MEMORY CARD म्हणजे काय ? कुठला घ्याव.
(CLASS-2,CLASS-4,CLASS-6,CLASS-10, UHS-1,UHS-3)
Memory Card गरजेची वस्तू ;
- आपण केव्हाही मेमरी कार्ड घेतो तर जाणून घेऊ तुमच्या मोबाईल साठी कुठल कार्ड घेणं योग्य राहील.
मेमरी
कार्ड चे तीन प्रकार ;
- मोठा मेमरी कार्ड
- मायक्रो SD कार्ड (जो आपण सध्या मोबाईल साठी वापरतो)
- मिनी SD कार्ड (2,3 वर्षापूर्वी वापरायचे आता इतका वापरात नाही येत)
मायक्रो
SD कार्ड चे तीन प्रकार ;
- SD (फक्त 4GB पर्यंत बनू शकतात)
- SD_HC [HIGH CAPACITY](4GB ते 32 GB पर्यंत बनू शकतात.)
- SD_XC[EXTENDED CAPACITY] (32GB पासून 2TB पर्यंत बनू शकतात)
मेमरी
कार्डचे स्पीड नुसार प्रकार ;
कार्ड
च्या स्पीड च्या हिशेबाने सुद्धा खूप साऱ्या प्रकारात मोडतात.
- CLASS 2, CLASS 4, CLASS 6, CLASS 10, UHS 1 आणि UHS 3
- क्लास मेमरी कार्ड वर एक गोल असतो त्यावर लिहिलेल असते. मेमरी कार्ड किती क्लासच आहे.
- क्लास म्हणजे काय कशासाठी ;
- क्लास नंबर्स असतात तो त्यांचा स्पीड असतो, जर तुम्ही कार्ड मध्ये कुठला डाटा ट्रान्सफर करणार असलात तर तेवढया स्पीड ने डाटा ट्रान्सफर होतो जेवढा क्लास जास्त तेव्हढा स्पीड जास्त.
क्लास
चा स्पीड ;
- क्लास 10 चा मेमरी कार्ड असेल तर 10 मेगाबाईट्स प्रति सेकंदाला ट्रान्सफर करतो जर तुम्ही त्या कार्ड मध्ये कुठला डाटा टाकत असाल तर.
UHS-1
आणि UHS-3 चा स्पीड
- UHS-1 आणि UHS-3 चे जे मेमरी कार्ड असतात. त्यांचा जो स्पीड आहे तो 300 मेगाबाईट्स प्रति सेकंदानुसार जाऊ शकतो.
तुमच्यासाठी कुठला Memory Card योग्य जाणून घ्या :
मूव्ही
आणि गाणे बघणाऱ्यासाठी ;
- तुम्ही मेमरी कार्ड चा वापर फक्त मूव्ही आणि गाणे बघायला वापरत असाल.
- तुम्ही क्लास-4 च्या वरचा कुठला हि मेमरी कार्डचा वापर करू शकता. क्लास-4 घ्या त्यातही मस्त चालेल सर्व काही कुठला हि प्रॉब्लेम येणार नाही.
HD रेकॉर्डिंग करणाऱ्यासाठी ;
- तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये HD रेकॉर्डिंग करू इच्छिता आणि ती HD रेकॉर्डिंग तुम्ही कार्ड मध्ये सेव्ह करणार असलात.
- तुम्ही कमीत कमी क्लास-6 च तरी मेमरी कार्ड घ्यायला हवाय.
- तुम्ही क्लास-४ च कार्ड घेतला आणि जर एखादी HD व्हीडिओ रेकॉर्ड होत असेल तर तो कार्ड त्या स्पीड ला तेवढ्या फास्ट ने सपोर्ट नाही करू शकणार.
- तुमची जी व्हिडिओ आहे ती थोडी तुटक अटकलेली अशी भेटेल.
4K व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्यासाठी ;
- तुम्ही 4K व्हिडिओ रेकॉर्ड करणार असलात. आणि त्यासोबत फोटो पण क्लीक करणार.
- तुम्हाला कमीत कमी UHS-1 च तरी मेमरी कार्ड खरेदी करावे लागेल.
4K व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्यानी UHS-1 का ?
- तुम्ही 4K कॅमेरा मध्ये क्लास-6 किंवा क्लास-10 चा कार्ड वापरलत तर तुम्ही बोलणार तुमच्या मोबाईल मध्ये चांगली रेकॉर्डिंग होत नाही, हँग होतोय बंद पडतोय तर त्यासाठी योग्य UHS-1 मेमरी कार्ड घेणं खूप गरजेचं आहे.
कॅमेरासाठी कुठला मेमरी कार्ड योग्य ?
- तुम्ही मोबाईल मध्ये कार्ड नाही वापरत कॅमेरा मध्ये कार्ड वापरत असाल.
- DSLR व बाकी कमेरामधून नॉर्मल शूटआऊट करत असाल तर तुम्हाला क्लास-10 किंवा क्लास-6 च्या वरती तरी कुठलाही कार्ड तुमच्यासाठी चांगला असेल.
- तुम्ही त्यात RAW इमेजेस क्लिक करता आणि 4K विडिओ रेकॉर्ड करता तर तुम्हाला कमीत कमी UHS-1 आणि UHS-3 घ्याव लागेल तेव्हा तुमच्यासाठी ते योग्य राहील.
- कार्डचा स्पीड कमी असेल तर तुमचा फोटो चांगला नाही येऊ शकत. आणि कॅमेराही त्याला नीट कॅपचर नाही करू शकत.
MOVE
ऐप्स SD CARD वाल्यांनी कुठला कार्ड घ्याव ;
- मोबाइल मध्ये ऑप्शन असतो कि तुमचा जो ऍप्स चा जो डाटा आहे तो SD कार्ड मध्ये MOVE व्हायला हवा.
- तुम्हाला कमीतकमी क्लास 10 च कार्ड घेणं खूप गरजेचं आहे.
- तुम्ही अँप्स चा डाटा मूव्ह केलात आणि जर तुमच्या कार्डचा स्पीड कमी असेल. जेव्हा तुम्ही एप् वापरणार तर लोड व्हायला खूप टाईम घेणार. आणि मोबाईल हँग हि होऊ शकतो.
- तुम्ही दोष देणार कि माझा मोबाईल हँग होतोय,गेम नाही चालत हे नाही होत ते नाही होत त्यासाठी तुमचा मेमरी कार्ड 10 क्लास तरी गरजेचं असत.
- स्लो चालत असेल काही तर ह्याचा अर्थ असा कि तुमचा जो मेमरी कार्ड आहे तो मोबाईल साठी तुम्ही कमी क्लास चा वापरलाय.
तुमच्यावर
आहे,
- तुम्ही फक्त गाणे आणि मुव्ही बघत असाल तर क्लास-4 स्पीड.
- ऍप्स मूव्ह करायला वापरतात तर क्लास-10 स्पीड
- HD रेकॉर्डिंगसाठी वापरता तर क्लास-6
- 4K रेकॉर्ड करणार असलात तर UHS-1 किंवा UHS-3
मेमरी कार्ड किंमत ;
* प्रत्येक
कार्ड ची किंमत हि खूप कमी व जास्त असते. त्यामुळे खरेदी करताना नीट बघा तुम्हाला
कुठले गरजेचे आहे व तेच खरेदी करा.
शेअर
करा मित्रांसोबत ;
- · आशा करतो तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल. "MEMORY CARD म्हणजे काय ? कुठला घ्याव ?[INFORMATION IN MARATHI]" तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद,
टिप्पणी पोस्ट करा