"करिअर निवडताना बेस्ट प्लानिंग कस कराल त्यासाठी कुठल्या प्रकारची माहिती हवी आहे जाणून घ्या आत्ताच "
![]() |
करिअर निवडायचा बेस्ट प्लान कसा कराल आताच जाणून घ्या |
- करिअर प्लानिंग कशी करतात आणि उत्तम करिअर प्लानिंग
करण्यासाठी कोणत्या गोष्टीवर लक्ष द्यावा लागेल.
- खूप लोकांचा विचार असा असतो कि एक चांगला करिअर प्लान
म्हणजे एक चांगल्या परीचया पासून सुरु होतो. आणि ऑफर लेटर वर संपतो.
- पण खर तर चांगला करिअर म्हणजे परिचया पासून सुरवात होते.
आणि चांगला करिअर देत.आणि तो करिअर मेल्यानंतरही चालू असतो.
- उदाहरणार्थ:
काम हे आपल्या आयुष्यातला अर्धा हिस्साच आहे ८ तास
आपण कामं करतो, ८ तास आपण आराम करतो आणि उरलेले ८ तास आपण बाकीचे
काम करतो. तुमच काम तुमची ओळख निर्माण करून देत असतो. हा कोण हे, हा शिकवतो म्हणजे शिक्षक आहे, हा गाडी चालवतो म्हणजे चालक
आहे, हा जेवण बनवतो म्हणजे कुक आहे, हा चोरी करतो म्हणजे चोर आहे, जी काम
तुम्हाला ओळख निर्माण करून देते. ते काम तुम्ही मन मारून रविवारच्या सुट्टीचा
विचार करता करता केल तर. आणि तुम्ही काम केलही तरी तुम्ही काही मिळवू नाही शकत.
अचिव्ह(Achive ) नाही काही करू शकत. तुम्ही
जे काही काम करत आहात ते काम करण्यात तुम्हाला मजा येत नसेल तर याचा अर्थ भलेही
तुम्ही १०० मैल चालाल पण त्याच जागेवर उभे आहात. पुढे नाही जाणार. म्हणजे काम तर
करत आहात पण पोहोचत कुठेच नाही अचिव्ह(Achive) काहीच
होत नाही.
- जगात चार प्रकारची लोक असतात.
- १) ज्यांना नोकरी करायची असते पण त्याच्यात क्षमता नसते.
- २) ज्याना नोकरी करायची आहे. क्षमता पण असते पण नोकरीच नाही
लागत. "नोकरी का नाही लागत अशा लोकांची त्यांच्या ज्या
स्किल साईड(Skill Side) आहेत. त्या नोकरी साठी योग्यता नाहीत. ते मास्टर, डिग्री
करूनही त्यांच्या स्किल उच्च दर्जाच्या नाहीत म्हणून ते क्लर्क साठी आवेदन
करतात. "जरा विचार करा कि तुम्ही मास्टर ,
डिग्री, पी.एच.डी
क्लार्क च्या नोकरीसाठी केली होती का.
- ३) नोकरी करायची असते. क्षमता असते
नोकरी पण लागते. पण नोकरी पसंद नसते. " ९०% टक्के लोक ह्याच प्रकारचे असतात. ते पूर्ण आठवडा
सुट्टीचा विचार करत असतात. आणि सोमवारी पूर्ण मूड ऑफ असतो ह्या लोकांचा. आणि
शनिवारी चला पीछा सुटला पिडा टळली. अशा प्रकारची अवस्था असते. ९०% लोकांच असच
होत आणि त्याचं आयुष्य असच चालत. म्हणजे हा जो व्यक्ती असतो ५,१०,२०,४०, वर्ष
पर्यंत तेच काम करतो जे त्याला आवडत नसत. तो त्या कामाला त्यामुळे करतोय कारण
त्याला पैसा हवा असतो. त्याला ते काम करून काही मजा नाही येत. "पहिली
गोष्ट हि आहे कि करिअर कौन्सिलिंग च्या नावाखाली आजही काहीच नाही होत".
- खूप विद्यार्थ्यांचा कल असा असतो कि गणित घेतल तर
इंजिनिअर बनू, बायोलॉजी घेतल तर डॉक्टर बनू, कॉमर्स
घेतल तर Charted Accountant बनू, आणि एल.एल.बि. केल तर वकील बनू,
५००० प्रकारच्या नोकऱ्या आहेत.
ज्याच्या बद्दल लोकांना माहीतच नसत. अशी खूप सारी लोक हेत त्यांना हेच माहित
नाही जर तुम्हाला एक दोन गोष्टीमध्ये जरी नैपुण्य असले तरी तुम्ही आरामात १५
टे २०,००० हजारा पर्यंतची नोकरी करू शकता. प्रत्येक नोकरी साठी
एक प्रकारच स्किल लागत. जर तुम्हाला त्या स्किल बद्दल योग्य ते ज्ञान मिळवल
तर नोकरी भेटेल. जर तुमच करिअर कौन्सिलिंग झालच नाही आहे. तुम्हाला माहितच
नाही हे ५००० प्रकारच्या नोकऱ्या व त्यासाठी काय स्किल लागत ते. त्यामुळे अशा
तीन प्रकारची लोक भेटतात.
- ज्यांना नोकरी करायची असते पण त्याच्यात क्षमता नसते, ज्यांना नोकरी
करायची आहे क्षमता पण असते पण नोकरीच नाही लागत, नोकरी
करायची असते. क्षमता असते नोकरी पण लागते. पण नोकरी पसंद नसते. आणि
हे सगळ अस का झाल कारण कधी करिअर कौन्सिलिंग झालीच नाही.
- १० वि, ११ वि, १२ वि, पहिला वर्ष,
दुसरा वर्ष, तिसर
वर्ष , चौथे वर्ष,
हे विद्यार्थ्याचे महत्वपूर्ण वर्ष
असतात.
- पण
१० वि, ११
वि ,१२ वि, पहिला वर्ष,
दुसरा वर्ष, ह्या
वेळेत कुठ्ल्याही विद्यार्थ्याला कान नसतातच.
- जेव्हा तो तिसऱ्या-चौथ्या वर्षात जातो. फाईनल वर्षात जातो
तेव्हा तो इंटरनेट पुस्तक वैगेरे वाचतो. तेव्हा त्याला कळत कि यार मला तर खूप
अशा गोष्टी माहितच नाही आणि मला अजून काहीच ज्ञान नाही. मला तर माझ्या
विषयाचं सुद्धा इतक माहित नाही. आणि मला अजून नीट इंग्लिश सुद्धा येत नाही.
आता हा पूर्ण शुद्धीत येतो. अशा वेळेस त्याला जे काही सांगितला जात तो ते
करेल, पण वेळ नाही हे,
काही विद्यार्थांना अजूनही कसलाच
थांग पत्ता नसतो ते ग्रेजुएशन(Graduation)
करतात. मग एम.बि.ए ला जातात. मग
स्पर्धापरीक्षा देतात. आणि दोन तीन वर्ष तयारी करतात. मग जी नोकरी भेटेल ती
करतात. सरकारी नाही जी भेटेल ती करतात. आणि बाकीच आयुष्य रविवार-शनिवारच्या
सुट्टीची वाट बघत निघून जाते. ९०% असच काही तरी होत.
- बाकीचे १० टक्के मूल असतात. ते एक तर १० वि लाच जागे
होतात नाहीतर, पहिल्या वर्षीतर कशेही जागेच होतात आणि
- अशी मुल ४) था प्रकार बनवतात नोकरी पण
लागते. आवडते सुद्धा. आणि क्षसम सुद्धा असतात.
- अशा
लोकांसाठी सात हि दिवस एकसारखेच असतात. आणि ते खूप सारा आनद घेऊन येतात
त्यांच्या आयुष्या मध्ये.
- पण ह्याचा अर्थ असा नाही आहे कि आता काहीच नाही होऊ शकत.
जेव्हा तुम्ही जागे होणार तेव्हा सकाळ मी आता जे काही रूल सांगेल ते वापरले
तर तुमच्या आयष्यात निराशा नाही येणार. आणि ६ महिनेच करा. ६ महिन्यात काही
जादू नाही होणार. जुने पाप हळू हळू धुतले जातील.
- जर तुम्ही १ वर्षापर्यंत हे रुल वापरलेत तर
तुम्ही शानदार करिअर बनवाल.
- चांगला करिअर बनवण्यासाठी तुम्हाला हे
रूल वापरावे लागतील ह्याच क्रमात करावे लागतील आणि ह्यात थोडा सुद्धा बदल
करून चालणार नाही जसा आहे तसाच करा.
- १) सर्वात पहिले कागदावर लिहा तुम्हाला कोणत्या ५ गोष्टी
हव्यात ज्या तुम्हाला तुमच्या नोकरी मधून हव्यात आणि जे जास्त महत्वपूर्ण हे
तुमच्यासाठी ते सगळ्यात वरती लिहा. आणि जे इतका महत्वपूर्ण नाही हे
तुमच्यासाठी ते खाली लिहा. ह्याचा एक फायदा आहे कि तुम्ही शनिवार रविवारची
वाट नाही बघणार जेव्हा तुम्ही नोकरी कराल. ह्यात सगळ एकदम इमानदारी मध्ये
लिहा कारण हा कागद तुम्हाला कुणाला दाखवायचा नाही आहे.
- २)तुम्ही
स्वताला ओळखा. काही लोक असे असतात कि ते स्वत:ला ओळखूच शकत नाही कारण त्यांना
कोणी विचारतच नाही कि सांग तुझी मनापासून तुझी इच्छा काय आहे. आणि ह्याचा
तोटा तेव्हा होतो जेव्हा मुलाखतीत विचारतात कि तुमचा छन्द (hobby) काय
आहे. तुझ्या मध्ये काय अस ज्ञान हे त्यात तु बहाद्दूर आहेस.(strenght). तुजी
कमजोरी काय (weakness) काय आहे. आणि मग त्यामुळे सगळ्यांच्या छन्द (hobby) असतात
गाणे एकने. आणि
- (Strenght) विचारला
तर सांगतात कि प्रामाणिक आहे,
हार्ड-वर्किंग आहे. आणि कमजोरी
मध्ये हि सामान्य असे काही तरी सांगतात. तुम्ही केव्हाही आयुष्यात इंटरव्ह्यू
देणार तर ह्या ४ गोष्टी केव्हाही विचारल्या जातील.
- १.परिचय(Introduction)
- २.छन्द(Hobby)
- ३.शक्ती ( Strenght)
- ४.कमजोरी (Weakness)
- ह्या चार गोष्टी नेहमी विचारतात म्हणून ह्या बद्दल
आपल्याला माहिती पाहिजे. आणि ह्या गोष्टी,
ह्या साठी पण माहिती पाहिजेत कि
आपण काय करण्यासाठी क्षसम आहोत आणि काय करण्यासाठी क्षसम नाही. तुम्ही व्हाटस
एप(Whats App) वर वाचलेच असेल कि (Nothing
Is Impossible) पण अशा गोष्टी
जिथे पाहिजेत तिथेच वापरा सगळीकडेच नका वापरू कारण काही गोष्टी अशा असतात कि
योग्य माणूस ते काम करू शकतो. प्रत्येक गोष्ट आपण नाही करू शकत. तर तुम्ही
तुमच्या शक्ती (strenght) आणि कमजोरी (weakness)
पहिले शोधा मगच त्या हिशोबाने पुढे
वाटचाल करा.
- तुमच्या शक्ती (strenght)
आणि कमजोरी (weakness) माहित
करून घेण्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे.
- SWOT Analysis [शक्ती ( strenght),कमजोरी (weakness),संधी(Oportunity),(Threats)] याचं विशेल्षण
- दोन
भाग करा एका भागात तुमचे शक्ती लिहा,
दुसऱ्या याच्यात तुमच्या कमजोरी
लिहा. हे दोन्ही लिहिण्यात तुम्ही कितीही लोकांची मदत घेतली तरी चालेल, तुमचे
आई बाबा, मित्र, शिक्षक, आणि हे दोन्ही भाग लिहिल्यावर तिसरा भाग बनवा. आणि त्यात
लिहा तुम्ही शक्ती आणि कमजोरी या दोन्ही बाजूंचा विचार करून तुम्ही काय काय
कामं करू शकता. ४ भाग बनवा त्यात लिहा शक्ती आणि कमजोरी याचा विचार करून
तुम्ही करू शकलेले काम काय चुकीच केल तर बिघडेल.
- ३) Never
Work On Weakness(तुमच्या
कमजोरीवर काम करू नका)
- कधीही तुमच्या कमजोरीला दूर करण्याचा प्रयत्न करू नका
त्यांना तसच राहू द्या. पण जर तुमची कमजोरी तुमची मजबुरी बनत असेल. तर मग
त्याच्यावर मेहनत करा आणि मन लाऊन मेहनत करा.
- तुम्हाला याच एक उदाहरण देतो.
सचिन हा गणितामध्ये ८० गुण मिळवतो व इंग्लिश मध्ये
५० तर त्याने गणिताचा अजून अभ्यास केला पाहिजे जर त्याने गणिताचा अजून अभ्यास केला
तर तो ९०-१०० पर्यंत पोचू शकतो. राहुल हा गणितामध्ये ३५ गुण मिळवतो व इंग्लिश
मध्ये ८० तर त्याने इंग्लिश चा अभ्यास केला पाहिजे कारण जर त्याने इंग्लिश चा
अभ्यास नाही केला तर तो नापास हि होऊ शकतो. राहुल ची
इंग्लिश त्याची कमजोरी नाही तर टी आता त्याची मजबुरी आहे.म्हणून आता राहुल ला
इंग्लिश साठी मेहनत करावी लागेल.आणि ती मन लाऊन मेहनत केली पाहिजे.
- अस का तर जितक्या वेळेत तुम्ही तुमच्या कमाजोरीला दूर करू
शकता. आणि तितक्या वेळेत तुम्ही तुमच्या शक्तीला १० पटीने वाढू शकता.
- ४) तुमच्या शाळेतील,
महाविद्यालयातील शिक्षकांना नेहमी
गुड मोर्निंग, वैगरे बोलत जा आणि तुमच्या वडीलधारयाशी खूपच अज्ञापुर्वक
वागा त्यांना मान सन्मान द्या,
आणि आपल्या शिक्षकाना नेहमी विचार
त्यांना सांगा सर माझ्या लायक काही काम असेल तर जरूर सांगा, आणि
ते काम करण्यास थोडा फार त्रास झाला तरी तो त्रास सहन करा.
- अस का तर कारण जेवढ्या नोकरया आहेत त्यातल्या ५ टे १०
टक्के नोकर्याच वर्तमान पत्र व इंटरनेट वर असतात. त्यांच्या जाहिराती
केल्या जातात. बाकी सगळ्या ७५
टक्के नोकऱ्या ज्या असतात. त्यांची
जाहिरात कधीच होत नाही. त्या सर्व नोकऱ्या अंतर्गत संदर्भ(Internal Reference) वापरून दिल्या जातात. म्हणजे कंपनीचा व्यवस्थापक(Manager) असतो
तो सगळ्यांना सांगतो कि आपल्या कंपनी मध्ये नोकरी आहे तर बघा कुणी आहे का
तुमच्या ओळखीचा तुमच्यासारखा चांगला काम करणारा.म्हणजे ७५ टक्के
नोक्ररयाबद्दल तुम्हाला माहितच नाही होत कि कुठे नोकऱ्या आहेत का नाहीत. आणि
सगळ्यात मोठा प्रश्न हा पडतो कि अंतर्गत संदर्भ (Internal Reference) असतो तो आणायचा कुठून तो येतो तुमच्या Respect ने
बघा तुमचे जे वरिष्ठ(senior)आहेत. त्यांना तुमच्या आधी नोकरी लागणार. महाविद्यालयात
जेवढ्या नोकऱ्या भेटतात (Campus)
तेव्हा तुम्ही वरिष्ठ(senior)
ला जाऊन विचारू शकता कि सर काय काय प्रश्न(Question) विचारतात. आणि भलेही तुम्हाला त्या प्रश्नांची(Questions)
उत्तर(Answer) माहित नसतील तरी तुमच्या कडे पूर्ण सेमिस्टर असतो. त्या
प्रश्नांची उत्तरे शोधायला. भलेही त्याच सिलेक्शन नाही झाल तरी तुम्हाला
प्रश्न तर माहित पडतात. भलेही त्याला नोकरी लागली या नाही लागली तुम्ही नक्की
नोकरी लागणार. दुसरा फायदा ज्या वरिष्ठची(Senior)ची नोकरी लागते. तुम्ही त्याला पूर्ण वर्ष मान दिला होता
गुड मोर्निंग वैगेरे बोलला होता. जेव्हा कधी त्यांच्या कंपनी मध्ये जागा
शिल्लक राहतील तेव्हा अंतर्गत संदर्भ (Internal
Referance)तुम्हाला भेटणार. अस का होणार कारण
तुम्ही त्या वरिष्ठाची(Senior)ची तेव्हा इज्जत केली होती. जेव्हा त्यांचे आई-वडील
त्याला सक्षम समजत नव्हते.
- ५)Invest
Your Self(तुमच्यावर खर्च करा)
- तुमच्यावर खर्च करा म्हणजे गाडी घेणे. मोबाईल घेणे अस
नाही. तुमच्यावर खर्च करणे याचा अर्थ असा होतो कि तुमचा वेळ आणि पैसा अशा
ठिकाणी खर्च करा कि तुमच ज्ञान आणि पेसा,
क्षमता वाढतील अशा ठिकाणी खर्च
करणे.
- जेव्हा वेळ असेल तेव्हा पुस्तक वाचा, प्रेरणात्मक
(Motivational) पुस्तक वाचा,
किवा तुमचे सर्व विषय असतात
त्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या विकीपेडिया च्या माध्यमातून, इंग्लिश
शिका, शरीर कमवा (build
Body), लायबरीमध्ये जा, ह्याचा
फायदा हा होतो कि तुमचा सारांश(Resume)
जो असतो तो खूप वजनदा होतो, यशस्वी
होण्यासठी तुम्ही जे काही कराल ते सर्व तुम्ही फेसबुकवर जरूर अपलोड करा जेवढे
H.R असतात. तेवढे कुणालाही कंपनी मध्ये जॉईन करण्या आधी
त्याची फेसबुक प्रोफाईल जरूर बघतात. त्याच्या मुळे नेमकी अंदाज येतो कि
समोरचा व्यक्ती आहे तो कशा प्रकारचा,
तुमच फेसबुक अकाऊंट एकदम नीटनीटक
ठेवा कारण ते बघितल्यावर समोरच्याला वाटला पाहिजे समोरचा व्यक्ती खुपच शिकलेला(Well-Educated)आहे.
- जेव्हा तुम्ही प्रेरणात्मक पुस्तक वाचता तेव्हा तुम्हाला
एक पोजिटीव्ह(Positive) एनर्जी भेटते. जेव्हा तुम्ही तुमचे विषय विकिपेडिया(Wikipedia) वर
अजून जाणून घ्यायचा प्रयत्न करता तर तुम्हाला कळततुम्ही ज्या विषयच अभ्यास
करता ते नक्की सध्या चालू काय आहे. आणि जेव्हा तुम्ही इंग्लिश शिकता तेव्हा
तुम्ही स्वतःविचार करा ४ वर्ष नंन्तर तुमच्या इंग्लिश ची लेव्हल किती उत्तम
होईल. जेव्हा तुम्ही शरीर कमावता(body
build)करता तेव्हा तुमच शरीर अभिमानाने
सांगते माझ व्यक्तिमत्व (Personality)
तर बघा. जेव्हा तुम्ही नोकरी करता
तेव्हा तुम्ही खरतर पूर्ण जग बघत असता नक्की काय होत ह्या जगात ते अनुभवत
असता. एवढा सगळा करून जेव्हा तुम्ही मुलाखतीला जाणार तर तुम्हाला बघून अस
वाटणार कि जसा काय एखादा वाघ चालत येतोय. एवढा सगळा केल्यानंतर तुमच्या
चारित्र्याने(Profile) आणि फेसबुक प्रोफाईलने तुमचा ८०% काम तर केलेलच आहे.
- आणि २०% टक्के काम हे आहे कि तुम्हाला त्यांना सांगायचं
आहे. समजवायचं आहे कि बोलायचे आहे कि तुमच्या समोर जो व्यक्ती उभा आहे तो मीच
आहे.
- करिअर निवडताना बेस्ट प्लानिंग कस कराल त्यासाठी कुठल्या प्रकारची माहिती हवी आहे ह्या पूर्ण मार्ग दर्शन व दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल अशी मी अपेक्षा करतो व तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद ...!
टिप्पणी पोस्ट करा