"Optical Image Stabilization म्हणजे काय ? (Explained In Marathi)"
- दोन SMARTPHONE जेव्हा तुम्ही कॉम्पेअर करत असाल व त्याचा कॅमेरा तर तुम्ही नक्कीच चेक करता कुणाचा कॅमेरा कसा आहे. तर कॅमेरा स्पेसिफिकेशन मध्ये तुम्ही OIS लिहिलेलं तुमच्या वाचण्यात आलंच असेल.
OIS नक्की काय असत आणि काय आहेत OIS चे फायदे
- OIS चा लॉन्ग फॉर्म आहे OPTICAL IMAGE STABILIZATION
- आता ऑप्टिकल इमेज स्टॅबिलाईझेशन म्हणजे अशी यंत्रणा जी तुमच्या कॅमेरा मधून फोटो टिपतात त्यांना स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करते.
- ऑप्टिकल म्हणजे हे सर्व काही लेन्सचा मदतीने होते.
फोटो कसा कॅप्चर
होतो ?
दिवसा फोटो कसा
कॅप्चर होतो :
- जेव्हा तुम्ही दिवस कुठला फोटो काढता. फोटो काढतानी कॅमेराच जो झडप असतो 1 सेकंदाच्या 100 व्या किंवा 200 भागामध्ये खोलतो. कारण जसा तो झडप(shutter) उघडतो कॅमेराला भरपूर प्रमाणात प्रकाश भेटतो व कॅमेराचा झडप बंद होतो.
रात्री फोटो कसा
कॅप्चर होतो ?
- रात्रीच्या वेळेस जेव्हा प्रकाश कमी असतो. प्रकाश काहीच नसतो. त्या वेळेस कॅमेराचा जो (shutter)झडप हे तो जास्तीत जास्त वेळ उघडा राहण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी सेकंडच 10वा कधी 20वा भाग परंतु जो 10 व आणि 20 व भाग असतो तो कॅमेराचा (shutter)झडप जास्त वेळ उघडा राहतो. आणि एक सामान्य माणूस असतो जो फोटो घेत असतो त्याच्या साठी तो वेळ खूप जास्त असतो आणि सेकंदाच्या 10व्या हिश्यापर्यंत तर त्याचा हात थोडासा तरी हालेल आणि हे सगळ्यांच्या सोबत होत असत आणि ऑप्टिकल स्टॅबिलिझेशन जे आहे ते मदत करत कि जे तुमच्या हातात मोबाइल हलतो ते बंद करण्यासाठी व फोटो स्थिर येण्यासाठी प्रयत्न करतो.
नॉर्मल कॅमेरा:
- जेव्हा नॉर्मल कॅमेरा ने आपण फोटो काढतो तेव्हा फोटो अस्पष्ट येतो इतका क्लिअर नाही येत. कारण जेव्हा तुम्ही फोटो काढता तेव्हा कॅमेरा फोटो घेत असतो तितक्यात तुमच्या हातून कॅमेरा हलतो व तो फोटो अस्पष्ट येतो. नाहीतर काहीतरी बदल होतो.
OIS
ची खासियत ;
- ऑप्टिकल स्टॅबिलाईझेशन इमेज जेव्हा फोटो काढताना तुमच्या हाताला मोबाईल हलला तर तो लगेच त्या मधल्या लेन्स पोझिशन तुम्ही जशे हलाल त्यांच्या विरुद्ध हलतील. तुमच्या फोटो ला त्या लेन्स सरळ ठेवतील.
- ऑप्टिकल इमेज स्टॅबिलाईझेशन म्हणजे अस तंत्रज्ञान आहे. कॅमेरा मध्ये अशा लेन्स फिट केलेल्या असतात कि तुमचा फोटो काढताना हात हलला तर कॅमेरा लेन्स त्या विरुद्ध दिशेला फिरवतात व तुमचा फोटो जास्तीत जास्त क्लिअर येण्यास मदत होते.
OIS व्हिडीओ ;
- व्हिडिओ काढतानी सुद्धा तुमचा मोबाइल हालतो व तेव्हाही ऑप्टिकल इमेज स्टॅबिलाईझेशन असतील तर कॅमेरा लेन्स ऍडजस्ट होऊन व्हिडिओ क्लिअर व उत्तम QUALITY येते. आणि जर ऑप्टिकल इमेज स्टॅबिलाईझेशन नसतील तर विडिओ काढतांना कॅमेरा हालला तर व्हिडिओ क्लिअर येत नाही.
OIS तुमच्या
मोबाईलला आहे ?
- सगळ्या स्मार्टफोन मध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलाईझेशन हि कॉमन आहे. जवळ पस सगळ्या मोबाईल मध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलाईझेशन असत. आणि हो जे जास्त किमतीचे असतात त्यांच्यात तर OIS असतोच.
- सगळ्यात पहिले ऑप्टिकल इमेज स्टॅबिलाईझेशन चा फोन नोकिया लुमिया 920 हा बाजारात आला.
शेअर
करा मित्रांसोबत ;
- आशा करतो तुम्हाला दिलेली माहिती "Optical Image Stabilization म्हणजे काय ? (Explained In Marathi) " आवडली असेल. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद,
टिप्पणी पोस्ट करा