"पैसा टिकत नाही,त्यासाठी उत्तम उपाय हे तुम्ही खूप सारे पैशे वाचवू शकता आणि झटपट श्रीमंत बनू शकता"
![]() |
पैसा वाचवण्यासाठी जबरदस टिप्स |
- अशा काही टिप्स ज्यामुळे तुम्ही खूप सारा पैसा वाचवू
शकता..!
- सगळ्यात पहिले तर आपले सर्वात जास्त पैशे हे मोबाईलवर,खाण्यावर,आणि
कपड्यावर खर्च होतात, जर आपण मोबाईलचा विचार केला तर डाटा आणि
कॉल रेट चा जो त्रास होता तो तर जिओ मूळे सम्पलाय. हा पण खर्च असा होऊ शकतो
कि नवीन मोबाईल आलाय त्याला खरेदी करु पण जोपर्यंत आपण जो मोबाईल वापरतोय तो
एकतर खराब नाही होत किंवा हरवत नाही तोपर्यंत तरी नवा मोबाईल घेण्याबद्दल
विचार नाही केला पाहिजे. जर तुम्ही मोबाईल चा वापर फेसबुक,व्हाटस
ऍप,विडिओ,ऑडिओ वापरण्यात साठी वापरत असाल तर जो मोबाईल आहे त्याचाच
वापर करा.
- दुसरी गोष्ट असते ती जेवण, बघा जेवण जेवण्या मध्ये आणि पोट भरण्यामध्ये
जमीन-अस्मानाइतक फरक असतो,जेवण जेवणे म्हणजे अस जेवण जेवणे कि शरीर ला ताकद ऊर्जा भेटते, व
आपलं डोकं उत्तम प्रकारे काम करेल अशा प्रकारच खाण ह्याला जेवण म्हणतात. आणि
पोट भरणे म्हणजे अशा गोष्टी खाणे ज्याने पोट तर भरत पण त्या दोन्ही गोष्टी
नाही होत.
- जेव्हा
तुम्ही पिझ्झा,बर्गर,समोसा,कचोरी,खाता त्याने पोट भरत त्याला अन्न खाणे अस नाही म्हणत.आणि
अन्न खायचा सगळ्यात सोपा पर्याय हा असतो कि सकाळी तुम्ही घरात मस्त पैकी
नाष्टा करून निघा. आणि शाळेत,ऑफिस व कामावर डब्बा घेऊन जा.
- जेव्हा तुम्ही इकडे तिकडे थोडं फार खाता पण खूप सारे पैशे
जातात आणि आपल्याला कळत सुद्धा नाही. जर तुम्ही पैशा बरोबर तुमचं आरोग्य पण
चांगलं ठेऊ इच्छिता तर तुम्हाला जेवण बनवणं जरुर शिकले पाहिजे. जर तुम्ही कधी
बाहेर जेवायला गेलात तर कधी पण हे नको बघायला पाहिजे दुकान किती मोठ आणि
गाजलेल आहे. नेहमी हे बघितले पाहिजे कि दुकान चालत किती. अस का तर जेवढा
जास्त दुकान चालत तेवढ जास्त सामान फ्रेश ताज भेटत
- जेव्हा तुम्ही कपडे खरेदी करायला जाता. तेव्हा तुम्ही अशे
कपडे खरेदी करा जे कपडे जास्तीत जास्त कपड्याला मॅच होतिल हयाच एक उदाहरण
घ्या जेव्हा तुम्ही जीन्स खरेदी करता तर नेहमी कारबण(carbon blue) ब्लु
रंगाची जीन्स घ्या. अस का तर जगामध्ये अशे कपडे बनतच नाही जे कारबण ब्लू कलर
च्या जीन्स वर मॅच नाही होऊ शकणार.जर तुम्ही ट्राऊझर वापरत असाल तर फॉर्मल
ट्राऊझर घ्या, त्यांना तुम्ही फॉर्मल कर्यक्रमासाठी हि व पार्टी
मध्ये सुध्दा तुम्ही वापरू शकता.
- तुमच्या कडे जेवढे कमी कपडे असतील तेवढ तुमचा वेळ आणि
पैसा त्या कंपड्या ला मेंटेन करण्यात वाचतो.जर तुम्ही तुमच्या कपड्याना
इस्त्री करण्यापासून वाचवायचे असेल. तर तुम्ही लांब खांद्यावले हँगर खरेदी
करा. आणि तुम्हाला फक्त एवढ करायचं हे कि कपडे धुतल्या नंतर त्यांना पिळायच
नाही तसेच त्यांना हँगर ला सूक्त टाकायचे. मग तुमचे कपडे आपोआप इस्त्री
केल्यासारखे दिसतील.
- कधीही काहीही खरेदी करायला जायच्या अगोदर एक शॉपिंग लिस्ट
जरुर बनवा, आणि अशा वस्तूची खरेदी करू नका कि घायच तर नाही हे पण
नक्की काय हे बघ खरेदी करून अशा प्रकारची खरेदी बिलकुल करू नये.
- जेवढं तुम्हाला जमेल तितकं समान ऑनलाइन शॉपिंग साईड वरून
मागवलं पाहिजे. अस का तर ऑनलाइन शॉपिंग संकेतस्थळावर प्रत्येक वस्तूवर योग्य
प्रमाणात डिस्काउंट भेटला जातो व ती कमी किमतीत भेटते. जर तुम्ही 4-5 वस्तू
एकत्र खरेदी केल्यात तर डिलिव्हरी चार्जेस लागत नाहीत किंवा नाहीच्या बरोबर
लागतात.
- कुठलीही मोठी वस्तू खरेदी करण्या आधी पहिले विचार करा कि
हि खरच इतकी महत्वाची आहे का ह्या वस्तू विना हि सगळं काम नीट होऊ शकत, आणि 30 दिवस
जर त्या वस्तुशिवाय तुमचं काम नीट होत असेल. तर ती वस्तू खरेदी नका करू.
- जर तुमचं त्या वस्तू शिवाय काम नाहीच होऊ शकत तर तुम्ही
ती वस्तू सेकंड हँड खरेदी कराकाही वेबसाईट अशा आहेत कि तुम्ही जवळ जवळ नव्याच
वस्तू अर्ध्या किमतीत खरेदी करू शकता.रोज लागणाऱ्या गरजेच्या वस्तू ह्या
तुम्ही जोरदार खरेदी करा, म्हणजे जर तुम्हाला महिन्याला एक साबण लागत असेल तर
तुम्ही अगोदर 12 साबनी वर्षभराच्या खरेदी करा,जर
तुम्ही विद्यार्थी असाल तर चार- पाच जण मिळून एकत्र खरेदी करा तुम्हाला सर्व
वस्तू कमी किमतीत भेटू शकतात.
- जर तुम्हाला शेविंग करता येत नसेल तर शेविंग करना जरूर
शिकून घ्या कारण 1 वेळ शेविंग करणे म्हणजे 30 रुपयाचं खर्च ,ह्या गोष्टीला हि समजून घ्या कि सध्या ब्रँड नि ज्या
प्रकारची शेविंग होते तितकीच शेविंग इटरनॅशनल ब्रँड ने होते.जर तुम्ही दाढी
करत असाल तर तुम्ही एक ट्रीमर खरेदी करा,
- चांगला दिसण्यासाठी महाग पावडर,क्रिम
व परफ्युम घ्यायची जरुरत नाही दररोज नीट अंघोळ करा फक्त.
- चांगला दिसण्यासाठी चांगला शरीर असणं खूप महत्वाच आहे.
आणि त्यासाठी जमलं तर जिम ला तुम्ही जरूर जायला पाहिजे पण तुमचा जर शेड्युल
दिनचर्या काही अशा प्रकारची असेल कि तुमची इच्छा असूनही तुम्ही नेहमी
रेग्युलर जिम ला नाही जाऊ शकत तर तुम्ही जिम ला जाण सोडून दया. त्या ऐवजी
तुम्ही तुमच्या शाळेत कॉलेज किंवा ऑफिस सायकल किंवा पायी जा हयामुळे तुमचं
फक्त शरीरच नाही तर तुमचा स्टॅमिना हि वाढेल, आणि त्याबरोबर खूप पैसेही वाचतील.
- जर तुमच ऑफिस, शाळा इतक्या लांब हे कि तुम्ही सायकल व पायी नाही जाऊ शकत
तर तुम्ही एक बुल वर्कर खरेदी करा, आणि मी सांगतो कि जगात इतके व्यायामासाठी वस्तू बनवल्यात
त्यात बुल वर्कर ची तोड नाय कशाला.जर तुम्ही तुमच्या मसल आणि ताकद खूप जास्त
वाढवत इच्छिता तर तुम्हाला बुल वर्कर ने व्यायाम जरूर केला पाहिजे.
- तुम्हाला तुमचा आणि तुमच्या परिवाराचा हेल्थ इन्शुरन्स हा
जरूर केला पाहिजे.
- आपल्या घरात नेहमी एनर्जी एफिशियन्ट उपकरणे वापरले
पाहिजेत. एनर्जी एफिशियन्ट म्हणजे कि जे कमी ऊर्जा खर्च करतात.
- कमी ऊर्जेचे उपकरणे म्हणजे अस नाही कि तुम्ही नेहमी CFL चे
बल्ब वापरा उजेडा साठी नेहमी घरात ट्युबलाइटचाच वापर केला पाहिजे. अस का तर
बल्ब आणि CFL हे पॉईंट सौर्स ऑफ लाइट आहेत. आणि जास्त वेळ वापरल्याने
तुमच डोकं दुखायला लागेल.
- आयुष्यात पुढे जाण्यासाठी तुम्हाला तुमच्या ज्या स्किल असतील तर
त्या वाढवण्यासाठी अजून जास्त नैपुण्य मिळवण्यासाठी योग्य क्लास लावा, किंवा
तुम्ही काहीही शिकू इच्छिता ती वस्तू तुम्हाला गुगल वर मिळेल.
- जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तर तुम्ही तुमचं घर
हे तुमच्या शाळे किंवा कॉलेज च्या जवळ बघा जितका जवळ तितका स्वस्त पडू शकता.
- तुम्ही ज्या कम्पनी मध्ये काम करता तुम्हाला माहिती
पाहिजे कि तुमची कम्पनी नोकरदारांना काय काय मोबदला देते.
- तुमच्या जवळ कोणत्याही प्रकारचा क्रेडिट कार्ड नाही ठेवलं
पाहिजे.
- जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर अभ्यास करण खूप महत्वाच
आहे. त्यामुळे खूप सारी पुस्तक असतात ती आपण विकत घेऊन नाही वाचू शकत
त्यामुळे लायबरी जरूर जॉईन करा.
- तुमच्या खोलीतली अशी वस्तु काढा कि जिचा वापर तीन ते चार
महिन्यापासून कुठेच नाही झाला त्या वस्तूला विका.
- तुम्ही जेवढा पण खर्च करता तेवढा पूर्ण हिशेब तुमच्या
डायरी मध्ये जरुर लिहा. पूर्ण म्हणजे पूर्णच हिशेब. जर तुम्ही 2 रुपयाचा
पेन जरी खरेदी केला तरी तुम्ही ते सुद्धा डायरीमध्ये लिहा.ह्या गोष्टीचा
फायदा पण माहित करून घ्या कि महिन्याच्या शेवटच्या दिवशी तुम्हाला माहित पडत
कि तुमचा जो पैसा असतो नक्की जातो कुठे.
- जेव्हा तुम्ही हिशेब ठेवता तर तुमच्या एक गोष्ट लगेच समोर
दिसेल कि तुमचा ह्या महिन्यात किती खर्च झाला त्यातून एवढा एवढा खर्च हा
पूर्णपणे बेकार मध्ये खर्च झाला. मग पुढच्या महिन्यात तुमचं मन त्या ठिकाणी
पैशे खर्च करायला बिलकुल जाणार नाही आणि तुम्ही बिलकुल वायफळ खर्च हि करणार
नाहीत.
- कोणत्याही वस्तूला फक्त आणि फक्त ह्यासाठी खर्च करा कि
तुम्हाला त्याची गरज आहे. आणि त्यावस्तु शिवाय आपला काम होऊच नाही शकत.
- कोणत्याही वस्तूला ह्यासाठी नाही खरेदी करायचं कि ती
गोष्ट बाजारात नवी आली आहे किंवा ती गोष्ट अपल्या मित्रा कडे आहे म्हणून नाही
खरेदी करायची.
- धन्यवाद तुमचा वेळ दिल्याबद्दल..!
टिप्पणी पोस्ट करा