नोकरी
करताना स्पर्धा परिक्षांची तयारी कशी कराल
- जर कुठला व्यक्ती नोकरी करतो तेव्हा तो नोकरी सोबतच अभ्यासासाठी खूप जास्त वेळ नाही देऊ शकत.
- तुमच्याकडे जर उत्तम स्ट्रॅटेजी असेल तर सगळ्या गोष्टी शक्य होऊ शकतात.
- कुठलाही क्लास जॉईन करू नका. कारण तुम्ही रेग्युलरली नाही जाऊ शकत.
- तुमच्याकडे वेळ खूपच कमी आहे. त्यामुळे तुमचा वेळ हा थेअरी वाचण्यात वाया नका घालवू.
- तुम्ही ज्या स्पर्धापरीक्षेची तयारी करताय. तुम्ही फक्त आणि फक्त त्या परीक्षेचे पेपर सोडून बघायला सुरवात करा.
- तुम्ही जेव्हा प्रश्नपत्रिका सोडवायचा प्रयत्न कराल तेव्हा तुम्हाला थेरी हि समजत जाईल.
- रिझनिंग ला पुस्तके वाचून नाही शिकू शकत. रिझनिंगसाठी नेहमी ट्रिक असतात आणि ट्रिक ह्या प्रत्येक उत्तरात असतात.
- गणितात जास्त स्टुडंट हे फॉर्म्युला शिकण्याच्या चक्कर मध्ये पडतात आणि जेव्हा कुठला प्रॉब्लेम सोडवायला जातात तेव्हा प्रॉब्लेम नाही सोडवत फक्त बोलतात हा ह्याच्यात हा फॉर्म्युला लागेल आणि ह्या सवयीमुळे गणिताचा स्पीड खूप कमी होतॊ व त्याच नुकसान परीक्षेत भोगायला लागत.
- कुठल्याही विषयाचं तुम्ही समजून एक्सप्लेनेशन शिकलात तर खूप चांगला अभ्यास होईल. थेरी वाचून नाही शिकू शकत.
- तुम्ही प्रश्नपत्रिकांचा सेट्स लावा आणि उत्तर समजून घेऊ शिका.
- तुम्ही फक्त त्याचा अभ्यास नका करू जे तुम्ही चुकीचं उत्तरे लिहिलेत तुम्ही तेही वाचा जे तुम्ही बरोबर लिहिलंय.
- तुम्ही नोकरी बरोबर स्पर्धापरिक्षांचा अभ्यास करत असाल तर तुम्ही तुमचा सगळं अभ्यास कामावर जाण्याआधीच करत जा.
अस
का,
- कारण तुम्ही ऑफिस मध्ये 4 ते 5 तास काम केल्यावर मेंटली थकणार. मग तुम्हाला काही शिकायचं असेल काही अभ्यास करायचं असेल तुम्ही पूर्ण ताकदीने नाही करू शकत. त्यामुळे अभ्यास पहिले केला पाहिजे.
- तुमचा ऑफिस जर 10 ला चालू होत असेल तर तुम्ही ऑफिस मध्ये किंवा ऑफिस जवळ 7 वाजताच जा व अभ्यास करत बसा जेव्हा 9.55 होतील तेव्हा पटकन ऑफिस मध्ये जा.
- ऑफिस वरून घरी आल्यावर चहा न पिता 1 तास झोपा आराम करा. नंतर उठल्यावर फ्रेश व्हा म्हणजे तुमचा पुन्हा अभ्यासात मन लागेल.
- तुम्ही नोकरी करता तेव्हा तुम्हाला अलार्म ची गरज नको भासायला पाहिजे. तुम्हाला आपोआप जाग यायला हवी. जाग तेव्हाच येते. जेव्हा तुमची झोप पूर्ण होते.
- तुमची जर झोपच पूर्ण नसेल होत तर त्याचा परिणाम तुमच्या कामावर व तुमच्या अभ्यासावर सुद्धा होतो. त्यामुळे तुम्हाला तुमची झोप जरूर पूर्ण करायला पाहिजे.
- फक्त आणि फक्त स्टुडंट साठी आहे कि त्यांनी सकाळी चार वाजता अभ्यास करायला पाहिजे कारण ते दिवसही झोपू शकतात.
शेअर
करा मित्रांसोबत ;
- · आशा करतो तुम्हाला दिलेली "नोकरी करताना स्पर्धापरिक्षांची तयारी कशी कराल" माहिती आवडली असेल. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद,
टिप्पणी पोस्ट करा