तंत्रज्ञानाबद्द्ल अफवा

तंत्रज्ञानाबद्द्ल अफवा चुकीच्या अफवा जाणून
घ्या नाहीतर तुम्ही सुद्धा बळी पडाल ह्या अफवांना
technology in marathi

  • तंत्रज्ञान हे खूप जलद गतीने वाढतंय आणि जितक्या फास्ट हि टेक्नॉलॉजी वाढते तितक्याच चुकीच्या अफवा सुद्धा ह्या तंत्रज्ञानाबद्दल पसरल्यात.

जेवढा जास्त मेगा-पिक्सेलचा कॅमेरा तेवढा भारी ?
  •  जास्त मेगापिक्सेल म्हणजे जास्त चांगल्या QUALITY चे फोटो हि कन्सेप्ट आहे ती पूर्ण पणे चुकीची आहे.
  • कुठल्याही कॅमेराच्या बाबतीत फक्त मेगापिक्सेल जास्त असलं म्हणजे चांगली Quality अस नसत.
  • कॅमेरा मध्ये योग्य लेन्स, सेन्सर, एपरचर आणि इमेज प्रोसेसिंग सॉफ्टवेअर ह्या सगळ्या बाबी उत्तम दर्जाच्या राहणे हि तितकेच महत्वाचे असते.
  •  8 मेगापिक्सेलचा DSLR चा कॅमेरा सुद्धा एखाद्या 20 मेगापिक्सेलच्या कॅमेरापेक्षा चांगल्या उत्तम दर्जाचे फोटो घेतो.
  • फक्त आणि फक्त मेगापिक्सेल च्या जोरावर तुम्ही इमेज QUALITY ला कंम्पेअर नाही करू शकत.

APPLE च्या कॉम्पुटर मध्ये VIRUS शिरत नाही ?
  • APPLE च्या कॉम्पुटर मध्ये कधी व्हायरस येत नाही. हे साफ खोट आहे.
  • APPLE च्या कॉम्पुटर मध्ये सुद्धा व्हायरस येतो.
  • फरक एवढा आहे कि जेवढ्या प्रमाणात विन्डोझ मध्ये येतात. त्याच्या खूप कमी प्रमाणात APPLE मध्ये व्हायरस येतात.
  • APPLE ऑपरेटिंग सिस्टिम फक्त 2 % लोक वापरतात व बाकी 98% विन्डोस ऑपरेटिंग सिस्टिम वापरतात. त्यामुळे कुठला एक्स्पर्ट अशा वस्तूला टार्गेट करतो जी वस्तू जास्त प्रमाणात वापरली जाते.

एकदा डीलीट केलेली फाईल पुन्हा कधीच भेटत नाही ?
  •  तुम्ही एकदा डिलिट केलेली फाइल आहे तिला पुन्हा नाही अनु शकत हे साफ खोट आहे.
  • कुठलीही फाईल पर्मनंटली डिलिट करा किंवा रिसायकल बिन मधून सुद्धा डिलिट केली तरी ती सुद्धा अजून तुमच्या कॉम्पुटर मधून डिलिट होत नाही.
  • जो पर्यंत तुम्ही डिलिट केलेल्या फाईलच्या जागी दुसरा डाटा टाकला नाही किंवा ड्राईव्ह फॉरमॅट नाही केला तोपर्यंत ती फाईल तिथेच असते.
  •  तुम्ही त्या फाईलला चुटकीसरशी तुमच्या कॉम्पुटर मध्ये आणू शकता.
  •  तुम्ही अस नका समजू कि तुम्ही एखादी फाईल डिलिट केली तर तुम्ही पूर्ण सेफ आहात.कारण ती फ़ाईल डिलिट होत नाही. ती तुमच्या हार्डडिस्क मध्येच असते.
  • तुमची जर महत्वाची फाइल जर चुकून डिलिट झाली असेल तर चिंता नका करू ती तुम्हाला परत भेटू शकते.

तुम्हाला जो चार्जर भेटतो फक्त तोच चार्जर वापरला पाहिजे ?
  • तुम्ही तुमच्या मोबाईलला कुठल्याही चार्जर ने चार्जिंग करू शकत फक्त चार्जरच्या पिनवर-चार्जर वर जो आउटपुट असतो तो सारखा असला पाहिजे.
  • चार्जिंग पिनचा आउटपुट जर मॅच होत असेल तर तुम्ही चार्ज करू शकता.
  • मोबाईलला कुठल्याही लॅपटॉप,कॉम्पुटर,बॅटरी बॅकअप ने सुद्धा चार्ज करू शकता त्याने काही फरक पडत नाही.

महागातली HDMI केबल चांगली असते ?
  • DVD-प्लेअर सेट-टॉप बॉक्सला जी HDMI केबल वापरतात TV ला कनेक्ट करण्यासाठी वापरतात कुठलीही घ्या १०० वाली किवा महागातली सर्व उतम प्रकारे काम करतात.
  • जेवढा त्याच्यावर गोल्ड प्लेटेड असत व बाकीचे ऑप्शन असतात तेवढी ती केबल चांगली असते चांगल्या QUALITY ची आणि खूप काही असा गैरसमज असतो.
  • आज एक 100 रुपयाची HDMI केबल आणि SONY कंपनीची 4000 रुपयांची किंमतिची HDMI केबल घ्या दोघांची QUALITY एकदम सारखी असते.
  • HDMI मधून एक डिजिटल सिग्नल जातो त्याने काही फरक नसतो पडत कि केबल ची QUALITY कशी असावी .
  •  एक तर सिग्नल भेटेल, नाहीतर तुम्हाला सिग्नल नाही भेटणार बाकी काही वेगळा फरक नसतो.
  •  तुम्हाला जर 2 ते तीन मीटर ची केबल हवी असेल तर QUALITY लागते. नॉर्मल 1 मीटर साठी QUALITY काही महत्वाच नाही इतक.
  • HDMI केबल फक्त एक डिजिटल सिग्नल पाठवतो बाकी काही वेगळा नाही करत. त्यामुळे कमी किमतीतही केबल चांगली भेटते.  

तुमच्या मित्रांना शेअर करा ;
  •     आशा करतो तुम्हाला दिलेली "तंत्रज्ञानाबद्द्ल अफवा" माहिती आवडली असेल. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद,


                     

टिप्पणी पोस्ट करा

[blogger][facebook]

MKRdezign

{facebook#https://www.facebook.com/j2bhava/100410737340707/} {twitter#https://twitter.com/j2bhava} {google-plus#https://plus.google.com/114529621498499588003} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {youtube#https://www.youtube.com/channel/UCsLUUQt3dOSuG_gLMn3UZvw} {instagram#https://www.instagram.com/j2bhava/}

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget