"प्रोसेसर म्हणजे काय असत नक्की तर "
- तुमच्या मोबाईल मध्ये क्वालकॉम प्रोसेसर आहे आणि तुमच्या मित्राच्या मोबाइलला मध्ये Octa-core
प्रोसेसर आहे, तर ह्यात कुणाचा
मोबाइल सगळ्यात फास्ट तर आज त्याबद्दल बघुयात
- मोबाईल प्रोसेसर बनवणाऱ्या कम्पन्या :
1) सॅमसंग(दक्षिण कोरिया)
2) Qualcomm (अमेरिकन कंपनी )
3) मीडियाटेक(चायना कंपनी)
4) Nvidia (अमेरिकन कंपनी )
- ह्या 4 हि कंपनी ला प्रोसेसर चा नकाशा (architecture) बनवण्यासाठी मदत करते ती कंपनी हे ARM
- जेव्हा तुम्ही मोबाईल घेता तेव्हा तुम्हाला तीन प्रश्न पडतात कि मोबाईल हँग तर होणार नाही, मोबाईल ची बॅटरी किती टिकेल, मोबाईल गरम किती होत असेल.ह्या तीनही गोष्टी कुठेना कुठेतरी जोडलेल्या असतात त्या फोन मधल्या फिचर मध्ये, जेव्हा तुम्ही दोन मोबाईल एक मेकांना कंपेअर करता तेव्हा तुम्ही हे बघता कि ड्युअल कोअर आहे कि ऑकटा कोअर आहे, आणि त्याचा स्पीड किती हे 1 का 2 गिगहर्टझ मग आपण असा विचार करतो कि जे जास्त हे तर चांगला असेल मग आपण असा विचार करतो कि ऑकटा-कोअर हा चांगला असेल Quard-Core पेक्षा आणि 2 गिगहर्टझ चांगला असेल 1.5 गिगहर्टझ पेक्षा आणि ह्या सगळ्या नादात चुकीचा निर्णय घेतो
- जेव्हा तुम्ही दोन मोबाईल कॉम्पेअर करता तेव्हा तुम्ही 4 गोष्टी लक्षात घ्या.
- 1) आर्किटेक्चर :
- प्रोसेसर साठी ARM नावाची कम्पनी नकाशा तयार करते. तर तो A-54,A-55,A-57 असा नव्याने मोडीफाय आणि उत्तम प्रकारे डेव्हलप होत आहे, त्यामुळे तुम्ही जो प्रोसेसर घेत असाल त्याचा ARM मॉडेल हा जितका लेटस्ट असेल तितक चांगला.
- 2) टेक्नॉलॉजी :
- प्रोसेसर बनवण्यासाठी खूप साऱ्या ट्रांसिस्टर चा वापर केला जातो आणी ते ट्रांसिस्टर खूप छोटे छोटे आणि खूप सारे असतात, जेवढे ट्रांसिस्टर छोटे असतील तेवढा प्रोसेसर फास्ट आणि बॅटरी कमी ऊर्जा घेते,
- सॅमसंग नंबर 1 पोसिशन वर आहे, सॅमसंग सगळ्यात छोटा ट्रांसिस्टर बनवते त्याचं साईझ 14 नॅनो मीटर आहे, क्वालकॉम 20 नॅनो मीटर, मीडिया टेक कधी 20 तर कधी 28 नॅनो मीटर वर तर जितका छोटा साईझ असेल तितकंच तुम्हाला प्रोसेसर उत्तम भेटल.
- 3) नंबर ऑफ कोअर :
- कोअर नक्की असत काय समजा कि :
- समजा कि मी एक प्रोसेसर हे मला दोन हात आहेत 1 हात म्हणजे 1 कोअर
- 2 रा हात म्हणजे दुसरा कोअर, कोअर म्हणजे प्रोसेसर चे दोन हात, ड्युअल-कोअर
- Quad -कोअर म्हणजे 4 हात, व ४ हातामुळे थकन त्याने थोडं कमी होत कारण तो चार हाताने काम करतो,
- ऑकटा-कोअर असतो म्हणजे त्यात 8 कोअर असतात म्हणजे त्याला 8 हात असतात 8 हात म्हणजे प्रत्येक हाताला कामाला लावणार इकडे तिकडे म्हणजे कोअर जे आसता ते एकत्र किंवा वेगळेवेगळे कुठलही काम जलद करू शकतात. आणि त्याने थकवा कमी होतो व प्रोसेसर गरम कमी होतो.
- Quad -कोअर आणि ऑकटा-कोअर मध्ये ऑकटा कोअर हा उत्तम असेल ?, हो उत्तम असेल पण जेव्हा दोघांमध्ये आर्किटेक्चर आणि ट्रांसिस्टर सिस्टिम सारखी असेल तेव्हाच ऑकटा-कोअर हा दर्जेदार असेल.तिनही जर वेगळेवेगळे असतील तुम्ही कॉम्पेअर नाही करू शकणार कोण चांगला हे ते
- 4) फ्रिक्वेन्सी :
- फ्रिक्वेन्सी 1 गिगाहर्टझ 2 गिगाहर्टझ मध्ये असते, क्लॉक सिस्टम असते, गिगाहर्टझ म्हणजे कि त्याच्या मदतीने प्रोसेसर वेळेच्या हिशेंबात काम करत असतो, 1 गिगहर्टझ म्हणजे एक सेकंद 10 हजार करोड वेळा प्रोसेसर काम करत.
- प्रोसेसर नक्की असत काय ?
- उदाहरण देतो,
- तुम्ही शाळेत बघता कि शाळेमध्ये एक मेन ऑफिस असत तिथून सर्व काही सूचना दिल्या जातात व त्या प्रमाणे सर्व काही होत ते ऑफिस असत प्रिंसिपलच आणि त्या प्रिंसिपल ऑफिस मधून सर्व शाळा चालते, प्रिंसिपल ऑफिस म्हणजेच एक प्रोसेसर असतो आणि प्रिंसिपल सगळं काही मॅनेज करतो किती वर्ग किती शिक्षक किती मुले त्या मुले तो प्रिंसिपल ऑफिस मधला प्रिंसिपल तसच प्रोसेसर मधला आर्किटेक्चर हि काम करत. आता जर प्रिंसिपल ने जर शाळा नीट चालवली मॅनेज केली तर तो चौथी पर्यंत चालू शकतो जास्त चांगली मॅनेज केली तर तीच 6 वि पर्यंत चालवू शकतो, तसच तुम्ही जेवढा चांगला डिझाईन वापरणार तेवढा चांगला हे तुमच्या साठी
- ड्युअल-कोअर, Quad-कोअर आणि ऑकटा-कोअर ?
- तुमची जी शाळा बनते हे ती जर दुसरी पर्यंत झाली तर ड्युअल-कोअर, 4 थी पर्यंत झाली तर Quad-Core, 8 वि पर्यंत झाली तर ऑकटा-कोअर, आणि 10 वि पर्यंत झाली तर टेंका-कोअर
- सेम बाब हे तुमच्या प्रोसेसर मध्ये तुम्ही त्या मध्ये किती वेग-वेगळे ब्लॉक डिझाईन करताय, खूपच सोप आहे.
- तुम्ही प्रोसेसरच डिझाईन ARM कम्पनी कडून आर्किटेक्चर तयार करून घेतलं म्हणजे त्या शाळेचं प्रिंसिपल कडून बनून घेतलं.
- जर तुमची शाळा तयार झाली, पण त्या शाळेतील प्रत्येक वर्गात खुप खूप लांब अंतर आहे. त्यामुळे झालं काय जागा वाया गेली जेवढी जागा भेटत होती ती अशीच लांब बनून वाया घालावंली, त्यामुळे वर्ग खूप छोटे झालेत, दुसरी गोष्ट जे शिक्षक शिकवतात त्यांना जायचे असते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर काही डिस्कस करण्यासाठी काही डॉक्युमेंट आणण्यासाठी त्यामुळे ते खूप वेळा इकडून तिकडे जाणार एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जाण्यासाठी तिथे जायला वर्गामध्ये जितकं अंतर आहे. तेवढाच टाइम लागणार त्या शिक्षकांना तिकडे जायला आणि त्यांची एनर्जी पण वाया जाणार
- त्यामुळे आपण असा इच्छितो कि जे अंतर हे ते असावं खुपच कमित कमी एक तर वर्ग जवळ येतील व कामाचा स्पीड हि वाढेल.
- त्यासाठी अंतर 14 nm, 16nm,18nm,20nm हे समजा कि हे दोन वर्गातला अंतर आहे. जितकं अंतर कमी तितकं जबरदस्त, पण हे इतकं सोप पण नसत कि सगळं अंतर तुम्ही कमी करू शकता एकदम जवळ जवळ आणू शकत नाही. त्यावर पण एक लिमिट असत.
- जस कि आता 10nm वर काम करतोय जो बनवतोय क्वालकॉम स्नॅप ड्रेगॉन प्रोसेसर
- सगळ्यात कमी 10 nm पर्यंत बनू शकतो
- जेवढा कमी तेवढं मस्त तेवढा काम फास्ट होणार आणि थकणार कमी,
- आता वर्ग झाले सर्व काही झालं पण दरवाजे लावण अजून बाकी आहे. जर दरवाजे नसतील तर वर्गात डिस्टरबन्स होणार
- आता जे दरवाजे असतात जे लवकर उघडतात लवकर बंद होतात त्यामुळे ते हि चांगले हवेत त्यामूळे frequency महत्वाची असते जितकी जास्त तर मग तुम्हाला समजलच असेल
- Frequency म्हणजे 1.4ghz, 1.8ghz
- ARM म्हणजे A53-A57 डिझाईन
- 14nm, 10nm, 10nm ती आहे अंतर
- दरवाजा उघडायचा जो वेग हे कमि जास्त ती आहे frequency 1.4 GHZ,1.8 GHZ
"अपेक्षा करतो तुम्हाला दिलेली प्रोसेसर म्हणजे काय हि माहिती आवडली असेल, तुमचा वेळ दिल्याबदल
धन्यवाद"
टिप्पणी पोस्ट करा