ती तस नाही करू शकत आणि जर तो व्यक्ती तेच काम करत राहिला तर नक्कीच काहीतरी करून दाखवेल.
  • तुमच्यासोबत अस असेल कि तुम्हाला तुमची खासियतच नाही माहित तर तुम्ही खूप सारे काम करा तुम्हाला तुमची खासियत काय आहे ती समजेल.
  •  करिअर ची जेव्हा सुरवात असेल तेव्हा अपयशाकडे लक्ष नका देऊ. आणि एकदा जर यशाला सुरवात झाली तर पण नंतर पैशा शिवाय दुसरं काहीच नका बघू.
  •  तुम्ही कितीही मोठे बिझनेसमन असो किवा कितीही उच्च-पदावर असो तुमच्या परिवारासाठी नेहमी वेळ काढा,
  • आशा करतो तुम्हाला दिलेली “FACEBOOK CEO MARK ZUKERBERG यांचे विचार” माहिती आवडली असेल. तुमचा अमूल्य वेळ दिल्या बद्दल धन्यवाद

"व्यक्तिमत्व विकासासाठी काही उत्तम पुस्तके "
Persnol development books informatioon in marathi
  • काही गोष्टी आपल्याला वेळ शिकवते. आपला वाईट वेळ हा आपल्याला खूप चांगल्या गोष्टी शिकवून जातो. पण तो वाईट वेळ येऊच नये अशे जर वाटत असेल तर हे पुस्तक नक्कीच वाचा.काही पुस्तक असतात इतकी चांगली नसतात. काही पुस्तक खूप मोठी असतात पण त्यातून शिकण्यासारखं खूप कमी असत त्यामुळे पुस्तक पूर्ण वाचायच्या आधी पुस्तकांची समरीं वाचत जा त्यामुळे कळेल नक्की ते पुस्तक कस आहे. काही पुस्तक अशी असतात कि त्या प्रकारची पुस्तक बाजारात खूप म्हणजे खूपच कमी असतात. अशे पुस्तक जे आपल्याला पुन्हा पुन्हा वाचायला पाहिजे आता जे अशा प्रकारची जे पुस्तक असतात. जर एक वेळ वाचले म्हणजे तुम्ही ते वाचलच नाही, जर तुम्ही एखाद पुस्तक एका पेक्षा 4 किंवा त्या पेक्षा जास्त वेळ वाचलत तर तुमचे विचार हि तशेच होतात.
  • मुलाखती मध्ये आवडता छन्द पुस्तक वाचणे पण खरच आहे का ?
  •  आयुष्यात कमीत कमीत कमी एक वेळ तरी मुलाखतीला (interview) एकदा तरी जावेच लागेल. आणि मुलाखतीत चार गोष्टी विचारल्या जातात. तुमच्या हॉबी पहिल तर आपण सांगतो कि मला पुस्तक वाचायला आवडत गाणे ऐकायला आवडत. मग मुलखात घेणारही विचारतो तुम्ही कुठले कुठले पुस्तके वाचलेत जरा सांगा आणि जास्तीत जास्त आपण 4 किंवा 5 पुस्तकांशिवाय जास्त नाही सांगू शकत जे 5 सांगतो ते हि कस सांगतो ते आपल्यालाच माहिती असत.जास्त करून शाळेतील व कॉलेजची पुस्तक सोडून दुसरे कुठले पुस्तके तर वाचतच नसतो मग मुलाखत घेणार सांगतो तू फक्त 4 पुस्तके वाचलेत आणि तू सांगतो कि तुजी हॉबी वाचणे आहे. मग सांगतो तू गाणेही नसशील ऐकत असा तो अंदाज बांधतो.
  • कोणत्या पुस्तकांची नावे मुलखातीत सांगावीत ?
  • मुलाखतीत पुस्तकांची नाव सांगितले तर अशे सांगतात कि कुठली घटना आणि गोष्टी अशा पुस्तकांची नावे सांगतात जेव्हा पण आपण मुलाखतीत जातो तेव्हा अशा पुस्तकांची नवे नसतात सांगायची. अशा पुस्तकांची नावे सांगायची कि समोरच्याला कळलं पाहिजे कि हा मुलगा स्वतःला उच्च पातळीवर नेण्यासाठी मेहनत करतोय.पण तुम्हाला“यु कॅन विन” हे नाही बोलल पाहिजे कारण खूप साऱ्या लोकांनी हे पुस्तक वाचलेले असते. आणि वाचले नसेल तरी खूप सारे सांगतात कि हे पुस्तक मी वाचलेय. तुम्ही सांगितलं तुम्हाला वाचालयला आवडत. तुम्ही ह्या 14 पुस्तकांची नावे सांगितली तर तुमचं एक खूप भारी इम्प्रेशन तयार होईल.
  • ह्या पुस्तकांना 4-4 वेळा वाचले तर तुम्ही जास्त पॅकेज मागू शकाल.
  • तुम्ही हे 14 पुस्तक वाचली तर तुम्ही जीवनात कुठल्याही पुस्तकाला हात लावला व त्याचे पहिले 4 ते 5 पाने वाचल्यानंतर त्या पुस्तकात काय आहे याचा अंदाज येईल मग तुम्हाला लगेच समजेल कि ते पुस्तक वाचायचं कि नाही.
  • ह्या पुस्तकांच प्रत्येक  भाषेमध्ये पुस्तक कदाचित उपलब्ध आहेत . त्यामुळे तुम्ही कुठल्याही भाषेत पुस्तकांचं आनंद घेऊ शकता. व्यक्तिमत्व विकास मध्ये पहिल्यांदा आपलं इंग्लिश हि उत्तम हवे त्यासाठी तुम्ही हे पुस्तक इंग्लिश मध्ये वाचण्यास सुरवात केली तर तुमचे इंग्लिश हि सुधरेल.
  • 1. How to win Friends & Influence People (Dale Carnegie)

हे खूपच छान पुस्तक आहे. पुस्तकात 7 fundamental  technic आहेत. ज्याच्या मुळे तुम्ही लोकांना इम्प्रेस करू शकता. 6 अशा पद्धती माहित होतील तुम्ही ज्यांना जर वापरल तर लोक तुम्हाला पसंद करायला लागतील. ह्या पुस्तकात अशा काही बाबी लिहिल्यात तुम्ही तुम्हाला जे हवय ते लोकांकडून मनवून घेऊ शकता. आणि काही अशा गोष्टी लोक तुम्हाला लीडर मानायला लागतील
  • 2.Think And Grow  Rich (Nepolian Hill)

पुस्तकच वैशिष्ट्य म्हणजे पुस्तकाला लिहायला पूर्ण 20 वर्षे लागले. ह्या पुस्तकाला लिहायला नेपोलियन त्याच्या काळातील अशे 500 लोक आहेत जे खूप यशस्वी होते. जस कि थॉमस एकडीसन, अलेक्सण्डर,ग्राम बेल ह्या सारख्या लोकांना भेटला व त्यांना विचारला तुम्ही ह्यासाठी कोणत्या पद्धतीने काम केलं. कसा अभ्यास केला त्यांचे विचार तत्व सर्व काही विचारले आणि त्या सगळ्याच्या आधारावर नेपोलियन ने 30 प्रिन्सिपल बनवले. आणि अशे 30 प्रिन्सिपल बनवले जर ते कुणीही वापरले तर ते एकदम सहज सफल होऊ शकतात. बाजारात जेवढे काही पुस्तके येतात. Inspiration,Motivational,Self Development  प्रेरणात्मक पुस्तके सगळ हया 30 प्रिन्सिपल बद्दल लिहिलेल असत. जर तुम्ही हे पुस्तक वाचलं तर बाकी सर्व पुस्तकांना कपाटात बंद करून ठेवाल व कामाला लागाल. ह्या पुस्तकात अशा 30 बाबतीत लिहिलंय कि त्या मूळे व्यक्ती अयशस्वी कशी होते आणि ह्या पुस्तकाची खासियत आहे कि 6 अशा टिप्स दिल्यात कि तुम्ही जितके पैशे कमवायचे हेत तितके पैशे तुम्ही कमवू शकता.

  • 3. Laws Of  Success (Nepolean Hill)

नेपोलियन हिल जे आहेत ते सगळ्या motivational writer and author चे गुरू आहेत. पण नेपोलियन हिल चे पण गुरू होते त्यांचं नाव andryu karnegi,  पण andryu  karnegi  होते ते एक बिझनेस मॅन होते. त्यांनी सांगितलं कि तू पुस्तक फक्त असे लिहीलय कि यातून समजत कि श्रीमंत कस होता येईल. आयुष्य,कुटुंब,नात्याबद्दल तु तर काही लिहिलेच नाही आहे. नेपोलियन ने laws of success लिहिलं ते ह्या साठी लिहिलं कि शाळेतल्या छोट्या मुलांना शिकवला जाईल ह्या पुस्तकात हेही सांगितलं कि फक्त पॉसिटीव्ह attitude ठेऊन काही होत नाही योग्य प्लॅनिंग शिवाय व खूप साऱ्या गोष्टी योग्य मेहनीतने जर केल्या तर तुम्हीच योग्य प्रकारे यशस्वी होऊ शकता. आता खूप सारी पुस्तक अशी असतात कि त्या मध्ये पॉझिटीव्ह Attitude  बद्दलच लिहिलेलं असत. कारण ते पुस्तक खूप चालतात. तुम्ही स्वतःच विचार करा तुम्ही नुसता पॉसिटीव्ह ATTITUDE ठेवला आणि MPSC  च्या परीक्षेला गेलात तुम्ही काय ती परीक्षा उत्तीर्ण होऊ शकता का,
उदाहरण देतो.
एक क्लास असतो क्लास मध्ये राकेश सुरेश दोन विद्यार्थ्यांना गुरुजी विचारतात मी सगळं शिकवलेले समजले का राकेश चा असतो पॉसिटीव्ह ATITIUDE तो म्हणतो समजले, पण त्याला समजले नसते तो असा विचार करतो घरी वाचल्यावर समजेल.
पण सुरेशला ते समजत नाही तर तो गुरुजींना विचारतो गुरुजी त्याला जवळ जाऊन PERSNOLLY  नीट समजावून सांगतात.
ह्यातून राकेश हा मूर्ख आहे व सुरेश ने ते समजून घेऊन घरीही प्रयत्न केला. राकेश ला समजलेच नाही त्यामुळे असा पॉझीटीव्ह ATITUDE  नका ठेऊ व तो कुठे वापरायचा ह्या बद्दल जरा भान ठेवा.
  • 4.  The 7 Habits of HIghely Effective Teen (Sean Covey)

ह्या पुस्तकात अशे खूप सारे उदाहरण दिलेले आहेत जे आपण वाचलीच पाहिजेत व Principal(तत्व) हि दिलेत ते आपण आपल्या आयुष्यात वापरले पाहिजेत.
  •  5.As  A Man Thinketh (James Allen)

ह्या पुस्तकातून अस दाखवल आहे कि माणूस एक माळी आहे आणि माणसाचं डोकं आहे ते एक बाग आहे. जर बागेत चांगली झाडे नाही वाढली तर त्याच्या मध्ये आपोआप गवत व विषारी झाडे वाढतील. पुस्तकात त्यांनी समजवलंय कशा प्रकारे विचार हे Regulate  करू शकतो. आपण अस काय करायचं कि पॉझिटीव्ह विचार येतील फक्त वाईट विचार काहीच येणार नाहीत यासाठी. आणि खूपच प्रॅक्टिकल सोल्युशन ह्या पुस्तकात त्या बद्दल दिलय.
  • 6. See You At The Top(Zig ziglor)

ह्या पुस्तकाची खासियत हि आहे कि झिग झिगलर जो आहे ह्यानि स्टेप बाय स्टेप सांगितलंय कि पहिले हे करा मग हे करा त्यानंतर हे करा माडणीपूर्वक सांगितलं गेलं आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या पुस्तकात हे सुद्धा सांगितलंय कि वाईट सवयी कशा सोडायच्या व चांगल्या सवयी कशा लाऊन घ्यायच्या. जर तुम्ही फर्स्ट इयर ला असाल तर तुमच्या साठी हे पुस्तक वाचायचा योग्य टाईम आहे.
  • 7. Rich Dad Poor Dad(Robert Kiyoski)

श्रीमंत लोक हे अजून श्रीमंत कशे होतात. व गरीब लोक अजून गरीब कशे होतात ह्या बद्दल सांगितलं गेलं आहे. आपल्याला हे पण समजायला पहिजे कि कुठलाही काम करायचं म्हणून करायचं काही तरी शिकण्यासाठी म्हणून करायला पाहिजे. आणि पैशे बचत व योग्य वापर कसा करायचा.

  • 8. Chicken  Soup For The Soul (Series)[Jack Canfield & Mark Hansen]

ह्या पुस्तकांची खूप मोठी सिरीज(मालिका) आहे. त्याची पूर्ण लिस्ट तुम्हाला विकिपेडिया वर मिळू शकेल. जर तुम्ही विद्यार्थी आहात तर तुम्ही वाचा चिकन सूप फॉर थे स्टुडन्ट अशा प्रकारची खूप सारी पुस्तक आहेत. अशा प्रकरची शिक्षक अशा खूप साऱ्या पद्धतीत आहेत. आणि ह्या पुस्तकात छोट्या छोट्या गोष्टी आहेत सामान्य माणसांनी लिहिलेल्या त्यामुळे ह्या मध्ये काही महान असे नाही महान लोकांच आणि साध्या भाषेत समजेल अस लिहिलं गेलं आहे. ह्या पुस्तकात अस इंग्लिश लिहिलंय कि जशी बोली भाषेत वापरली जाते. आणि चायना मध्ये इंग्लिश शिकायला चिकन सूप फॉर इंग्लिश ह्या पुस्तकांची सिरीज चा  वापर केला जातो त्यांना इंग्लिश वेगळा शिकवलं नाही जात. आणि chicken soup of the soul series  हे यासाठी शिकवलं जात तुमची जी इंग्लिश शिकण्याची जी गती आहे ती खूप जलद होते.
  • 9. The  80/20 principle (Richard koch)

पूर्ण जगात तुम्ही कुठलेही पुस्तक उघड त्यात 80/20 प्रिंसिपल असतच. 80% लोकांकडे जगातली 20% संपत्ती आहे. आणि बाकीच्या 20% लोकांकडे जगातील 80% संपत्ती आहे.
उदाहरणार्थ;
स्पर्धापरिक्षा मध्ये 80% लोकांच सिलेक्शन होईल याचे चान्सेस 20% आहेत. आणि 20% लोकांच सिलेक्शन होणार याचे चान्सेस 80% असतात.
ह्या  पुस्तकाला वाचून तुम्हाला समजेल कि अशी कोणती 20% काम केले तर तुम्हाला 80% फायदा होईल .
कुठल्या 20% कामावर तुम्हाला 20% फोकस द्यायचा आहे पुस्तक वाचल्या नंतर तुमच्या यशात कधीच वेळेची कमी नाही राहणार. 
  • 10. How To Get From Where You Are Where You Want To Be  ? (Jack Canfield)

ह्या पुस्तकाला वाचण्याचा एक तोटा आहे. तो हा कि शी कोणतीच गोष्ट नाही कि जि तुम्हाला मैत्री नसते फायदा हा होईल कि तुम्ही स्वतःला प्रश्न विचाराल कि एवढ सगळं मला माहित होत तरी मी अस का केलं नाही.
  • 11. The Power Of Less (Leo Babauta)

ह्या पुस्तकाला वाचून तुमची प्रोड्क्टिव्हिटी वाढेल,  तुम्हाला समजेल कि वेळेचा व पैशाचा योग्य वापर कसा करायचा. खूपच प्रॅक्टिकली ह्या पुस्तकात सांगितलं गेलं आहे कि तुम्ही तुमच्या पैशाचा जास्तीत जास्त प्रमाणात योग्य प्रकारे वापर कसा करायचा, जर तुमचा आज पहिला पगार आला असेल तर ह्या पुस्तकाला वाचचची हीच योग्य वेळ आहे.
  • 12. Brain Rules(John Medina)

तुमचा जे डोकं असत ते कशा प्रकारे काम करत. अजून हेही माहित होत कि किती व्यायाम केला पाहिजे आणि किती झोपल पाहिजे. स्ट्रेस असतो त्याला कसा घालवायच मेमरी कशी वाढवायची व आपल्यातली योग्यता कशी वाढवायची आणि ह्या सगळ्या ज्या क्रायपर्णाली(Activity) तुमच्या डोक्याला फास्ट करतात.
  • 13. 48 Laws of Power (Robert Greene)

दुनियादारी समजायची असेल तर हे पुस्तक उत्तम आहे. 80% लोक असतात ते मदत करणारे असतात. आणि जे 20% टक्के लोक असतात. ते खराब असतात. अशे कि ते तुम्हाला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. नुसताच प्रयत्न करणार. तुम्हाला नुकसान पोहोचून त्याला काय फायदा नाही होणार तरीही तुम्हाला नुकसान पोहोचवण्याचा खूप सारा प्रयत्न करणार. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो कि अशा लोकांना ओळखू नाही शकत आणि त्या लोकांना आपण तेव्हा ओळखतो जेव्हा त्यांनी ऑलरेडी आपल नुकसान केलेलं असत. त्यामुळे 48 laws of power  हे पुस्तक वाचल पाहिजे. ह्यांच्यातील एक एक लॉ आपल्याला वापरायला लागेल. आणि ह्या पुस्तकाचं इंग्लिश हे ते खूपच कठीण आहे.
  • 14. Mastery (Rober Greene)

ह्या पुस्तकाने तुम्ही तुमच्यातल पोटेन्शिअल ओळखू शकता. आणि तुम्ही तुमच्या पोटेन्शिअल ने काय करू शकता. आणि ते कस करू शकता हे तुम्हाला समजेल. जर तुम्ही 6 प्रिंसिपलचा तंतोतंत वापर केल तर  तुम्ही ज्या कामासाठी जन्माला आलात ते काम तुम्ही करूनच दाखवाल. ह्या पुस्तकात इंग्लिश सोप आहे पण जे शब्द व्होकॅबलरी वापरली ती खूप कठीण आहे.
  • जर तुम्ही सांगितलेल्या पुस्तकांचा 4 ते 5 वेळा वाचन केलं तर तुमच्यात आमूलाग्र बदल घडून कयेऊ शकतो.


आशा करतो तुम्हाला दिलेली व्यक्तिमत्व विकासासाठी काही उत्तम  पुस्तकांची माहिती नक्कीच आवडली असेल, तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद..!

"एपीजे अब्दुल कलाम विचार वापरले तर यश ओपाआप भेटेल "
a.p.j. abdul kalam marathi
एपीजे अब्दुल कलाम यांचे  विचार 

  • कुठल्याही गोष्टीला मिळवण्यासाठी तुम्हाला त्या गोष्टीच्या लायक बनाव लागत आणि लायक बनण्यासाठी खूप गोष्टी अगोदर शिकाव्या लागतात. जर तुम्हाला कोणी शिकवणारा भेटला नाही. तर तुम्ही स्वतः जेवढा शिकता येईल तेवढा शिकायचं प्रयत्न करत राहा. ज्या दिवशी तुम्ही शिकायच्या लायकीचे होणार त्या दिवशी शिकवणारा तुमच्या समोर उभार राहील.
  • जर तुम्ही खूप मेहनत केल्यावर सुद्धा ती गोष्ट तुम्हाला नाही मिळत तर हरवुन जाऊ नका अजून जास्त मेहनत करा. खूप जास्त मेहनत केल्यावर जर तुम्हाला थोडंस यश प्राप्त झालं तर अजून जास्त मेहनत करायची वेळ आहे हि, कारण जास्त लोक तुमच्याकडे बघत असतात आणि ह्या गोष्टीला हि समजा जेव्हा पर्यंत तुम्हाला हे नाही कळत कि अयशस्वी अपयशी आलेल्याच जीवन कस असत तोपर्यंत तुम्ही तेवढी मेहनत नाही करता येतजेवढी मेहनत तुम्ही करू शकता. कलाम म्हणतात कि जेव्हा तुम्ही नापास होता अपयश येते तेव्हा तुम्ही त्या सिच्युएशनला चांगल्या पध्दतीने समजू शकण्याची ताकद तुमच्यात येतेमग तुम्हाला समजत कि तुम्ही काय केलं होत आणि तुम्हांला काय करायला पाहिजे होत.
 याच एक उदाहरण देतो जर वर्षभर कुठल्या विद्यार्थ्याला सांगितलं कि भावा दरोरोज सकाळी २ तास आणि संध्याकाळी २ तास अभ्यास कर तर त्याला समजणार नाही जेव्हा तो नापास होईल तेव्हा तुम्ही त्याला बोलणार कि यार तुला बोलो होतो सकाळी  तास आणि संध्याकाळी फक्त २  तास अभ्यास कर तर त्या वेळेस लगेच त्याला समजेल. जवळ च्या फायद्या साठी लांबच नुकसान नाही केलं पाहिजे.
  • जो पर्यंत मेहनत करत नाही तोपपर्यन्त यशस्वी नाही भेटू शकतआणि जर तुम्ही जास्त यशस्वी व्हायचं असेल तर जास्त मेहनती व्हावं लागेल.
  • जर तुम्हाला, करत असलेलं काम आवडत नसेल तरी तुम्ही जास्त पैसे कमावण्याच्या नादात ते काम स्वीकारत करत असाल तर त्या कामातुन तुम्हाला आनंद,आणि समोरच्याला तुमच्या कामातून संतुष्टि भेटणार नाही आणि अस वागून तुम्ही एक पोकळ बोरिंग जीवन जगत राहाल.
  • आपल्याला आपल जे लक्ष्य आहे ते खूप वरच्या लेव्हल ताकदीचा ठेवल पाहिजे आपल जे ज्ञान हे ते जास्तीत जास्त वाढवत राहील पाहिजे खूप मेहनत केली पाहिजे आणि खंबीर मनाने मला ते करायचच हे अस राहील पाहिजे. पण हे तेव्हाच करा जेव्हा तुमचा त्यामध्ये खरच इंटरेस्ट आवड असेल करायची खूप ईच्छा हे तेच करा जर तुम्ही अस काम केलं जे तुम्हाला बिलकुल आवडत नाही पण पैशासाठी करतायतुम्ही त्यात किती हि पैसा कमावला, तरीही तुम्हाला सुख भेटणार नाही तो जो वेगळा आनंद संतुष्टी असते ती नाही मिळणार.
  • कलाम सांगतात तुम्ही कूठल्याही फील्डविभागात असाल आणि कुठल्याही लेव्हल ला असाल तुम्हाला तुमचं जे ज्ञान हे ते वाढवतच राहायचं हे..! कुठलंही काम करत असाल तर ते इतका इतका चांगला करा जेवढा तुम्हाला करता येईल आणि भलेही त्या कामाच श्रेय तुम्हाला मिळणार नसेल तरीही ते तितकंच मेहनतिनी करा, कारण ते काम बघूनच समजलं पाहिजे की ते काम तुम्हीच केलं असणार जेव्हा तुम्ही ते काम त्या पद्धतीने करणार तर खूप सारे लोक आपल्याला मदत करायला पुढे येतात.
  • जर तुम्ही खूप गोष्टी शिकू इच्छिता आहात तर तुम्ही इंग्लिश शिका.
  • मेहनत करा ती एवढी करा कि तुमच्या पर्यंत पोहोचण्याचा कुणी प्रयत्न हि कोणी करू शकणार नाही आणी केला तरी त्याला ते शक्य होणार नाही.
  • जर तुम्हाला वाटत कि तुम्हाला इतकं यश मिळावं जेवढं समोरच्याला मिळालंय.  तर तुम्ही सुदधा तेवढी मेहनत करा जेवढी समोरच्याने केली होती आणि जेव्हा तुम्ही मेहनत करता तेव्हा तुम्हाला दोन गोष्टीकड लक्ष द्यायच आहे.

1.     जर तुम्ही थोडी मेहनत अजून करू शकता तर थोडी मेहनत अजुन करा.
2.     जर अस वाटत असेल तुम्ही जरा जास्तच मेहनत करताय तर थोडी मेहनत कमी करा.
अशा करतो तुम्हाला "एपीजे अब्दुल कलाम विचार वापरले तर यश ओपाआप भेटेल असे"  माहिती  आवडली असेलच , तुमचा वेळ दिल्या बद्दल धन्यवाद..!

 तुम्हाला तुमच्या कामासाठी खूप खूप शुभेच्या ...!


       "बिल गेट्स च्या जीवनाचा परिचय असा कि तुम्हाला बिल गेट्स बनवेल"
bill gets biography principle in marathi
बिल गेट्स यांचे उत्तम ज्यामुळे ते खूप काही करू शकले 

  • तुम्ही कोणतेही काम करत असाल तर तुम्हाला एखाद्या गुरूंची शिक्षकांची कोच ची गरज नक्की लागणारआता आपण कोच या शब्दाचा अर्थ समजून घेऊ कोच म्हणजे जर कुणी एखाद्या कामात मास्टर असेल. परफेक्ट असेल. आणि तो ते दुसर्याला शिकवतो त्याला कोच म्हणतात.तुम्ही तुमच्या जीवनात किती यशस्वी होता.ते केवळ ह्या गोष्टीवर अवलंबून असते कि तुम्ही कुणासोबत जोडले गेले आहात वेगवेगळ्या लोकामध्ये वेगवेगळी अशी स्पेशल गोष्ट आणि वेगवेगळ्या समस्याही असतात. आणि तुम्ही स्वताला दुसऱ्याबरोबर कधीच कम्पेअर नाही केल पाहिजे.तुम्ही तुमच्या जीवनात किती यशस्वी होता हे तुमच्या वाईट परीस्थितीत किवा खूपच वाईट परीस्थितीत काय करता त्यावर अवलंबून असते.
  • बिलगेटस सांगतात कि जर तुम्ही गरीब घरात जन्माला आलात तर ती तुमची चुकी नाही आहे. पण जर तुम्ही गरीब म्हणूनच मेलात तर ती फक्त तुमचीच चुकी आहे.तुम्हाला एक गोष्टीचा  नेहमी विचार केला पाहिजे कि तुमच स्किल कशात हे तुम्हाला कसला ज्ञान जास्त आहे. आणि तुम्ही त्याचा वापर करून कशाप्रकारे पैसे कमवू शकता.आणि तुमच्या स्किल ला तुम्ही कशा प्रकारे अजून चांगल्या बनवू शकता.आणि जास्त पैसा कमवू शकता.
  • कुठलाही काम छोट समजल नाही पाहिजे,जर तुम्हाला कुठल्या मोठ्या कंपनी मध्ये काम नसेल भेटत तर ज्या कंपनी मध्ये नोकरी भेटते तिथे काम करा. तुम्ही करत असलेल कामं करू शकत नसाल तर कमीतकमी इतकी मेहनत तरी घ्या कि केलेलं काम वाईट दिसणार नाही. आणि अस केल्या ने तुम्हाला त्या कामाचे बेसिक प्रीन्सिपल समजत. आणि बेसिक प्रिन्सिपल ची खास गोष्ट हि असते कि बेसिक प्रिन्सिपल हे बेसिक प्रिन्सिपल असतात.
  • तुम्ही दुध विकत असाल किवा कुठला सोफ्टवेअर त्याची गुणवत्ता चांगली पाहिजे आणि किंमत कमी हवी आणि आपल्याला बेसिक प्रीन्सिपल माहित असले तर स्ट्रेटजी बनवन खुप सोप होत.आणि खूप वेळेपर्यंत बिसनेस चालवण्यासाठी बिसनेस स्ट्रेटजी म्हणजे सगळ काही असत. आणि हि गोष्ट समजन खूप महत्वाची आहे कारण खूप लोक असा विचार करतात कि  
  • बिलगेटस ने जास्त अभ्यास केला नाही तरी त्यंच्याकडेखूप लोक काम करतात.पण तस नाही आहे जेवढा शाळा महाविद्यालयात शिकवतात त्याच्याहून लाखपटीने जास्त बिलगेटस यांनी स्वता अभ्यास केला. फक्त आणि फक्त ह्या गोष्टी मुले बिलगेट ह्या स्टेजवर आहेत.
  • जर तुम्ही तुमच्या जीवनात खूप पुढ जाऊ इच्छिता तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांची मदत करा.
  • जर तुम्ही केलेल्या चुकी पासून काहीच शिकला नाहीत तर तुमची केलेली चूक हि बेकार गेली
  • जर तुम्हाला कोणी तुमच्या सांगत असेल किवा तुम्ही करत असलेले काम बिसनेस कसा केला पाहिजे हे सांगत असेल तर आपण सगळ शांत पणे ऐकून घ्या व शांत राहा.कारण हा तुमचा रिझल्ट आहे फीडबॅक आहे आणि तुमच्या भविष्यातील वाटचालीसाठी त्या खूप महत्वाच्या आणि फायदेशीर असतात.
  • जर तुम्ही तुमच्या जीवनात खूप प्रगती करू इच्छिता तर तुम्ही ह्या गोष्टीवर जास्त लक्ष द्या कि तुमचे प्रतिस्पर्धी काय करताहेत.
  • कुठलाही प्लानिंग बनवण्याच्या वेळेस किवा स्ट्रेटर्जी बनवण्याच्या वेळेस पुढचा वेळेचा विचार करून केला पाहिजे. जेवढ्या पुढच्या वेळेचा विचार करून बनवलं तेवढ्या कमी समस्या येतील. जेव्हा तुम्ही प्लान करता तेव्हाअस होत कि प्लानिंग च्या नुसार काहीच होत नसत पण तुम्ही हे पण लक्षात घ्या प्लानिंग शिवाय काहीच होत नाही. 
  • दुसऱ्यांना तुमची बाजू समजून सांगन्या आधी तुम्ही त्यांची बाजू पूर्ण पने समजून घ्या त्यांचा point of view समजून घ्या.

  • खूप भारी विचार करण्या आधी खूप भारी काही तरी पहिले करून दाखवा.
  • जीवनात काहीही करायचं असेल तर तुमच काम हे logical आणि scientific ठेवा आणि नेहमी practical राहा.
  • चांगल चांगल विचार करून चांगल चांगल नाही होत. बरोबर काम केल तर चांगल होत. त्यामुळे काहीतरी चांगल काम करून दाखवा.
  • तुम्ही कुठल्याही श्रीमंत मांणसाच पुस्तक वाचा किवा मुलाखत बघा एकही अस नाही सांगत कि पेसे खर्च करा. सगळे अशे सांगतात कि तुम्ही तुमचे पेसे इन्व्हेस्ट करा. 
  • माणसाला Oxygen  नंतर पैसा  हा महत्वाचा आहे. कारण Oxygen नंतर जिवंत राहण्यासाठी दुसरी महत्वाची गोष्ट पैसा हि असते.
  •  तुम्हाला पटत असो किवा नसो पण खर हेच हे कि एखाद्या माणसाची किंमत त्याच्या पैशावारुनच लावली जाते. 
  • आयुष्यात चांगल्या प्रकारे यशस्वी व्हायला वेळ लागतो तुम्ही धीर धरा. सुरवातिला खूप जास्त यश नाही  भेटणार पण लक्षात ठेवा.
.

१.केलेली मेहनत कधी वाया जात नाही
२.मोठी स्पर्धा नेहमी तोच जिंकतो जो जबरदस्त असतो.
म्हणून तुम्ही नेहमी खूप मेहनत करा.

आणि नेहमी स्वताला जबरदस्त बनवण्यासाठी प्रयत्न करत राहा. 

"मी आशा करतो तुम्हाला सांगितले बिल गेट्स च्या जीवनाचा परिचय असा कि तुम्हाला बिल गेट्स बनवेल. आवडल असेल." 


MKRdezign

{facebook#https://www.facebook.com/j2bhava/100410737340707/} {twitter#https://twitter.com/j2bhava} {google-plus#https://plus.google.com/114529621498499588003} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {youtube#https://www.youtube.com/channel/UCsLUUQt3dOSuG_gLMn3UZvw} {instagram#https://www.instagram.com/j2bhava/}

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget