"व्यक्तिमत्व विकासासाठी काही उत्तम पुस्तके "
- काही गोष्टी आपल्याला वेळ शिकवते. आपला वाईट वेळ हा आपल्याला खूप चांगल्या गोष्टी शिकवून जातो. पण तो वाईट वेळ येऊच नये अशे जर वाटत असेल तर हे पुस्तक नक्कीच वाचा.काही पुस्तक असतात इतकी चांगली नसतात. काही पुस्तक खूप मोठी असतात पण त्यातून शिकण्यासारखं खूप कमी असत त्यामुळे पुस्तक पूर्ण वाचायच्या आधी पुस्तकांची समरीं वाचत जा त्यामुळे कळेल नक्की ते पुस्तक कस आहे. काही पुस्तक अशी असतात कि त्या प्रकारची पुस्तक बाजारात खूप म्हणजे खूपच कमी असतात. अशे पुस्तक जे आपल्याला पुन्हा पुन्हा वाचायला पाहिजे आता जे अशा प्रकारची जे पुस्तक असतात. जर एक वेळ वाचले म्हणजे तुम्ही ते वाचलच नाही, जर तुम्ही एखाद पुस्तक एका पेक्षा 4 किंवा त्या पेक्षा जास्त वेळ वाचलत तर तुमचे विचार हि तशेच होतात.
- मुलाखती मध्ये आवडता छन्द पुस्तक वाचणे पण खरच आहे का ?
- आयुष्यात कमीत कमीत कमी एक वेळ तरी मुलाखतीला (interview) एकदा तरी जावेच लागेल. आणि मुलाखतीत चार गोष्टी विचारल्या जातात. तुमच्या हॉबी पहिल तर आपण सांगतो कि मला पुस्तक वाचायला आवडत गाणे ऐकायला आवडत. मग मुलखात घेणारही विचारतो तुम्ही कुठले कुठले पुस्तके वाचलेत जरा सांगा आणि जास्तीत जास्त आपण 4 किंवा 5 पुस्तकांशिवाय जास्त नाही सांगू शकत जे 5 सांगतो ते हि कस सांगतो ते आपल्यालाच माहिती असत.जास्त करून शाळेतील व कॉलेजची पुस्तक सोडून दुसरे कुठले पुस्तके तर वाचतच नसतो मग मुलाखत घेणार सांगतो तू फक्त 4 पुस्तके वाचलेत आणि तू सांगतो कि तुजी हॉबी वाचणे आहे. मग सांगतो तू गाणेही नसशील ऐकत असा तो अंदाज बांधतो.
- कोणत्या पुस्तकांची नावे मुलखातीत सांगावीत ?
- मुलाखतीत पुस्तकांची नाव सांगितले तर अशे सांगतात कि कुठली घटना आणि गोष्टी अशा पुस्तकांची नावे सांगतात जेव्हा पण आपण मुलाखतीत जातो तेव्हा अशा पुस्तकांची नवे नसतात सांगायची. अशा पुस्तकांची नावे सांगायची कि समोरच्याला कळलं पाहिजे कि हा मुलगा स्वतःला उच्च पातळीवर नेण्यासाठी मेहनत करतोय.पण तुम्हाला“यु कॅन विन” हे नाही बोलल पाहिजे कारण खूप साऱ्या लोकांनी हे पुस्तक वाचलेले असते. आणि वाचले नसेल तरी खूप सारे सांगतात कि हे पुस्तक मी वाचलेय. तुम्ही सांगितलं तुम्हाला वाचालयला आवडत. तुम्ही ह्या 14 पुस्तकांची नावे सांगितली तर तुमचं एक खूप भारी इम्प्रेशन तयार होईल.
- ह्या पुस्तकांना 4-4 वेळा वाचले तर तुम्ही जास्त पॅकेज मागू शकाल.
- तुम्ही हे 14 पुस्तक वाचली तर तुम्ही जीवनात कुठल्याही पुस्तकाला हात लावला व त्याचे पहिले 4 ते 5 पाने वाचल्यानंतर त्या पुस्तकात काय आहे याचा अंदाज येईल मग तुम्हाला लगेच समजेल कि ते पुस्तक वाचायचं कि नाही.
- ह्या पुस्तकांच प्रत्येक भाषेमध्ये पुस्तक कदाचित उपलब्ध आहेत . त्यामुळे तुम्ही कुठल्याही भाषेत पुस्तकांचं आनंद घेऊ शकता. व्यक्तिमत्व विकास मध्ये पहिल्यांदा आपलं इंग्लिश हि उत्तम हवे त्यासाठी तुम्ही हे पुस्तक इंग्लिश मध्ये वाचण्यास सुरवात केली तर तुमचे इंग्लिश हि सुधरेल.
- 1. How to win Friends & Influence People (Dale Carnegie)
हे खूपच छान पुस्तक आहे. पुस्तकात 7
fundamental technic आहेत. ज्याच्या मुळे तुम्ही लोकांना इम्प्रेस
करू शकता. 6 अशा पद्धती माहित होतील तुम्ही ज्यांना जर
वापरल तर लोक तुम्हाला पसंद करायला लागतील. ह्या पुस्तकात अशा काही बाबी लिहिल्यात
तुम्ही तुम्हाला जे हवय ते लोकांकडून मनवून घेऊ शकता. आणि काही अशा गोष्टी लोक
तुम्हाला लीडर मानायला लागतील
- 2.Think And Grow Rich (Nepolian Hill)
पुस्तकच वैशिष्ट्य म्हणजे पुस्तकाला लिहायला
पूर्ण 20 वर्षे लागले. ह्या पुस्तकाला लिहायला नेपोलियन त्याच्या काळातील अशे
500 लोक आहेत जे खूप यशस्वी होते. जस कि थॉमस एकडीसन, अलेक्सण्डर,ग्राम
बेल ह्या सारख्या लोकांना भेटला व त्यांना विचारला तुम्ही ह्यासाठी कोणत्या
पद्धतीने काम केलं. कसा अभ्यास केला त्यांचे विचार तत्व सर्व काही विचारले आणि
त्या सगळ्याच्या आधारावर नेपोलियन ने 30 प्रिन्सिपल बनवले. आणि अशे 30
प्रिन्सिपल बनवले जर ते कुणीही वापरले तर ते एकदम सहज सफल होऊ शकतात. बाजारात
जेवढे काही पुस्तके येतात. Inspiration,Motivational,Self Development प्रेरणात्मक
पुस्तके सगळ हया 30 प्रिन्सिपल बद्दल लिहिलेल असत. जर तुम्ही हे
पुस्तक वाचलं तर बाकी सर्व पुस्तकांना कपाटात बंद करून ठेवाल व कामाला लागाल. ह्या
पुस्तकात अशा 30 बाबतीत लिहिलंय कि त्या मूळे व्यक्ती अयशस्वी कशी
होते आणि ह्या पुस्तकाची खासियत आहे कि 6 अशा टिप्स दिल्यात कि तुम्ही जितके
पैशे कमवायचे हेत तितके पैशे तुम्ही कमवू शकता.
- 3. Laws Of Success (Nepolean Hill)
नेपोलियन हिल जे आहेत ते सगळ्या motivational
writer and author चे गुरू आहेत. पण नेपोलियन हिल चे पण गुरू होते
त्यांचं नाव andryu karnegi, पण andryu karnegi होते ते एक बिझनेस मॅन होते. त्यांनी
सांगितलं कि तू पुस्तक फक्त असे लिहीलय कि यातून समजत कि श्रीमंत कस होता येईल. आयुष्य,कुटुंब,नात्याबद्दल
तु तर काही लिहिलेच नाही आहे. नेपोलियन ने laws of success लिहिलं ते ह्या
साठी लिहिलं कि शाळेतल्या छोट्या मुलांना शिकवला जाईल ह्या पुस्तकात हेही सांगितलं
कि फक्त पॉसिटीव्ह attitude ठेऊन काही होत नाही योग्य प्लॅनिंग
शिवाय व खूप साऱ्या गोष्टी योग्य मेहनीतने जर केल्या तर तुम्हीच योग्य प्रकारे
यशस्वी होऊ शकता. आता खूप सारी पुस्तक अशी असतात कि त्या मध्ये पॉझिटीव्ह Attitude बद्दलच लिहिलेलं असत. कारण ते पुस्तक
खूप चालतात. तुम्ही स्वतःच विचार करा तुम्ही नुसता पॉसिटीव्ह ATTITUDE ठेवला
आणि MPSC च्या परीक्षेला गेलात तुम्ही काय ती
परीक्षा उत्तीर्ण होऊ शकता का,
उदाहरण देतो.
एक क्लास असतो क्लास मध्ये राकेश सुरेश दोन
विद्यार्थ्यांना गुरुजी विचारतात मी सगळं शिकवलेले समजले का राकेश चा असतो पॉसिटीव्ह
ATITIUDE तो म्हणतो समजले, पण त्याला समजले नसते तो असा विचार करतो घरी
वाचल्यावर समजेल.
पण सुरेशला ते समजत नाही तर तो गुरुजींना
विचारतो गुरुजी त्याला जवळ जाऊन PERSNOLLY नीट
समजावून सांगतात.
ह्यातून राकेश हा मूर्ख आहे व सुरेश ने ते
समजून घेऊन घरीही प्रयत्न केला. राकेश ला समजलेच नाही त्यामुळे असा पॉझीटीव्ह ATITUDE नका ठेऊ व तो कुठे वापरायचा ह्या बद्दल
जरा भान ठेवा.
- 4. The 7 Habits of HIghely Effective Teen (Sean Covey)
ह्या पुस्तकात अशे खूप सारे उदाहरण दिलेले आहेत
जे आपण वाचलीच पाहिजेत व Principal(तत्व) हि
दिलेत ते आपण आपल्या आयुष्यात वापरले पाहिजेत.
- 5.As A Man Thinketh (James Allen)
ह्या पुस्तकातून अस दाखवल आहे कि माणूस एक माळी
आहे आणि माणसाचं डोकं आहे ते एक बाग आहे. जर बागेत चांगली झाडे नाही वाढली तर
त्याच्या मध्ये आपोआप गवत व विषारी झाडे वाढतील. पुस्तकात त्यांनी समजवलंय कशा
प्रकारे विचार हे Regulate करू शकतो. आपण
अस काय करायचं कि पॉझिटीव्ह विचार येतील फक्त वाईट विचार काहीच येणार नाहीत
यासाठी. आणि खूपच प्रॅक्टिकल सोल्युशन ह्या पुस्तकात त्या बद्दल दिलय.
- 6. See You At The Top(Zig ziglor)
ह्या पुस्तकाची खासियत हि आहे कि झिग झिगलर जो
आहे ह्यानि स्टेप बाय स्टेप सांगितलंय कि पहिले हे करा मग हे करा त्यानंतर हे करा
माडणीपूर्वक सांगितलं गेलं आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या पुस्तकात हे
सुद्धा सांगितलंय कि वाईट सवयी कशा सोडायच्या व चांगल्या सवयी कशा लाऊन घ्यायच्या.
जर तुम्ही फर्स्ट इयर ला असाल तर तुमच्या साठी हे पुस्तक वाचायचा योग्य टाईम आहे.
- 7. Rich Dad Poor Dad(Robert Kiyoski)
श्रीमंत लोक हे अजून श्रीमंत कशे होतात. व गरीब
लोक अजून गरीब कशे होतात ह्या बद्दल सांगितलं गेलं आहे. आपल्याला हे पण समजायला
पहिजे कि कुठलाही काम करायचं म्हणून करायचं काही तरी शिकण्यासाठी म्हणून करायला
पाहिजे. आणि पैशे बचत व योग्य वापर कसा करायचा.
- 8. Chicken Soup For The Soul (Series)[Jack Canfield & Mark Hansen]
ह्या पुस्तकांची खूप मोठी सिरीज(मालिका) आहे.
त्याची पूर्ण लिस्ट तुम्हाला विकिपेडिया वर
मिळू शकेल. जर तुम्ही विद्यार्थी आहात तर तुम्ही वाचा चिकन सूप फॉर थे स्टुडन्ट
अशा प्रकारची खूप सारी पुस्तक आहेत. अशा प्रकरची शिक्षक अशा खूप साऱ्या पद्धतीत
आहेत. आणि ह्या पुस्तकात छोट्या छोट्या गोष्टी आहेत सामान्य माणसांनी लिहिलेल्या
त्यामुळे ह्या मध्ये काही महान असे नाही महान लोकांच आणि साध्या भाषेत समजेल अस
लिहिलं गेलं आहे. ह्या पुस्तकात अस इंग्लिश लिहिलंय कि जशी बोली भाषेत वापरली
जाते. आणि चायना मध्ये इंग्लिश शिकायला चिकन सूप फॉर इंग्लिश ह्या पुस्तकांची
सिरीज चा वापर केला जातो त्यांना इंग्लिश वेगळा
शिकवलं नाही जात. आणि chicken soup of the soul series हे यासाठी शिकवलं जात तुमची जी इंग्लिश
शिकण्याची जी गती आहे ती खूप जलद होते.
- 9. The 80/20 principle (Richard koch)
पूर्ण जगात तुम्ही कुठलेही पुस्तक उघड त्यात 80/20
प्रिंसिपल असतच. 80% लोकांकडे जगातली 20% संपत्ती आहे.
आणि बाकीच्या 20% लोकांकडे जगातील 80% संपत्ती आहे.
उदाहरणार्थ;
स्पर्धापरिक्षा मध्ये 80% लोकांच
सिलेक्शन होईल याचे चान्सेस 20% आहेत. आणि 20% लोकांच
सिलेक्शन होणार याचे चान्सेस 80% असतात.
ह्या
पुस्तकाला वाचून तुम्हाला समजेल कि अशी कोणती 20% काम केले तर
तुम्हाला 80% फायदा होईल .
कुठल्या 20% कामावर
तुम्हाला 20% फोकस द्यायचा आहे पुस्तक वाचल्या नंतर तुमच्या
यशात कधीच वेळेची कमी नाही राहणार.
- 10. How To Get From Where You Are Where You Want To Be ? (Jack Canfield)
ह्या पुस्तकाला वाचण्याचा एक तोटा आहे. तो हा
कि शी कोणतीच गोष्ट नाही कि जि तुम्हाला मैत्री नसते फायदा हा होईल कि तुम्ही
स्वतःला प्रश्न विचाराल कि एवढ सगळं मला माहित होत तरी मी अस का केलं नाही.
- 11. The Power Of Less (Leo Babauta)
ह्या पुस्तकाला वाचून तुमची प्रोड्क्टिव्हिटी
वाढेल, तुम्हाला समजेल
कि वेळेचा व पैशाचा योग्य वापर कसा करायचा. खूपच प्रॅक्टिकली ह्या पुस्तकात सांगितलं गेलं आहे कि तुम्ही तुमच्या
पैशाचा जास्तीत जास्त प्रमाणात योग्य प्रकारे वापर कसा करायचा, जर
तुमचा आज पहिला पगार आला असेल तर ह्या पुस्तकाला वाचचची हीच योग्य वेळ आहे.
- 12. Brain Rules(John Medina)
तुमचा जे डोकं असत ते कशा प्रकारे काम करत. अजून
हेही माहित होत कि किती व्यायाम केला पाहिजे आणि किती झोपल पाहिजे. स्ट्रेस असतो
त्याला कसा घालवायच मेमरी कशी वाढवायची व
आपल्यातली योग्यता कशी वाढवायची आणि ह्या सगळ्या ज्या क्रायपर्णाली(Activity)
तुमच्या
डोक्याला फास्ट करतात.
- 13. 48 Laws of Power (Robert Greene)
दुनियादारी समजायची असेल तर हे पुस्तक उत्तम
आहे. 80% लोक असतात ते मदत करणारे असतात. आणि जे 20% टक्के लोक
असतात. ते खराब असतात. अशे कि ते तुम्हाला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. नुसताच
प्रयत्न करणार. तुम्हाला नुकसान पोहोचून त्याला काय फायदा नाही होणार तरीही
तुम्हाला नुकसान पोहोचवण्याचा खूप सारा प्रयत्न करणार. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम
असतो कि अशा लोकांना ओळखू नाही शकत आणि त्या लोकांना आपण तेव्हा ओळखतो जेव्हा
त्यांनी ऑलरेडी आपल नुकसान केलेलं असत. त्यामुळे 48 laws of power हे पुस्तक वाचल पाहिजे. ह्यांच्यातील
एक एक लॉ आपल्याला वापरायला लागेल. आणि ह्या पुस्तकाचं इंग्लिश हे ते खूपच कठीण
आहे.
- 14. Mastery (Rober Greene)
ह्या पुस्तकाने तुम्ही तुमच्यातल पोटेन्शिअल
ओळखू शकता. आणि तुम्ही तुमच्या पोटेन्शिअल ने काय करू शकता. आणि ते कस करू शकता हे
तुम्हाला समजेल. जर तुम्ही 6 प्रिंसिपलचा तंतोतंत वापर केल तर तुम्ही ज्या कामासाठी जन्माला आलात ते काम
तुम्ही करूनच दाखवाल. ह्या पुस्तकात इंग्लिश सोप आहे पण जे शब्द व्होकॅबलरी वापरली
ती खूप कठीण आहे.
- जर तुम्ही सांगितलेल्या पुस्तकांचा 4 ते 5 वेळा वाचन केलं तर तुमच्यात आमूलाग्र बदल घडून कयेऊ शकतो.
आशा करतो तुम्हाला दिलेली व्यक्तिमत्व विकासासाठी काही उत्तम पुस्तकांची माहिती नक्कीच
आवडली असेल, तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद..!
टिप्पणी पोस्ट करा