"स्पर्धा परीक्षासाठी गणिताचा अभ्यास उत्तम गुणवत्तेसाठी कसा कराल" जाणून घ्या
कोचिंग
क्लास ?
- तयारीसाठी लोक कुठल्यातरी कोचिंग क्लास ला जॉईन करतात.
- कोचिंग जॉईन करण्यासाठी दोन पद्धती अवलंबतात. एक तर मित्राला विचारल जात, नाहीतर पेपरमध्ये जाहिरात बघितली जाते.
- जाहिराती हि अशा असतात कि भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर लगेच ह्यांनी शिकवायला सुरवात केलेली असते आणि इतके इतके लाख विद्यार्थी त्यांनी शिकवले असतात अस त्याचं म्हणना आहे.
- सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा असतो कि ते फक्त सांगतात कि किती लोकांच सिलेक्शन झालय किती लोकांच सिलेक्शन झाले नाही ते सांगतच नाहीत.
कोचिंग
क्लासच सत्य
- तुम्ही कितीही चांगली कोचिंग जॉईन करा पण 4% पेक्षा जास्त निकाल कुठल्याही क्लास चा नसतो.
- कोचिंग वाले सांगतात कि त्यांच्या कडे 4हजार लोकांच सिलेक्शन झालय. पण त्याच बरोबर त्यांच्या कडे अशे हि मुले असतात. त्यातले 96 हजार लोकांच सिलेक्शन नाही होत.
- 96 हजार लोकांच सिलेक्शन का नाय होत त्यांनी इतकी मेहनत केलेली नसते जेवढी करायला पाहिजे होती.
सिलेक्शन
कुणामुळे होत ?
- सिलेक्शन कोचिंग मुळे नाही होत सिलेक्शन मेहनत केल्या मुळे होते. त्यामुळे कोचिंग क्लासेस ला खूप जास्त महत्व देण्याची काही गरज नाही आहे.
कोचिंग
क्लासची अवस्था
- कोचिंग क्लास असतात त्यांच्या 1 बॅच मध्ये 300 ते 350 मुले बसतात. आणि 1-1 टीचर त्यांचे त्यांचे विषय शिकवतात.
कोचिंग
मध्ये शंकेच निरसन होत का ?
- कुठल्या स्टुडंट ला शंका असली तरी तो शंकेचे निरसन करून घेऊ शकत नाही का नाही करून घेऊ शकत आता 1 तासाचा क्लास असतो त्यात 30 च्या वरती जरी मूल असली तरी त्यात तुमचे डाऊट, शंका त्यांचं निरसन दूर नाही केलं जाऊ शकत.
- तुम्ही कोचिंग क्लास जॉईन करता तुमच्या शंका दूर व्हायला आणि त्याच जर दूर होत नसतील. म्हणजे 20 ते 25 हजार खर्च खरून सुद्धा तुम्ही तुमचे डाऊट क्लिअर नाही करून घेऊ शकत ते पण का तर, समोरच्याला फक्त पैसा कमवायचा आहे. आणि खूप जास्त पैसा कमवायचा आहे.
गणिताचा क्लास
लावायचा उत्तम पर्याय :
- गणिताचा क्लास लावायचा सगळ्यात उत्तम पर्याय म्हणजे तुम्ही कुठल्या तरी अशा शिक्षकाला निवडा जो शाळेत शिकवत असेल.
काय
शिकून घ्याल ;
- शिक्षकाकडून 6 वि, 7 वि, 8 वि, 9 वि, 10 वि च गणित शिकून घ्या. कारण ह्या सगळ्या गोष्टी आपण पहिलेच शिकलेलो असतो त्यामुळे 5 वर्षाचा जो अभ्यास असतो तो आपण 5 महिन्यात करू शकतो.
- त्या शिक्षकांकडून तुम्ही 1 तास शिकल्यानंतर तुम्ही 2 तासाची प्रॅक्टिस केली तर तुम्ही प्रत्येक प्रॉब्लेम च सोल्युशन फाईन्ड आऊट करू शकता. त्यामुळे तुम्हाला हे सुद्धा समजेल कुठल्या प्रकारच्या प्रॉब्लेमला कशा प्रकारे सोडवल जात.
फायदा काय होतो ?
- शिक्षक तुम्हाला घरी येऊन शिकवत असतील तर तुम्ही तुमचा एक एक डाऊट क्लिअर करून घेऊ शकता.
- ह्या गोष्टीचा फायदा हा होतो कि तुम्ही सोप्या गोष्टी शिकून घेत असता त्यामुळे तुमच्या कडे शिकण्यासाठी व समजण्यासाठी खूप वेळ असतो. तुम्ही इतके प्रॉब्लेम सोडवले असतात. कि तुम्हाला त्याच पूर्ण प्रोसेस समजायला लागते.
- हया सगळ्यामुळे तुम्हाला गणिताचे फॉर्म्युला, आणि ट्रिक नव्याने शिकायची गरज भासत नाही तुमचं कॅलकुलेशन खूप फास्ट व्ह्यायला लागलेलं असत.
- फॉर्म्युला शिकण्यापेक्षा व लक्षात ठेवण्या ऐवजी तुम्ही बेसिक शिकलात तर तुमचा कॅलकुलेशन फास्ट होत. अस नाही सांगत कि फॉर्म्युला नका शिकू फॉर्म्युला पण शिका ज्यांची प्रोसेस खूप लांब लचक आहे त्यांचे फॉर्म्युला शिकून घ्या.
- जेव्हा आपण फॉर्म्युला आणि शॉर्ट ट्रिक्स शिकतो तर गणिताची प्रॅक्टिस करण बंद करतो. अस कधीच केलं नाही पाहिजे. गणिताच aptitude नॉलेज वाढवण्यासाठी सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे तुम्ही तुमच्या प्रोसेस ला समजून घ्या. आणि ट्रिकस फक्त त्या गोष्टींची शिका ज्यांची प्रोसेस खूपच लांब आहे.
- तुम्ही जर रोज 2 तास तरी नीट अभ्यास केला तरी 6 वि,7वि,8वि,9वि,10वि, चा गणित हे 3 ते साडेतीन महिन्यातही होऊ शकत. तीन महिन्यात NCERT चा मॅथ्स ची पुस्तके सोडून होतात.
- जर तुम्ही 10 वि ची तयारी करत असाल तर सकाळी संध्याकाळी गणिताचे 5 -5 गणिते सोडून बघत जा.
- तुम्ही कुठल्याही स्पर्धापरीक्षेची तयारी करत असाल तर गणित हे 6वि,7वि,8वि,9वि,10वि च येत असत.
- गणिताचा स्पर्धेपरीक्षेसाठी अभ्यास करण्यासाठी ह्या पेक्षा उत्तम पर्याय कोणताही नाही आहे.
शेअर
करा मित्रांसोबत ;
- आशा करतो तुम्हाला दिलेली माहिती "स्पर्धा परीक्षा साठी गणिताचा अभ्यास उत्तम गुणवत्तेसाठी कसा कराल" जाणून घ्या " आवडली असेल. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद...!
टिप्पणी पोस्ट करा